४९५ नागरिकांकडून ९६ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:21 IST2021-02-25T04:21:44+5:302021-02-25T04:21:44+5:30

परभणी : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक उपायांची कडक अंमलबजावणी केली जात असून, बुधवारी विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या ४९५ नागरिकांकडून ९६ ...

96 thousand fine collected from 495 citizens | ४९५ नागरिकांकडून ९६ हजारांचा दंड वसूल

४९५ नागरिकांकडून ९६ हजारांचा दंड वसूल

परभणी : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक उपायांची कडक अंमलबजावणी केली जात असून, बुधवारी विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या ४९५ नागरिकांकडून ९६ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहेत. या अंतर्गत मास्कचा वापर न करणाऱ्या आणि गर्दी करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. २४ फेब्रुवारी रोजी परभणी शहरात विनामास्क फिरणाऱ्या १७६ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या पथकाने ३५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. पाथरी तालुक्यात ७० नागरिकांकडून १४ हजार रुपये, सेलू तालुक्यात १२२ नागरिकांकडून २४ हजार ४०० रुपये, सोनपेठमध्ये १५ जणांकडून एक हजार ७०० रुपये, गंगाखेड ३७ नागरिकांकडून सात हजार ७०० रुपये, पालममध्ये २५ जणांकडून पाच हजार रुपये, तर मानवत तालुक्यात ७० जणांकडून सात हजार रुपये दंड प्रशासनाने वसूल केला आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. प्रशासनाने आवाहन करूनही काहीजण त्यास प्रतिसाद देत नसल्याने दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्हाभरात या कारवाया होत असून, बुधवारी मास्कचा वापर न करणाऱ्या ४९५ नागरिकांकडून ९६ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Web Title: 96 thousand fine collected from 495 citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.