कुष्ठरोगाचे ९ तर क्षय रोगाचे ११ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:19 IST2021-02-09T04:19:43+5:302021-02-09T04:19:43+5:30
राष्ट्रीय संयुक्त सक्रिय कुष्टरोग व क्षयरोग शोध मोहिम तसेच इतर संसर्गजन्य रोगप्रतिबंधक जागरूकता अभियान तालुक्यातील प्रत्येक घराला भेट देऊन ...

कुष्ठरोगाचे ९ तर क्षय रोगाचे ११ रुग्ण
राष्ट्रीय संयुक्त सक्रिय कुष्टरोग व क्षयरोग शोध मोहिम तसेच इतर संसर्गजन्य रोगप्रतिबंधक जागरूकता अभियान तालुक्यातील प्रत्येक घराला भेट देऊन आरोग्य विभागाच्यावतीने रुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली. तालुक्यातील १० आरोग्य उपकेंद्रांसह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत प्रत्येक गावात घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घेण्यात आला. यासाठी संदीप साव, सुनिल खटाने यांच्या मार्गदर्शनाखाली ७२ पथकामार्फत तालुक्यात ही तपासणी करण्यात आली. यामध्ये कुष्ठरोगाचे ९ तर क्षय रोगाचे ११ रुग्ण निष्पन्न झाले. त्यांना तात्काळ ओषधोपचार चालू करण्यात आले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप साव व सुनील खटाने यांनी परिश्रम घेतले.
कुष्ठरोगाची लक्षणे
अंगावरील फिकट लालसर चट्टा, मऊ चकाकणारी तेलकट त्वचा व अंगावरील गाठी हात पायामध्ये बधिरता व शारीरिक विकृती,
क्षय रोगाची लक्षणे
दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा खोकला व ताप, वजनात घट, भूक मंदावणे, मानेवर गाठी येणे
कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम ८ फेब्रुवारीपासून तालुक्यातील प्रत्येक घरोघरी राबविण्यात येणार असून, त्यासाठी मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता आरोग्य विभागाच्या पथकास सहकार्य करण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी केली आहे.