जिल्ह्यात ८८ रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST2021-05-31T04:14:30+5:302021-05-31T04:14:30+5:30
परभणी : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग घटला असून ३० मे रोजी ८८ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर चार रुग्णांचा ...

जिल्ह्यात ८८ रुग्णांची नोंद
परभणी : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग घटला असून ३० मे रोजी ८८ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात घटला आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. त्याचप्रमाणे मृत्यूचे प्रमाणही बऱ्यापैकी कमी झाले आहे. रविवारी आरोग्य विभागाला १ हजार १७३ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या ९९२ अहवालांमध्ये ६३ आणि १८१ अहवालांमध्ये २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. एकूण ८८ रुग्णांची दिवसभरात नोंद घेण्यात आली आहे.
रविवारी कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत अल्पशी वाढ झाली. आयटीआय हॉस्पिटलमध्ये २ आणि जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २ अशा ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ४९ हजार ८७९ रुग्णसंख्या झाली असून त्यापैकी ४५ हजार ४१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार २२८ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला. सध्या ३ हजार २२४ रुग्ण उपचार घेत आहेत.
३६१ रुग्णांना सुटी
रविवारी दिवसभरात ३६१ रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही हळूहळू वाढत आहे.