परभणी जिल्ह्यात ७१२ गावांच्या सातबारा झाल्या आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:27 IST2018-01-08T00:27:12+5:302018-01-08T00:27:21+5:30
सातबारासाठी शेतकºयांची होणारी परवड आता थांबणार असून, जिल्ह्यातील ८३३ गावांपैकी ७१२ गावांमधील सातबारा आॅनलाईन करण्याचे काम पूर्ण झाले आहे़ सद्यस्थितीला ८५ टक्के सातबारा आॅनलाईन झाल्या असून, उर्वरित कामही लवकरच पूर्ण होणार असल्याने शेतकºयांना गावातच त्यांची सातबारा उपलब्ध होणार आहे़

परभणी जिल्ह्यात ७१२ गावांच्या सातबारा झाल्या आॅनलाईन
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सातबारासाठी शेतकºयांची होणारी परवड आता थांबणार असून, जिल्ह्यातील ८३३ गावांपैकी ७१२ गावांमधील सातबारा आॅनलाईन करण्याचे काम पूर्ण झाले आहे़ सद्यस्थितीला ८५ टक्के सातबारा आॅनलाईन झाल्या असून, उर्वरित कामही लवकरच पूर्ण होणार असल्याने शेतकºयांना गावातच त्यांची सातबारा उपलब्ध होणार आहे़
राज्य शासनाने महत्त्वाची प्रमाणपत्रे आॅनलाईन देण्याची सुविधा निर्माण केली असून, त्या दृष्टीने परभणी जिल्ह्यातही काम सुरू झाले आहे़ ग्रामीण भागात सातबारा हा महत्त्वाचा दाखला असून, प्रत्येक ठिकाणी सातबाºयाची गरज भासते़ शेतकºयांना त्यांची सातबारा मिळविण्यासाठी तलाठ्याकडे जावे लागते़ अनेक वेळा तलाठी उपलब्ध होत नाहीत़ परिणामी कामे खोळंबतात़ ही गैरसोय दूर करण्यासाठी राज्य शासनाने सर्व सातबारा आॅनलाईन देण्याचा निर्णय घेतला आहे़
या निर्णयानुसार मे २०१६ पासून जिल्ह्यामध्ये सातबारा आॅनलाईन करण्याच्या कामास सुरुवात झाली़ गावा-गावात चावडी वाचन करून सातबारांमधील त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या़ दुरुस्त झालेल्या या सातबारा संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम सध्या सुरू आहे़ जिल्ह्यामध्ये ८३३ गावे असून, या गावांपैकी ७१२ गावांमधील सातबारा आॅनलाईन झाल्या आहेत़ त्यामुळे शेतकºयांची सातबारासाठी होणारी धावपळ आता थांबणार आहे़ परभणी तालुक्यात १३० गावांपैकी ९८ गावांमधील सातबारा आॅनलाईन उपलब्ध झाल्या आहेत़ जिंतूर तालुक्यातील १६८ पैकी १३८, सेलू तालुक्यातील ९५ पैकी ९५, गंगाखेड तालुक्यातील १०५ पैकी ६३, पूर्णा तालुक्यातील ९४ पैकी ७८, पालम ८० पैकी ७९, पाथरी ५६ पैकी ५६, मानवत ५३ पैकी ५३ आणि सोनपेठ तालुक्यातील ५२ गावांपैकी सर्वच्या सर्व गावांच्या सातबारा आॅनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत़