जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायती बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:51 IST2021-01-08T04:51:08+5:302021-01-08T04:51:08+5:30
परभणी : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींपैकी ६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी ...

जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायती बिनविरोध
परभणी : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींपैकी ६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, ग्रामपंचायत निवडणुकीवरून गावपातळीवर वादविवाद निर्माण होतात. त्यामुळे या प्रकारास फाटा देऊन गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढावी, असे आवाहन आ.डॉ. राहुल पाटील आणि आ. मेघना बोर्डीकर यांनी केले होते, तसेच बिनविरोध ग्रामपंचायतींच्या विकासासाठी निधी देण्याची घोषणाही आमदारांनी केली होती. या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. अंतिम उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर या ग्रामपंचायतींमधील सदस्यांच्या विरोधात एकही उमेदवार नसल्याने या ग्रामपंचायतींना बिनविरोध निवडल्याचे प्रशासनाने जाहीर केले.
जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्याचप्रमाणे सेलू आणि गंगाखेड तालुक्यांत प्रत्येकी १०, परभणी तालुक्यात ९, पालम ८, पूर्णा ७, सोनपेठ ५, पाथरी ४ आणि मानवत तालुक्यातील २ ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या. त्यामुळे आता ५०० ग्रामपंचायतींमध्ये ग्रा.पं. निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.