परभणीत धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस ६ महिने शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:35 AM2017-12-11T00:35:23+5:302017-12-11T00:35:34+5:30

धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी आरोपीस ६ महिन्यांची शिक्षा गंगाखेड न्यायालयाने सुनावली आहे. ५ डिसेंबर रोजी हा आदेश देण्यात आला.

6-month-old sentence for defamation of defamation check | परभणीत धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस ६ महिने शिक्षा

परभणीत धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस ६ महिने शिक्षा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड: धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी आरोपीस ६ महिन्यांची शिक्षा गंगाखेड न्यायालयाने सुनावली आहे. ५ डिसेंबर रोजी हा आदेश देण्यात आला.
वसमत तालुक्यातील पांगरा येथील रामराव हनुमंतराव बोखारे याने गंगाखेड कारखान्याला वाहन व उसतोड कामगार पुरविण्याचा लेखी करार २४ जून २०११ रोजी केला होता. त्यानुसार ४ लाख ५० हजार रुपये अ‍ॅडव्हान्स घेतले. परंतु, या लेखी कराराचा भंग केला. अ‍ॅडव्हान्स घेतलेली रक्कमही परत केली नाही. वारंवार पैशांची मागणी केल्यानंतर बोखारे यांनी धनादेश दिला. परंतु, तो वटला नाही. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात दाखल झाले होते. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून गंगाखेड न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे.पी. शिराळे यांनी आरोपी बोखारे यांना वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड.सुनिल कांगणे, अ‍ॅड.मिलिंद क्षीरसागर यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. किशोर मुंडे सहकार्य केले.

Web Title: 6-month-old sentence for defamation of defamation check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.