शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

सोनपेठ तालुक्यात बोंडअळीचे ६ कोटींचे अनुदान बँकेत जमा; लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 19:15 IST

तालुक्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या टप्यातील ७ कोटी ९७ लाख ३८ हजार २२० रुपयांची अनुदानाची रक्कम तहसील कार्यालयास प्राप्त झाली आहे़

ठळक मुद्देतालुक्यातील ६२ गावांतील कापसाचे पीक बोंडअळीच्या हल्ल्याने फस्त झाले होते. आणखी ६० लाख २९ हजारांच्या निधीची प्रतीक्षा

सोनपेठ(परभणी)  : तालुक्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुसऱ्या टप्यातील ७ कोटी ९७ लाख ३८ हजार २२० रुपयांची अनुदानाची रक्कम तहसील कार्यालयास प्राप्त झाली आहे़ यातील ६ कोटी २८ लाख ३० हजार ८३६ रूपयांची रक्कम शेतकऱ्यांना वाटपासाठी बँकाकडे पाठविण्यात आली आहे़ 

सोनपेठ तालुक्यात गतवर्षी शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टवर कापूस पिकाची लागवड केली होती. पीक बहरात असताना बोंडअळीने हल्ला सुरू केला. महागडी औषधी फवारूनही पिकांसाठी केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. शासनाने बोंडअळीग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. कृषी विभाग व  महसूल विभागाच्या वतीने नुकसानग्रस्त कापूस पिकाचे पंचनामे करण्यात आले.

तालुक्यातील ६२ गावांतील कापसाचे पीक बोंडअळीच्या हल्ल्याने फस्त झाले होते. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील १९ गावातील ८ हजार ८४३ शेतकऱ्यांना ४ कोटी २० लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. त्यानंतर काही दिवसानंतर दुसऱ्या टप्प्यातील अनुदान तहसील प्रशासनाला प्राप्त झाले आहे. यामध्ये ३० गावांतील १५ हजार ८९५ शेतकऱ्यांसाठी ७ कोटी ९७ लाख ३८ हजार २२० रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे .

यातील कोठाळा, उखळी, उक्कडगाव, खपाट पिंपरी, डिघोळ, तीवठाणा, थडी उक्कडगाव, थडी पिंपळगाव, निमगाव, निळा, नरवाडी, पोंहडूळ, पोंहडूळ तांडा, मरगळवाडी, मोहळा, लासीना, लोहीग्राम, वंदन, वाडी, नैकोटा, वाडी पिंपळगाव, शिर्शी, शिरोरी, शेळगाव हटकर, सोनपेठ, सायखेड या २५ गावांतील १२ हजार ५३० शेतकऱ्यांचे ६ कोटी २८ लाख ३० हजार ८३६ रुपयांच्या अनुदान वाटपाची यादी बँकेकडे पाठविली आहे. वडगाव, नैकोटा, शेळगाव म., सोनखेड, पारधवाडी या पाच गावांतील ३ हजार ३६५ शेतकऱ्यांची यादी लवकरच बँकेकडे पाठविण्यात येणार आहे़ 

६० लाख २९ हजारांच्या निधीची प्रतीक्षातालुक्यातील ६२ गावांपैकी १९ गावांतील शेतकऱ्यांना बोंडअळीचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. तर २५ गावांतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. तर पाच गावांतील बँकेमध्ये निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे असले तरी विटा, वाणीसंगम, वैतागवाडी या गावातील अनुदान वाटपाच्या प्रक्रियेला गती आलेली नाही. या गावातील अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते उपलब्ध झाले नाही. तसेच निधीची चणचणही भासत असल्याच्या प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत. या गावांतील १ हजार ४७ शेतकऱ्यांना ६० लाख २९ हजार १६० रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. हे अनुदान लवकर देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, यासंदर्भात तहसीलदार जीवराज डापकर म्हणाले की, उर्वरित अनुदानाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. ती मिळताच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMONEYपैसाState Governmentराज्य सरकारbankबँक