खडकी नदीवरील पुलासाठी ६ कोटी ५४ लाख मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:19 AM2021-07-31T04:19:02+5:302021-07-31T04:19:02+5:30

कावलगाव शिवारातील खडकी नदीवरील पुलाचे बांधकाम ४० वर्षांपूर्वी केले असून तो पूल जीर्ण झाला आहे. पुलावरील बाजूचे लोखंडी पाईप ...

6 crore 54 lakh sanctioned for bridge over Khadki river | खडकी नदीवरील पुलासाठी ६ कोटी ५४ लाख मंजूर

खडकी नदीवरील पुलासाठी ६ कोटी ५४ लाख मंजूर

Next

कावलगाव शिवारातील खडकी नदीवरील पुलाचे बांधकाम ४० वर्षांपूर्वी केले असून तो पूल जीर्ण झाला आहे. पुलावरील बाजूचे लोखंडी पाईप गायब झाले आहेत. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. याविषयी लोकमतमध्ये अनेक वेळा वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत शासनाकडून या पुलाच्या नवीन बांधकामासाठी ६ कोटी ५४ लाख निधी मंजूर झाल्याची माहिती ॲड. हरिभाऊ शेळके यांनी दिली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत डाके, कार्याध्यक्ष प्रल्हादराव पारवे, शिवसांब देशमुख, हरिभाऊ हंबर्डे, यशवंतराव राज घाटोळ, गोविंद कदम आदी उपस्थित होते. या पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाल्याने कावलगाव, आलेगाव, पिंपरण, धानोरा, पेनूर, रुंज, सातेफळ या भागातील माल वाहतूक व वाहनांसाठी नांदेड ते कावलगाव प्रवास उपयुक्त ठरणार आहे.

Web Title: 6 crore 54 lakh sanctioned for bridge over Khadki river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.