दिवसभरात २७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:18 AM2021-04-27T04:18:10+5:302021-04-27T04:18:10+5:30

परभणी : जिल्ह्यातील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली असली तरी एकाच दिवशी तब्बल २७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्हावासीयांची ...

27 coronary artery disease deaths in a day | दिवसभरात २७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

दिवसभरात २७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

Next

परभणी : जिल्ह्यातील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटली असली तरी एकाच दिवशी तब्बल २७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्हावासीयांची धडधड वाढली आहे.

मागील दीड महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग जिल्ह्याची चिंता वाढवीत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण नोंद होत आहेत. मागच्या आठवड्यात नव्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता; परंतु उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूमुळे मात्र चांगलीच धास्ती निर्माण केली आहे. २६ एप्रिल रोजी जिल्ह्यात २७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. येथील जिल्हा रुग्णालयातील ८, आयटीआय कोविड हॉस्पिटलमधील ९, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयातील तीन आणि खासगी रुग्णालयातील ७ अशा एकूण २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये १० महिला आणि १७ पुरुषांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मात्र घटली आहे. प्रशासनाला १ हजार ६२६ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या १ हजार ४४ अहवालांमध्ये ४४१ आणि रॅपिड टेस्टच्या ५८२ अहवालांमध्ये २४३ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. मागील दोन दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या अल्प प्रमाणात घटली आहे. जिल्ह्यात एकूण ३२ हजार १०० रुग्ण नोंद झाले असून, त्यापैकी २४ हजार ७०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ८१३ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून, सध्या ६ हजार ५८२ रुग्ण उपचार घेत आहेत.

येथील जिल्हा रुग्णालयात २१९, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १६७, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २७२, अक्षदा मंगल कार्यालयात १५३, रेणुका कोविड हॉस्पिटलमध्ये ११६ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे ५ हजार ७८ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.

६७६ रुग्ण कोरोनामुक्त

सोमवारी जिल्ह्यातील ६७६ रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सध्या वाढले आहे.

Web Title: 27 coronary artery disease deaths in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.