१ लाख निराधारांच्या खात्यावर २१.५७ कोटी अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:17 IST2021-05-11T04:17:56+5:302021-05-11T04:17:56+5:30
श्रावणबाळ निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी, अपंग, विधवा, वृद्धापकाळ, श्रावणबाळ अनुसूचित जाती-जमाती आदी १२ योजनांंतर्गत १ ...

१ लाख निराधारांच्या खात्यावर २१.५७ कोटी अनुदान
श्रावणबाळ निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी, अपंग, विधवा, वृद्धापकाळ, श्रावणबाळ अनुसूचित जाती-जमाती आदी १२ योजनांंतर्गत १ लाख ८ हजार ५५३ लाभार्थी निराधार असून, राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या एक हजार रुपयांच्या अनुदानावर यांची उपजीविका भागते. मात्र कोरोनाकाळात नियमित अनुदान वाटप होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. लोकप्रतिनिधी, संघटनांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने एप्रिल व मे या महिन्यांचे प्रत्येकी १ हजार रुपयांप्रमाणे २१ कोटी ५७ लाख ३२ हजार ८०० रुपयांचे अनुदान १ लाख ८ हजार ५५३ लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात शासनाने जाहीर केलेले अनुदान लाभार्थींना मिळाले आहे. मात्र राज्य शासनाने इतर घटकांप्रमाणे निराधारांनाही कोरोनाकाळात मदत करावी.
कीर्तिकुमार बुरांडे, अध्यक्ष, दिव्यांग संघटना
कोरोनाकाळात राज्य शासनाने जास्तीचे अनुदान देऊन मदत करणे गरजेचे असताना आमच्या हक्काचेच दोन हजार रुपये बँकेत वर्ग केले आहेत.
विशाल बनसोडे, लाभार्थी
सध्याच्या कोरोनाकाळात नागरिक एकमेकांना मदत करण्यासाठी आखडता हात घेत आहेत. त्यामुळे २ हजारांत महिना काढणे कठीण आहे. अधिकच्या मदतीची अपेक्षा आहे.
प्रवीण फुलवरे, लाभार्थी
जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे महिनाभरासाठी लागणारे १५ किलो सोयाबीनचे तेलही या पैशात येत नाही. त्यामुळे रिक्षाचालकांसारखे अधिकची मदत व्हावी.
एजाज खान पठाण, लाभार्थी
राज्य शासनाने २ हजार रुपयांचे अनुदान दिले आहे, मात्र ही दिलेली रक्कम मदत आहे की नियमित अनुदान हा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरोनाकाळात प्रतिमाह ५ हजार रुपये देणे अपेक्षित आहे.
प्रदीप गांधारे, लाभार्थी
ई-महासेवा केंद्र बंद; हयात प्रमाणपत्र आणायचे कसे?
ज्येष्ठांना या वयात घराबाहेर पडणे टाळणे गरजेचे असताना त्यांना घराबाहेर पडून बँकेच्या दारात गर्दीत उभे रहावे लागत आहे.
त्यामुळे बँक प्रशासनाने कोरोनाकाळात या निराधार लाभार्थींना हयात दाखला घरपोहोच देण्यासाठी प्रयत्न करावेत.
२१,३९०
संजय गांधी निराधार योजना
४९,५६८
श्रावणबाळ निराधार