शहरं
Join us  
Trending Stories
1
मिचेल स्टार्कची 'Power'! २४.७५ कोटीच्या खेळाडूची पैसा वसूल गोलंदाजी, SRH च्या ४ विकेट्स
2
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
3
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
4
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
5
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
6
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
7
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
8
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
9
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
10
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
11
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
12
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
13
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
14
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
15
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
16
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
17
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
18
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
19
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
20
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले

परभणी लोकसभेसाठी २१ अपक्ष निवडणूक रिंगणात; उमेदवारी कुणाच्या पथ्यावर पडणार ?

By ज्ञानेश्वर भाले | Published: April 10, 2024 1:29 PM

एकूण ४१ उमेदवारांपैकी सात जणांनी माघार घेतल्याने ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत.

परभणी : निवडणूक म्हटलं की, एक एक मतासाठी उमेदवारांना आपल्या जिवाचं रान करावं लागत आहे. निवडून येण्यासाठी अपेक्षित मतांची जुळवाजुळव, आकडेमोड करून विजयाची गणिते मांडावी लागतात. मात्र, यात एक, दोघांपेक्षा अधिक उमेदवारांसह इतर कुणी उमेदवारांच्या विरोधात गेले तर त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तशीच काहीशी परिस्थिती परभणी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसून येत आहे. यात १३ उमेदवार विविध पक्षांकडून निवडणुकीला सामोरे जात असून, तब्बल २१ जण अपक्ष म्हणून उभे ठाकले आहेत. त्यामुळे हे अपक्ष उमेदवार नेमकं कुणाच्या पथ्यावर पडतात, याविषयी उत्सुकता वाढली आहे.

लोकसभेच्या या आखाड्यात सोमवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. एकूण ४१ उमेदवारांपैकी सात जणांनी माघार घेतल्याने ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. यात १३ उमेदवार हे महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, स्वराज्य शक्ती सेना, जय सेवालाल बहुजन विकास पार्टी यांसह विविध पक्षांचे असून, तब्बल २१ उमेदवार अपक्ष आहेत. त्यामुळे या निवडणुकीत रंगत येणार असून, हे अपक्ष उमेदवार कोणाची आणि किती मते घेतात, यावरून विजयाची समीकरणे मांडण्यात येत आहेत. सोमवारी अर्ज माघारीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांना त्यांच्या चिन्हांचे वाटप केल्याने अनेकांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तापासून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. २६ एप्रिलला परभणी मतदारसंघातील २ हजार २९० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.

परभणी लोकसभा : २१ लाख २३ हजार मतदारजिंतूर ३,७२,९७७परभणी ३,३५,३९७गंगाखेड ४,०८,९०८पाथरी ३,७९,०१४परतूर ३,११,३५०घनसांवगी ३,१५,४१०

विविध पक्षांकडून मैदानात असलेले उमेदवारआलमगीर मोहम्मद खान, संजय हरिभाऊ जाधव, कैलास बळीराम पवार, डॉ. गोवर्धन भिवाजी खंडागळे, महादेव जगन्नाथ जानकर, दशरथ प्रभाकर राठोड, पंजाब उत्तमराव डख, राजन रामचंद्र क्षीरसागर, विनोद छगनराव अंभुरे, शेख सलीम शेख इब्राहिम, सयद इरशाद अली, संगीता व्यंकटराव गिरी, श्रीराम बन्सीलाल जाधव यांचा समावेश आहे.

निवडणुकीतील अपक्ष उमेदवारअनिल माणिकराव मुदगलकर, अर्जुन ज्ञानोबा भिसे, आप्पासाहेब ओंकार कदम, शिवाजी देवजी कांबळे, कारभारी कुंडलिक मिठे, किशोर राधाकिशन ढगे, किशोरकुमार प्रकाश शिंदे, कृष्णा त्रिंबकराव पवार, गणपत देवराव भिसे, गोविंद रामराव देशमुख, बोबडे सखाराम ग्यानबा, मुस्तफा मैनोदिन शेख, राजाभाऊ शेषराव काकडे, राजेंद्र अटकळ, विजय अण्णासाहेब ठोंबरे, विलास तांगडे, विष्णुदास शिवाजी भोसले, समीरराव गणेशराव दूधगावकर, सय्यद अब्दुल सत्तार, सुभाष दत्तराव जावळे, ज्ञानेश्वर जगन्नाथ दहिभाते हे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

टॅग्स :parbhani-pcपरभणीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४sanjay jadhav ubtसंजय जाधवMahadev Jankarमहादेव जानकर