साई मंदिराचा १९३ कोटी विकास आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST2021-02-05T06:04:41+5:302021-02-05T06:04:41+5:30
पाथरी येथील साईबाबांच्या जन्मभूमीचा विकास आराखडा मागील दोन वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. गतवर्षी विकास आराखड्यास चालना मिळाल्यानंतर कोरोनामुळे ...

साई मंदिराचा १९३ कोटी विकास आराखडा
पाथरी येथील साईबाबांच्या जन्मभूमीचा विकास आराखडा मागील दोन वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. गतवर्षी विकास आराखड्यास चालना मिळाल्यानंतर कोरोनामुळे या प्रक्रियेला ब्रेक बसला होता. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठक घेण्यात आल्यानंतर २९ जानेवारी रोजी विकास आराखड्यातील संदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आ. बाबाजाणी दुर्राणी यांच्यासोबत पाथरी येथील साई मंदिराला भेट देऊन आराखड्यातील प्रस्तावित कामांची पाहणी केली.
त्यानंतर साई संस्थानमध्ये प्रशासकीय अधिकारी साई संस्थान यांच्या विश्वस्तासोबत बैठक घेण्यात आली. बैठकीला आ. बाबाजानी दुर्राणी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, उपजिल्हाधिकारी निकाळजे, तहसीलदार श्रीकांत निळे, संजय भुसारे, मुंजाजी भाले पाटील, दादासाहेब टेंगसे आदींची उपस्थिती होती.
पहिल्या टप्प्यासाठी ७० कोटी प्रस्तावित
१९३ कोटींचा तयार करण्यात आलेल्या साईबाबा मंदिर आणि पाथरी विकास आराखड्यातील असणाऱ्या त्रुटी दुरूस्ती सुचविण्यात आल्या. त्याचबरोबर पहिल्या टप्प्यात ७० कोटी प्रस्तावित असून, त्यात मुख्यत्वे ७५० भक्त बसतील एवढे भक्त निवास आणि मंदिर परिसर असणाऱ्या जागेचे अधिग्रहण ही दोन कामे करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर २ डीपी रस्ते आणि इतर ६ अंतर्गत रस्ते ही कामे होणे आवश्यक असल्याची चर्चा झाली. साईबाबा मंदिर विकास आराखड्यातील त्रुटी दुरुस्ती करून हा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवून १५ फेब्रुवारीपूर्वी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाईल, असे यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.
विकास आराखड्याच्या कामाला आवश्यक असणारी अधिग्रहण करण्यासाठी जागा आणि रस्त्याच्या कामासाठी लागणारी जागा सर्वच व्यापारी आणि नागरिक यांची सहमती आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत. लवकर निधी उपलब्ध झाल्यास तातडीने कामे मार्गी लागतील.
आ. बाबाजानी दुर्राणी