पालम दंगलप्रकरणी १४ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 05:07 IST2019-07-20T05:07:11+5:302019-07-20T05:07:19+5:30

दगडफेक व जाळपोळ प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारपर्यंत १४ जणांना अटक केली

14 people arrested in Palam riots case | पालम दंगलप्रकरणी १४ जणांना अटक

पालम दंगलप्रकरणी १४ जणांना अटक

पालम : येथील दगडफेक व जाळपोळ प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारपर्यंत १४ जणांना अटक केली असून आणखी काही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अटकेच्या भीतीने शहरातील अनेक जण भूमिगत झाले आहेत. पालम येथे १७ जुलै रोजी दोन गटांतील वादानंतर दगडफेक व जाळपोळ झाली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन सरकारी पोलीस जीप व पेठपिंपळगाव चौक भागातील हॉटेल, पानटपरी, हातगाडे, दुकाने व दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोडतोड करण्यात आली. पोलिसांनी जवळपास ४०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी गुरुवारी व शुक्रवारी १४ जणांना अटक केली. आरोपींच्या अटकेसाठी चार पथके स्थापन केली आहेत.

Web Title: 14 people arrested in Palam riots case