अखंड हरिनाम सप्ताह आयोजनास १३३ वर्षांची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST2021-02-05T06:05:14+5:302021-02-05T06:05:14+5:30
देवगावफाटा: येथील ग्रामदैवत असलेल्या हनुमान व विठ्ठल-रुख्मिणी मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारीदरम्यान ...

अखंड हरिनाम सप्ताह आयोजनास १३३ वर्षांची परंपरा
देवगावफाटा: येथील ग्रामदैवत असलेल्या हनुमान व विठ्ठल-रुख्मिणी मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. विशेष म्हणजे या सप्ताहास १३३ वर्षांची अखंड परंपरा आहे.
या निमित्त मंदिर परिसराची रंगरंगोटी करण्यात आली असून, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या सप्ताहात दररोज सकाळी ४ ते ६ काकडा भजन, ७ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १ गाथा भजन, दुपारी १ ते ४ श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ, तसेच रात्री ९ वाजता कीर्तन सोहळा होईल. त्यानंतर ११ ते ४ हरिजागर होईल. ३१ जानेवारी मार्गदर्शक गाथामूर्ती हभप रखमाजी महाराज सातपुते यांच्या हस्ते कलश पूजन करून सप्ताहास प्रारंभ झाला. हभप जनार्दनदास पवार महाराज देऊळगावकर हे अमृत वाणीतून श्रीमद्भागवत कथेवर निरुपण करीत आहेत.
१ फेब्रुवारी रोजी हभप कृष्ण महाराज रासवे चिकलठाणा यांचे कीर्तन होणार आहे. तर २ फेब्रुवारी रोजी प्रसाद महाराज कदम बोर्डीकर यांचे, ३ फेब्रुवारी रोजी भागवताचार्य हनुमान महाराज घाडगे, ४ फेब्रुवारी रोजी माउली महाराज खडकवाडीकर, ५ फेब्रुवारी रोजी वैजनाथ महाराज थोरात, ६ फेब्रुवारी रोजी महादेव महाराज राऊत बीड तर ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता हभप उमेश महाराज दशरथे यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. या सप्ताहास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन हभप गाथामूर्ती रखमाजी महाराज सातपुते देवगावकर, रमेश महाराज मोरे यांनी केले आहे.