लोकसहभागातून उभारणार १० शोष खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:22 IST2021-02-27T04:22:47+5:302021-02-27T04:22:47+5:30
पाथरी : तालुक्यातील वडी येथे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून माझे गाव माझे योगदान या उपक्रमांंतर्गत ग्रामस्थांनी केलेल्या ...

लोकसहभागातून उभारणार १० शोष खड्डे
पाथरी : तालुक्यातील वडी येथे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून माझे गाव माझे योगदान या उपक्रमांंतर्गत ग्रामस्थांनी केलेल्या कामांची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकळसाळे यांनी २४ फेब्रुवारी रोजी केले. यावेळी गावात १० ठिकाणी शोष खड्डे खोदण्याचे उद्दिष्ट ग्रामस्थांना टाकसाळे यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माझे गाव माझे योगदान हा उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत गावातील पाणी गावातच मुरविणे, सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी शोष खड्डे खोदणे यासह लोकोपयोगी विविध कामे करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने २४ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी पाथरी तालुक्यातील वडी येथे भेट देत लोकसहभागातून झालेल्या कामांची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा भावनाताई नखाते, पंचायत समिती सभापती कल्पनाताई थोरात, गटविकास अधिकारी सुहास काेरेगावे, गटशिक्षणाधिकारी मुकेश राठोड, बाजार समितीचे संचालक प्रभाकर शिंदे, रत्नाकर शिंदे, सरपंच चंदाताई कुटे, प्रताप शिंदे, शिवाजी कुटे, सिद्धेश्वर पाटील, आबासाहेब शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी टाकसाळे यांनी सार्वजिनक स्मशानभूमी, बंधारा, आरोग्य उपकेंद्र आदींची पाहणी केली. यशस्वीतेसाठी भगवान शेळके, मुख्याध्यापक संजय चिंचाणे, सोमेश्वर शिंदे, संपत पांचाळ, बाळू रोडे, रामदास कुटे, गोपाळ शिंदे, सुरेश कुटे आदींची उपस्थिती होती.