परभणीत चोरट्यांनी तीन दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 01:03 IST2017-12-16T01:03:18+5:302017-12-16T01:03:25+5:30

शहरातील खानापूर फाटा परिसरातील तीन दुकाने अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री फोडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

 Parbhani thieves broke into three shops | परभणीत चोरट्यांनी तीन दुकाने फोडली

परभणीत चोरट्यांनी तीन दुकाने फोडली

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील खानापूर फाटा परिसरातील तीन दुकाने अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री फोडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.
शहरातील खानापूर फाटा परिसरात राज राजेश्वर मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स, व्यंकटेश क्लिनिक, गुरुदेव दत्ता राईस सेंटर ही दुकाने आहेत.
नेहमीप्रमाणे दुकानदारांनी गुरुवारच्या रात्री आपली दुकाने बंद केली होती. परंतु, शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास या तिन्ही दुकानांचे शटर अज्ञात चोरट्यांनी वाकविल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या दुकानदारांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सकाळी १० वाजता श्वान पथकास पाचारण करण्यात आले. परंतु, श्वान त्याच परिसरात घुटमळल्याने कोणताच सुगावा लागला नाही. या तीन दुकानातील जवळपास १० हजार रुपयांचा माल लंपास झाल्याची माहिती रुपेश मेडेवार यांनी दिली. याबाबत शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मोढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

Web Title:  Parbhani thieves broke into three shops