फ्रान्समध्ये पिवळं जॅकेट घालून तरुण रस्त्यावर का उतरले आहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 12:44 IST2019-01-31T12:42:22+5:302019-01-31T12:44:24+5:30

यलो वेस्ट चळवळ फ्रान्सच्या सत्तेला आव्हान देतेय, कोण आहेत हे पिवळ्या जॅकेटवाले?

yellow vest movement in France, read why youth are angry! | फ्रान्समध्ये पिवळं जॅकेट घालून तरुण रस्त्यावर का उतरले आहेत?

फ्रान्समध्ये पिवळं जॅकेट घालून तरुण रस्त्यावर का उतरले आहेत?

ठळक मुद्देफ्रान्समध्ये काही तरु णांनी  येऊन सुरू केलेली ही यलो वेस्ट चळवळ आता कुठल्या दिशेनं जाते हे पहायचं.

 - कलीम अजीम

गेल्या तीन महिन्यांपासून फ्रान्समधले तरुण जगभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. डिसेंबर महिन्यात एकीकडे जगातील सर्व तरुणाई न्यू इअर सेलिब्रेशनच्या तयारीत व्यस्त होती, तर दुसरीकडे त्याचवेळी फ्रान्समधले तरु ण इमॅनूअल मेक्र ॉ सरकारच्या निर्णयाविरोधात रस्ते जाम करत होते. पिवळं जॅकेट परिधान केलेल्या हजारो तरु णांनी संपूर्ण पॅरीस शहर वेठीस धरलं होतं. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि कररचनेतील वाढीविरोधात हे आंदोलन होतं.
नोव्हेंरबला सुरू झालेलं हे आंदोलन डिसेंबर येता रौद्र रूप धारण करून गेलं. हळूहळू करत फ्रान्सची तरुण जनता एकजुटता दाखवत सरकारविरोधात रस्त्यावर उतरली. आंदोलनामुळे रस्ते, शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठान, शॉपिंग मॉल सगळे बंद झाले. एकवेळ परिस्थिती अशी आली की सरकार आणीबाणी जाहीर करण्याच्या तयारीत होतं. फ्रेंच जनता सरकारला वेठीस धरून जाचक निर्णय मागे घेण्याची मागणी करीत होती. पण सरकार काही मागे हटायला तयार नव्हतं. परिणामी जनतेचा आक्र ोश वाढत राहिला. पिवळं जॅकेट घातलेल्यांचं हे आंदोलन एव्हाना जगभर पसरलं आणि  ‘यलो जॅकेट मूव्हमेंट  जगभर चर्चेचा विषय ठरली.’
तर ही सगळी चळवळ सुरू कशी झाली?
ऑक्टोबरला चेंज ओआरजी या वेबसाइवर इंधन दरवाढीविरोधात एक निवेदन आलं. सामाजिक कार्यकत्र्या  सीन-एट-मर्ने यांनी हे निवेदन पोस्ट केलं होतं. तब्बल 3 लाख लोकांनी या याचिकेवर सह्या केल्या. कुणीतरी हे निवेदन सोशल मीडियावर शेअर करत म्हटलं की, 17  नोव्हेबरला देशभरातील सर्व रस्ते बंद करून विरोध प्रदर्शन करावं.  हा मेसेज व्हायरल झाला. आवाहनानंतर काहीजण ट्रॅफिक पोलीस वापरत असलेला पिवळा रेडिअम जॅकेट घालून रस्त्यावर उतरले. लोकांचं लक्ष आपल्याकडे वळावं यासाठी पिवळं जॅकेट घालण्यात आलं. हे जॅकेट लांबून चमकत असल्यानं ते सहज लोकांचं लक्ष वेधून घेत होतं. लक्ष वेधण्याची ही शक्कल कामाला आली व आंदोलनाची व्याप्ती देशभरात वाढली.
फ्रान्समध्ये 2008 च्या एका कायद्यानुसार प्रत्येक वाहनधारकांना आपल्या गाडीत हे जॅकेट ठेवणं अनिवार्य करण्यात आलं होतं. सुरक्षेच्या दृष्टीने हे जॅकेट कम्पलसरी करण्यात आलं आहे. कारण रस्त्यावर गाडी खराब झाली की हे जॅकेट घालून बाहेर पडावं लागतं. गेल्या काही विरोधी आंदोलनात हे जॅकेट सांकेतिक पद्धतीने घालण्यात आलंही होतं. पण यावेळी हे जॅकेट मोठय़ा आंदोलनाचं सिम्बॉल म्हणून पुढं आलं. तब्बल 84 हजार आंदोलकांनी यलो वेस्ट परिधान करून सरकारच्या नाकी नऊ आणले. तज्ज्ञांच्या मते गेल्या 50 वर्षात फ्रान्समध्ये अशा प्रकारचं आंदोलन झालेलं नाही. 1871 सालच्य़ा पॅरीस कम्यूननंतर 1968 साली विद्याथ्र्यानी जाचक नियमाविरोधात अशाच प्रकारचं आंदोलन फ्रान्समध्ये केलं होतं. ज्याने आजही जगाच्या इतिहासात मोठी जागा पटकावलेली आहे.
आता ही चळवळ आकार घेते आहे.
फ्रान्समध्ये सध्या डिझेलचा दर  121  रु पये प्रतिलिटर आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही किंमत तब्बल 23 टक्क्यांनी वाढली आहे. या व्यतिरिक्त विविध प्रकारच्या कररचना वाढल्यानं लोकांचं वेतन मोठय़ा प्रमाणात कपात होणार आहे. फ्रेंच जनतेने या धोरणांचा तीव्र विरोध केला. राष्ट्रपती इमॅनूअल मेक्र ॉ सरकारच्या या जाचक धोरणाविरोधात जनता संघटित झाली. त्यातून ‘यलो वेस्ट’ मूव्हमेंट  आकाराला आली.
राष्ट्रपती इमॅनूअल मेक्र ॉ यांनी संवादासाठी आंदोलकांना बोलावलं. पण आंदोलकांनी संवाद करण्यास नकार दिला. आधी दरवाढ मागे घ्यावी त्यानंतर संवाद होईल, असा पावित्ना आंदोलकांनी घेतला होता. सरकारने विविध प्रकारे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला, फ्रेंच जनता संघटित राहिली. या आंदोलनात 10 लोकांचा मृत्यू झाला असून, 18 हजार लोक जखमी झालेली आहेत, तर 5 हजारपेक्षा जास्त आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर या विरोधी आंदोलनामुळे फ्रेंच सरकारचे 17 अब्ज डॉलर म्हणजे 1.19 लाख कोटींचं नुकसान झालेलं आहे. बघता-बघता यलो जॅकेट मूव्हमेंट शेजारी राष्ट्रात पोहोचली. वाढत्या महागाईविरोधात इटली, बेल्जिअम आणि नेदरलॅण्डमध्ये विरोधी आंदोलनं सुरू झाली. पण ती यशस्वी होऊ शकली नाही.
मात्र फ्रान्समध्ये काही तरु णांनी  येऊन सुरू केलेली ही यलो वेस्ट चळवळ आता कुठल्या दिशेनं जाते हे पहायचं.

*****
 

इंटरनेटच्या  आभासी जगात लाईक कमेंटीत व्यस्त राहणार्‍या तरुणांनी बेसिक प्रश्नांसाठी मोठा लढा उभारला त्याचं हे एक उदाहरण. ‘यलो वेस्ट’ आंदोलनाची व्याप्ती इतकी होती की फ्रान्स सरकारला अखेर नमतं घ्यावं लागलं. यलो वेस्टची ही एक छोटीशी ठिणगी फ्रान्सची सत्ता धोक्यात आणण्यासाठी पुरेसी होती. मेक्र ॉ सरकारने हा धोका लक्षात घेऊन येत्या काळात अशा प्रकारची कुठलीच आंदोलनं उभी राहू नये याची दक्षता घेतली आहे. त्यासाठी फ्रान्स सरकार कडक कायदा करण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या परवानगीशिवाय कुठलंही आंदोलन केलं तर संघटकांना कडक शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे.

***

अरब स्प्रिंगला आता 9 वर्षे झालेली आहेत. सोशल मीडियातून उभारी घेतलेलं हे गेल्या दशकातले सर्वात मोठं आंदोलन होतं. इजिप्त, लीबिया, अल्जेरिया, टय़ुनिशिया, मोरोक्को, सुडान या सहा राष्ट्रामध्ये सत्ता हलवून गेला.  फ्रान्सच्या यलो वेस्ट मूव्हमेंट यात भर घातली आहे.

***

यलो वेस्ट आंदोलन तरुणांनी सुरू केलं किंवा उभारलं अशी चर्चा असली तरी त्या आंदोलनाला कुणाचं तरी पाठबळ असावं, अशी चर्चा जगभर आहे. कारण आंदोलनाची नियोजनपूर्वक तयारी करण्यात आली होती. अश्रूधुर, पाण्याचा मारा, रबराच्या गोळ्या आदींपासून बचाव करण्यासाठी विशेष  ट्रेनिंग या तरुणांना देण्यात आलं होतं. अनेक आंदोलकांनी डोक्यावर हेल्मेट व चेहर्‍यावर स्टोल वापरला होता. इतकंच नाही तर प्रत्येकानं  हातात जे येईल ती वस्तू हत्यार म्हणून वापरली होती. 


 

Web Title: yellow vest movement in France, read why youth are angry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.