शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

यंदा गरब्याचे  ढोल ऑनलाइनच.. पण माहौल तर तयार होणारच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 14:38 IST

शाळा ऑनलाइन भरतात, ऑफिसच्या मीटिंग झूमवर चालतात, डान्स क्लासही होतातच ऑनलाइन. मग गरबा ऑनलाइन का शक्य नाही? आणि माहौलचं काय? माहौल मनानं ठरवलं की तयार होतोच, 

- सारिका पूरकर -गुजराथी

* शाळा ऑनलाइन भरतात, ऑफिसच्या मीटिंग झूमवर चालतात, डान्स क्लासही होतातच ऑनलाइन. मग गरबा ऑनलाइन का शक्य नाही? आणि माहौलचं काय? माहौल मनानं ठरवलं की तयार होतोच, असं म्हणणा:या अनेक उत्साहींनी गेले काही दिवस ऑनलाइन गरबा क्लासेस, गरबा प्रॅक्टिस उत्तम केली. आपापले ग्रुप बनवून कॉन्फरन्स गुगल, झूमवर ऑनलाइन गरबा खेळायचे प्लॅन केले. ड्रेसकोड ठरले. ज्वेलरी ठरली.*आता मस्त नटूनथटून गरबा नाइट घरच्या घरी रंगणार आहेत. साईन अप, रजिस्ट्रेशन या सिंपल स्टेप्स फॉलो करून झूमवर गरबा खेळण्याची संधी अनेक नामांकित ग्रुप्सनेही आता उपलब्ध करून दिली आहे. ही लिंक फॉवरवर्ड करून फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत मस्त गरबा घरातच खेळता येणार आहे.*यापूर्वी गरबा कॉम्पिटिशनमध्ये मैदानावरचा परफॉर्मन्स पाहून बेस्ट जोडी, बेस्ट कॉस्च्युम, बेस्ट डान्स, बेस्ट स्टेप्स अशी अनेक बक्षिसे दिली जात होती. यंदा मैदानातील नाही तर ऑनलाइन परफॉर्मन्स पाहूूनही बक्षिसे दिली जाणार आहेत. गुजरातमध्ये अनेक ग्रुप्सने ऑनलाइन गरबा स्पर्धा ठेवल्या आहेत. स्पर्धकांनी व्हिडिओ बनवून ते संबंधितांर्पयत पोहोचवायचे आहेत. त्यातून मग विजेते ठरणार आहेत. गरबा ‘होम हा नवा ट्रेण्ड यंदा गाजणार अशी चिन्हं आहेत.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

देश-परदेस-ऑल-ऑनलाइनकोरोनामुळे गरबा नाही म्हणून खरं तर मन खट्ट झालं होतं. कारण दरवर्षी माङयाकडे गरबा शिकण्यासाठी झुंबड उडायची. यंदा कोणीच इंट्रेस्टेड नसणार असंच वाटत होतं; पण ऑनलाइन क्लासेसची मागणी होऊ लागली. मग झूमवर मी गरबा क्लास घेऊ लागले. उत्तम प्रतिसाद होता, यंदा या मरगळ वातावरणात अनेकांना गरबा हे काहीतरी नवीन शिकण्याचं, उत्साहाचं माध्यम वाटलं. एरव्ही तरी स्थानिकच लोक बॅचला यायचे, यंदा ऑनलाइन असल्याने देश-परदेशातले अनेकजण क्लासला ठरल्यावेळी ऑनलाइन जमू लागले.’- हेतल गंगानी, गरबा डान्सर, कोरिओग्राफर, गोवा

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 

यंदा ऑनलाइन मजा करणार!दरवर्षी गरबा मोठय़ा ग्रुप्सच्या इव्हेंटमध्ये जाऊन एन्जॉय केलाय. मात्र यावर्षी ऑनलाइन गरबा खेळणार आहे. तयारीही जोरदार केलीय त्यासाठी. विशेष म्हणजे यामुळे माझ्या परिवारासोबत गरबा खेळता येणार आहे. दरवेळेस मित्र -मैत्रिणींसोबत गरबा खेळण्यात दंग असायचे; पण यंदा फॅमिली गरबा. त्याची गंमतच वेगळी असणार आहे. खूप उत्सुकता आहे, गरब्याच्या या नव्या फॉर्मची पण.- शालिनी काला, गरबाप्रेमी

 

( सारिका मुक्त पत्रकार आहे.)

queen625@gmail.com