शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

आनंदानं जगायचंय? मग ‘च’ वजा करा आयुष्यातून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 16:47 IST

हे मिळालं‘च’ पाहिजे ते झालं‘च’ पाहिजे ते केलं‘च’ पाहिजे हे जमलं‘च’ पाहिजे. हा अट्टाहास काढून टाका. आनंदानं जगा, आपण जगलो तर खूप गोष्टी करू, असं सांगा स्वतर्‍ला.

ठळक मुद्दे10 सप्टेंबर- आत्महत्या प्रतिबंधक दिन, त्यानिमित्तानं ही खास मुलाखत.

- नंदकुमार मुलमुले

1) 2019 मध्ये 1.39 लाख आत्महत्या झाल्यात. त्यात 67 टक्के तरु ण होते. 2018च्या तुलनेत तरुणांच्या आत्महत्या 4 टक्क्यांनी वाढल्या, अशी माहिती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. वाढत्या आत्महत्यांची कारणं काय असावीत? विशेषतर्‍ तरुण मुलांची. - जगभरात वर्षाकाठी आठ ते दहा लाख आत्महत्या होतात. यापैकी जवळपास 17 टक्के भारतात होतात. भारताचा जवळपास एक लाख 35 हजार आकडा येतो. आपल्या देशात दर एक तासाला एक विद्यार्थी आणि दर अडीच तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो.आता वर्तमानात यात वाढ होण्याची कारणं म्हणजे कोरोना संकट. कोरोनाकाळात उद्योगधंद्याला बसलेला मोठा आर्थिक फटका. मोठय़ा प्रमाणात लोकांनी नोकर्‍या गमावल्यात, येत्या वर्षात हे प्रमाण अजून वाढेल. अनेक लोक भविष्याच्या चिंतेनेही नैराश्यात जात जगणं नाकारत आहेत. लोकांच्या मुक्त, मोकळ्या वावरावर गदा आलीय. सतत आजाराचा, संसर्गाचा धोका आणि एकप्रकारे हरेकाच्या जवळ मृत्यूचं सावट आहे. मला रोज किमान चार फोन येतात, की अस्वस्थ, घाबरल्यासारखं वाटतंय. त्यात तरुणही असतात. एकजण मला म्हणाला, की मी सध्या वर्कफ्रॉम होम करतो. ज्याप्रमाणात सेल झाला पाहिजे तो या काळात होत नाही, मार्केट डाऊन आहे. मात्न माझा सीनिअर मॅनेजर मला रोज दबाव टाकतो, सेल वाढव. टार्गेट पूर्ण होत नाही. त्यातून ताण येतोय. एकाकीपणा वाढलेला आहे. लोकांना खरी माहिती वेळच्या वेळी मिळत नाहीय, त्यातून असुरक्षितता वाढतेय.

 

2) या काळात तरुणांनी स्वतर्‍ची आणि आपल्या सभोवतालच्या माणसांची काय काळजी घ्यावी?

एकूणच आत्महत्या या जैवसामाजिक घटना असतात. व्यक्ती आणि व्यक्तीभवतालचा समाज दोन्हींचं या कृतीत योगदान असतं.आत्महत्या करणारे 80 टक्के लोक मनोविकाराने ग्रस्त असतात. या 80 टक्क्यांमधील बहुतांश लोक नैराश्याने ग्रस्त असतात. नैराश्य हा फार कळीचा मुद्दा आहे. दुर्दैवाने आपल्या लोकांना मानसिक आजारांची लक्षणं अजिबातच माहीत नसतात. आपण सर्वसामान्य उदासीसाठीही डिप्रेशन हा शब्द सहज वापरतो.विविध मनोविकार या मेंदूरासायनिक घटना आहेत. एखाद्याला डिप्रेशन येणं किंवा न येणं हे त्याच्या हातात नसतं. मेंदूत विशिष्ट रसायनांची कमतरता निर्माण झाल्याने हे उद्भवतं. डिप्रेशन व्हायला काय झालं हा अत्यंत वेडेपणाचा प्रश्न आहे. तुला कॅन्सर व्हायला काय झालं, असं म्हणण्यासारखं ते झालं.डिप्रेशन आणि आत्महत्येला विद्यार्थी आणि तरुण जास्त बळी पडतात. कारण विद्यार्थिवर्ग हा यशाचा, अपेक्षांचा, शिक्षणाचा आणि भविष्याचा ताण एकत्र झेलतो. यशाच्या मागे धावावं; पण त्यात आनंद असला पाहिजे. प्रचंड अपेक्षा करणारे पालक आणि जीवतोड स्पर्धेचं युगही याला जबाबदार आहे. येती दोन वर्षे तरी पालकांनी अवाजवी अपेक्षांचं ओझं पाल्यांवर नको टाकायला.पोस्ट ट्रॉमाटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणजे आघातोत्तर तणाव, याचं प्रमाण करोनाकाळात, तो ओसरल्यावरही प्रचंड वाढणार आहे. नैराश्यग्रस्तांचंही प्रमाण वाढणार आहे.कुणी डॉक्टरकडे जायचा सल्ला दिल्यास, ‘तुम्ही मला वेडे ठरवणार आहात का?’  असं म्हणायला नको. नैराश्य हा क्र ोनिक डिसीज आहे. कुठल्याही गाफील क्षणी त्यात तुम्ही अडकू शकता. तो सर्दी ताप-खोकल्यासारखा लगोलग बरा होत नाही. काही महिने किंवा र्वष उपचार घ्यावे लागतात. भोवतालच्या व्यक्तींनी अशा व्यक्तीवर लक्ष ठेवणं, त्याचं मन जाणून घेणं गरजेचं आहे.डिप्रेशन आणि त्या स्वरुपाच्या त्रासात लगोलग वैद्यकीय मदत घेणं गरजेचं आहे. औषधोपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणं आणि मध्येच अजिबात बंद न करणं महत्त्वाचं. अस्वस्थ वाटणं, मन न लागणं, आवडत्या गोष्टींवरून मन उडून जाणं, रोजच्या कामातही अडथळा निर्माण होणे अशी लक्षणं ज्याला स्वतर्‍त जाणवतात त्यानं त्याकडे दुर्लक्ष करायला नको. मनाने उपचारही घ्यायला नको. अनेकदा आजूबाजूचे लोक डॉक्टरकडे जाण्यापासून परावृत्त करतात,  त्या झोपेच्या गोळ्या असतात, घेऊ नको, असे चुकीचे सल्ले देतात. एकूण समाज म्हणून आपण या काळात माणसांना अधिक संवेदनशीलतेने हाताळलं पाहिजे. यशाचे आणि एकूणच सुखी असण्याचे निकष सैल केले पाहिजेत. मानसिक आरोग्याबद्दलची साक्षरता वाढली पाहिजे. शिवाय मानसोपचारतज्ज्ञांची संख्याही वाढली पाहिजे. देशात आज फक्त 5000 नोंदणीकृत सायकॅट्रिस्ट आहेत. एकूण 8 ते 9 हजार आहेत. 130 कोटींसाठी हे मुळीच पुरेसं नाही.भारतात 80 टक्के आत्महत्या साक्षर लोकच करतात. तामिळनाडू, केरळ, त्रिपुरा, महाराष्ट्र अशी राज्य आत्महत्यांमध्ये आघाडीवर आहेत. त्यामानाने उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमध्ये हे प्रमाण खूप कमी आहे. याचा निष्कर्ष आपण समजू शकतो.साक्षरतेसोबतच यशाची जीवघेणी चढाओढ सुरू होते. त्यातून पुढचं सगळं उद्भवतं.

3) आत्महत्या रोखण्यासाठी या काळात समाज म्हणून आपण कसं वागलं पाहिजे? 

भोवतालातले लोक तुम्हाला आश्वस्त करणारे आहेत की अधिक नैराश्य आणि नकारात्मकतेकडे ढकलणारे हे इथे महत्त्वाचं ठरतं. परफेक्शनचा अतिरेक करू नका. आयुष्यातला ‘च’ काढून टाका, की हे मिळालंच पाहिजे, आत्ताच हे झालं पाहिजे वगैरे..विफलता सहन करण्याची ताकद या पिढीने वाढवली पाहिजे. पालकांनीही मुलांना अपयश पचवायला शिकवलं पाहिजे. संवाद तुटतो तेव्हा माणूस आत्महत्येला बळी पडतो. एकाकीपण हे आत्महत्येकडे नेणारं पाहिलं पाऊल आहे. या काळात एकमेकांना सोबत देत तरून जाणं सर्वाधिक मोलाचं आहे.दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ज्यू छळछावणीत डांबून ठेवलेले मनोविकारतज्ज्ञ व्हेकटर फ्रँकल याने  मॅन इन सर्च ऑफ मीनिंग  हे पुस्तक लिहिलं. ते नक्की वाचलं पाहिजे.त्यात तो सांगतो, की एक प्रिय गोष्ट मनाशी धरून जेव्हा सगळं पूर्ववत होईल तेव्हा ते करू असं म्हणत त्या गोष्टीसाठी आपण जगलं पाहिजे. आज हरेकाने हा मंत्र लक्षात ठेवावा.

(प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ आणि साहित्यिक आहेत)मुलाखत आणि शब्दांकनशर्मिष्ठा भोसले