शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

work from home - नो पजामा @ वर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 4:57 PM

घरातले कपडे घालूनच कामाला बसता, मग तुमचं वर्क फ्रॉम होम बोअर होणार, कामातही मज्जा येणार नाही, असं काही होम-वर्कर्सचा अनुभव म्हणतोय.

ठळक मुद्देघरात घालायचे कपडे घातले की, अजिबात काम करायचा मूड तयार होत नाही.

- निकिता बॅनर्जी

एव्हाना हा जोक तुमच्याही व्हॉट्सअॅपवर आला असेलच की, आता कपाटातले कपडे बाहेर येऊन विचारायला लागलेत, की जिवंत आहात मालक की.?- वर्क फ्रॉम होम करताना रोजचे घरातलेच कपडे घातले जातात. ऑफिसला जाण्याचे, फॉर्मल कपडे तर मागेच पडले.पण आता वर्क फ्रॉम होमचा रेटा वाढतोय तशी चर्चा वाढते आहे की, घरातले जुनाट कपडे घालून काम करण्याचा मूड जातो का?तेच ते कपडे, तेच वातावरण, तेच रुटीन, त्यानं कामातली ऊर्जा कमी होते, त्याचा परिणाम प्रॉडक्टिव्हिटीवर होतो.कामच चांगलं आणि भरपूर केलं नाही तर नोकरी कशी टिकणार याकाळात?त्यामुळे वर्क फ्रॉम होम कसं करावं, स्वत:चा त्रस कसा कमी करावा याविषयी बरीच चर्चा आहे.त्यातला एक पर्याय असाही अनेकजण सांगतात की, जरा कपडय़ांचा विचार करा. अनेकजणांनी त्यावर आपले अनुभव सोशल मीडीयात लिहिले, ब्लॉग लिहिले.ब:याच जणांनी तर स्पष्ट सांगितलं की, गेट आउट ऑफ यूअर पायजमा.म्हणजे काय?तर घरात घालायचे कपडे घातले की, अजिबात काम करायचा मूड तयार होत नाही. काहीच बदल होत नाही.आपला माइण्ड स्वीच काम करत नाही आणि त्यामुळे उदास वाटतं, आपण कामाला भिडलो असं वाटत नाही, असं अनेकांचं म्हणणं.त्यावर मग अनेकांनी उपाय करुन पाहिले.त्यातून हाती लागलेल्या या काही सरासरी कॉमन गोष्टी.

1. ऑफिसला जाताना घालायचो, तसे पण कम्फर्टेबल कपडे घाला. आठवडाभराचा सेट काढून ठेवा. तो बदलून रोज वापरा.2. घरातले कपडे, नाइट ड्रेस, घालून कामाला बसू नका.3. जरा केस नीट विंचरुन, छान किरकोळ मेकअप करून फ्रेश होऊन कामाला बसा. कुणाला दाखवायचंय, घरातच तर बसायचं आहे असं म्हणू नका.4. मळलेले कपडे, इस्त्री नसलेले, असा अवतार करून कामाला बसू नका.5. सगळ्यात महत्त्वाचं, आपले आवडते रंग, आवडते कपडे कपाटातून काढा, घाला. त्यानं कामाचा मूड चांगला राहतो.