शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

एका फ्रेंच तरुणी कोरोनाकाळात भारतात मदतीला थांबते तेव्हा... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 4:10 PM

फ्रान्समधली एक तरुणी, भारतात येते. केरळमध्ये. लॉकडाउन सुरूझालं तरी परत न जाता इथं मदतीला उभी राहते.

ठळक मुद्देदूरच्या देशातून एक तरुणी भारतात येते, आणि इथल्या माणसांना मदत करण्यासाठी धडपडते, भाषा, रंग, वंश, धर्म असं काही त्यात आडवं येत नाही, हे किती महत्त्वाचं आहे.

- भाग्यश्री मुळे

स्टिफनी  हेर्वे. फ्रान्सच्या बोर्डोक्समध्ये राहणारी म्युङिाक थेरपिस्ट असलेली ही तरुणी. स्टिफनी दरवर्षी केरळात  कोचीनला येते. यंदाही आली. तेवढय़ात कोरोना लॉकडाउन सुरू झालं. तिला परत जाता आलं असतं, पण ती परत गेली नाही. तिचे सहकारी मायदेशी परत गेले, पण ती गेली नाही. ती म्हणते आयुष्यात कसे वळण येईल याबद्दल कुणीच काही सांगू शकत नाही.  म्हणून तर ती भारतात थांबली आणि कोरोनाकाळात इथल्या गरजूंसाठी पैसा उभारण्याचं तिनं ठरवलं.  गरजूंना अन्नधान्य देता येईल इतका पैसा उभारला. तोदेखील अभिनव पद्धतीने. ती म्युङिाक थेरपिस्ट. त्यामुळे ती लाइव्ह गायली, ते रेकॉर्डिग तिच्या फेसबुक पेजवर टाकलं.लोकांना आवाहन केलं की, मदत करा. त्यातून तिने अल्पावधीत सहा लाख रु पये जमा केले. या पैशातून डाळ, तांदूळ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट्स तयार करून तिनं ते वाटले.

स्टिफनी  फ्रान्समधील ‘असोसिएशन गॅब्रियल’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेची संस्थापक आहे. या संस्थेमार्फत भारत आणि व्हिएतनाम येथे काही मदत पाठवली जाते.भारतात, केरळात आली की ज्या हॉटेलमध्ये ती थांबते त्या हॉटेलच्या मालकीण अनटोनी आणि त्यांच्या कुटुंबीयांबरोबर ती कोचीतील ‘वेली कम्युनिटी किचन’ साठी कामाला लागली. वेली गावातील ‘कुटुंबश्री’ नावाची संघटना आणि तेथील ग्रामपंचायतीमार्फत हे किचन चालविले जातं. ‘कुटुंबश्री’ हा येथील महिलांचा बचतगट आहे.  या लोकांशी संवाद साधल्यानंतर इथं स्वयंपाकघरात कमी पडणा:या वस्तूंची यादी तिने तयार करून घेतली. यासाठी लागणारा निधी आपल्या देशातून उभारला.  हॉटेलमालक उषा अनटोनी यांचा मुलगा थॉम्सन अनटोनी याला फ्रेंच भाषा उत्तमरीत्या येते. त्यामुळे या संपूर्ण प्रवासात तो स्टिफनीचा दुभाषा बनला. सध्या स्टिफनी कोचीजवळील ‘व्ह्यापिन’ या गावच्या अंगणवाडीचे बांधकाम करण्यात सक्रिय मदत करते आहे. लांब दूरच्या देशातून एक तरुणी भारतात येते, आणि इथल्या माणसांना मदत करण्यासाठी धडपडते, भाषा, रंग, वंश, धर्म असं काही त्यात आडवं येत नाही, हे किती महत्त्वाचं आहे.

( भाग्यश्री मुक्त पत्रकार आहे.)