फ्रान्समधली एक तरुणी, भारतात येते. केरळमध्ये. लॉकडाउन सुरूझालं तरी परत न जाता इथं मदतीला उभी राहते.
एका फ्रेंच तरुणी कोरोनाकाळात भारतात मदतीला थांबते तेव्हा...
ठळक मुद्देदूरच्या देशातून एक तरुणी भारतात येते, आणि इथल्या माणसांना मदत करण्यासाठी धडपडते, भाषा, रंग, वंश, धर्म असं काही त्यात आडवं येत नाही, हे किती महत्त्वाचं आहे.
- भाग्यश्री मुळे
स्टिफनी हेर्वे. फ्रान्सच्या बोर्डोक्समध्ये राहणारी म्युङिाक थेरपिस्ट असलेली ही तरुणी. स्टिफनी दरवर्षी केरळात कोचीनला येते. यंदाही आली. तेवढय़ात कोरोना लॉकडाउन सुरू झालं. तिला परत जाता आलं असतं, पण ती परत गेली नाही. तिचे सहकारी मायदेशी परत गेले, पण ती गेली नाही. ती म्हणते आयुष्यात कसे वळण येईल याबद्दल कुणीच काही सांगू शकत नाही. म्हणून तर ती भारतात थांबली आणि कोरोनाकाळात इथल्या गरजूंसाठी पैसा उभारण्याचं तिनं ठरवलं. गरजूंना अन्नधान्य देता येईल इतका पैसा उभारला. तोदेखील अभिनव पद्धतीने. ती म्युङिाक थेरपिस्ट. त्यामुळे ती लाइव्ह गायली, ते रेकॉर्डिग तिच्या फेसबुक पेजवर टाकलं.लोकांना आवाहन केलं की, मदत करा. त्यातून तिने अल्पावधीत सहा लाख रु पये जमा केले. या पैशातून डाळ, तांदूळ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट्स तयार करून तिनं ते वाटले.
स्टिफनी फ्रान्समधील ‘असोसिएशन गॅब्रियल’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेची संस्थापक आहे. या संस्थेमार्फत भारत आणि व्हिएतनाम येथे काही मदत पाठवली जाते.भारतात, केरळात आली की ज्या हॉटेलमध्ये ती थांबते त्या हॉटेलच्या मालकीण अनटोनी आणि त्यांच्या कुटुंबीयांबरोबर ती कोचीतील ‘वेली कम्युनिटी किचन’ साठी कामाला लागली. वेली गावातील ‘कुटुंबश्री’ नावाची संघटना आणि तेथील ग्रामपंचायतीमार्फत हे किचन चालविले जातं. ‘कुटुंबश्री’ हा येथील महिलांचा बचतगट आहे. या लोकांशी संवाद साधल्यानंतर इथं स्वयंपाकघरात कमी पडणा:या वस्तूंची यादी तिने तयार करून घेतली. यासाठी लागणारा निधी आपल्या देशातून उभारला. हॉटेलमालक उषा अनटोनी यांचा मुलगा थॉम्सन अनटोनी याला फ्रेंच भाषा उत्तमरीत्या येते. त्यामुळे या संपूर्ण प्रवासात तो स्टिफनीचा दुभाषा बनला. सध्या स्टिफनी कोचीजवळील ‘व्ह्यापिन’ या गावच्या अंगणवाडीचे बांधकाम करण्यात सक्रिय मदत करते आहे. लांब दूरच्या देशातून एक तरुणी भारतात येते, आणि इथल्या माणसांना मदत करण्यासाठी धडपडते, भाषा, रंग, वंश, धर्म असं काही त्यात आडवं येत नाही, हे किती महत्त्वाचं आहे.