शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आपण काय खातो, त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो, हे माहितीये?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 03:00 IST

जग बदललं तसा आपला आहारही; पण त्या आहाराचा आपल्यावर काय परिणाम होतो?

ठळक मुद्देआपल्या बदलत्या गरजांनुसार आहाराचा कसा विचार करायला हवा

आहाराबद्दल फार जागरूकता नव्हती; पण सर्वच जण आपल्या स्वतर्‍च्या खाद्यपरंपरेला अनुसरून आहार घेत होते, त्या पिढीच्या आहेत डॉ.मालती कारवारकर. तो काळ ‘सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टस’चा नव्हता. भारतात आर्थिक बदल होत होते, एकत्न कुटुंबपद्धती कमी होत होती, महिला कामासाठी बाहेर पडू लागल्या होत्या. तंत्नज्ञान आपल्या रोजच्या आयुष्यावर अधिराज्य करायला सुरुवात झाली होती. टीव्ही घराघरांत पोहचत होता. या सर्वामुळे अर्थातच आपल्या खाद्य संस्कृतीवरही त्याचा परिणाम होत होता. तेव्हा आपल्या गरजा ओळखून माणसानं काय खावं, कसं खावं याबद्दल अभ्यासू लेखन करणार्‍या आहारतज्ज्ञ म्हणजे डॉ. मालती कारवारकर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सर्वच पुस्तकं ‘बायकांनी हे करावं’ असं अजिबात सांगत नाही, ते सर्वासाठी आहे. वेगवेगळ्या प्रकारची कामं करणार्‍या लोकांना कोणत्या प्रकारच्या आहाराची कशी गरज आहे याबद्दल त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. त्यांचं सर्वात नवीन पुस्तक म्हणजे ‘अन्नजिज्ञासा’. या पुस्तकामध्ये मालती कारवारकर यांनी फूड सायन्स, म्हणजे स्वयंपाक क्षेत्नातलं शास्त्न याबद्दल लिहिलं आहे. या पुस्तकात, त्यांनी आपल्या बदलत्या गरजांनुसार आहाराचा कसा विचार करायला हवा याबद्दल लिहिले आहे.यामध्ये नास्ता करण्याचं महत्त्व, जेवणाचा डबा कसा असावा, संध्याकाळी करायच्या साध्या सोप्या गोष्टी, या सगळ्यामध्ये पोषकतत्त्वांचा विचार सांगितला आहे. पुस्तकात त्यांनी कोणत्याही प्रकारच्या ‘डायटिंग’ला कडाडून विरोध केला आहे. डाएटपेक्षा न्यूट्रिशनचा विचार व्हावा, असंही म्हंटलं आहे. ज्यांना खायला लागतं अशा सर्वासाठी हे पुस्तक वाचणं मस्ट आहे !याबरोबरच Food In नावाची डॉक्युमेंटरीदेखील नक्कीच बघा. यामध्ये आपलं अन्न, ऑटोमेशन आणि त्यानं  आपल्या शरीरावर आणि इतरही सृष्टीवर होणारे परिणाम यावर भाष्य केलं आहे. रॉबर्ट केनर या डॉक्युमेंटरी फिल्ममेकरच्या या कामाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. ही डॉक्युमेंटरी यू टय़ूबवर बघता येईल.