शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

बोडक्या डोंगराला केलं पाणीदार

By admin | Updated: April 12, 2017 19:03 IST

पाऊस पडला तरी डोंगरउतारामुळे सारं पाणी कायम वाहून जातं. गावकरी पुन्हा कोरडेच.यासाठी काय करता येईल? शासनानंही पुढाकार घेतला आणि

तरुणांच्या प्रयत्नानं शेतकऱ्यांच्या आयुष्यात हिरवा ओलावा..- आॅक्सिजन टीमडोंगरी माळरानावर असं पिकणार तरी काय? निसर्गानंही कायमच पाठ दाखवलेली.पाऊस पडला तरी डोंगरउतारामुळे सारं पाणी कायम वाहून जातं. गावकरी पुन्हा कोरडेच.यासाठी काय करता येईल? शासनानंही पुढाकार घेतला आणि कळवण तालुक्यातील तरुण शेतकऱ्यांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिला आणि चित्र हळूहळू पालटू लागलं.कळवण तालुक्यातील पश्चिम पट्टा मुख्यत: आदिवासीबहुल भाग आहे.पडणाऱ्या पावसाचे पाणी डोंगरउतारावरून वाहून गिरणा नदीला जाते. त्यामुळे या भागात ठराविक पिकांशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. आजतागायत भात, नागली, वरई अशाच पद्धतीची पिके येथे घेतली जात होती.निसर्गात समतोल राहावा, डोंगर खचू नये व त्यावर वृक्षसंवर्धन राहावे याकरिता शासनाने डोंगरांना ड्रिलिंग (छिद्रे) करून पावसाचे पाणी डोंगरात मुरवण्याची पद्धत अवलंबिली. याचा सर्वाधिक फायदा पश्चिम पट्ट्यातील गोसराने गावातील शेतकऱ्यांना झाला. पाणी डोंगरात मुरू लागल्याने आजपर्यंत कधी नव्हे ते चक्क भाजीपाल्याची शेतीही या परिसरात सुरू झाली आहे. मात्र हे हिरवे दिवस येण्याआधी त्यासाठी त्यांनी प्रचंड कष्टही उपसले. त्यांनी मोठ्या कष्टानं लोकांमध्ये जागरुकता निर्माण केली. डोंगरउतारावरुन वाहून जाणारं पाणी डोंगरातच अडलं जावं यासाठी प्रयत्न केले.त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं आणि हळूहळू परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी त्याला प्रतिसाद दिला. गेल्या काही वर्षांपासून पावसाचे पाणी डोंगरात जिरवण्याचा हा उपक्रम सुरू आहे. डोंगर माळरानावर आता भाजीपाला पिकू लागल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यात नवनवीन प्रयोगही आता शेतकरी करीत आहेत.गोसराने येथील शेतकरी गोपीनाथ साबळे यांनी प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर आपल्या तीन एकर शेतीत पाली या जातीचा हायब्रीड वाल लावला आहे. एकरी सहा किलोप्रमाणे १८ किलो पाली जातीचे बियाणे त्यासाठी लागले. बियाणांसाठी साधारणपणे नऊ हजार व इतर खर्च दहा हजार असा एकूण एकोणीस हजारांचा खर्च त्यांना आला. त्यातून चांगल्या मिळकतीची त्यांना अपेक्षा आहे. सध्याच्या दरानुसार सुमारे ४ ते ५ लाखापर्यंत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.बोडका डोंगर पाणीदार झाल्याने तरुण शेतकऱ्यांच्या आयुष्यातही आता हिरवा ओलावा निर्माण होत आहे.