ट्रोलिंग सहन करू नका, तसंच आपण कुणाला ट्रोल करत नाही ना ? -लक्ष द्या. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 03:03 PM2020-07-23T15:03:06+5:302020-07-23T15:06:04+5:30

सोशल मीडियात कुणी छळत असेल तर ते सहन करूनका, आणि आपण कुणाला छळत नाही ना, हेही पहा.

Troll | ट्रोलिंग सहन करू नका, तसंच आपण कुणाला ट्रोल करत नाही ना ? -लक्ष द्या. 

ट्रोलिंग सहन करू नका, तसंच आपण कुणाला ट्रोल करत नाही ना ? -लक्ष द्या. 

googlenewsNext

आवेझ काझी

डेटा  पॅक मारला की कनेक्टिव्हिटी हातात येते. अल्पदरामध्ये आता मोबाइल इंटरनेट डेटा मिळतो. आणि आता कोरोनाकाळात अनेकजण घरीच आहेत. हात रिकामे आहेत.  त्यातून मग काहीजण ऑनलाइन नको त्या गोष्टी करतात. त्यात काहीजण नकळतही (आणि काहीजण जाणूनबुजून) सायबर बदनामी, सायबर बुलिंग करतात. ट्रोल करण्याचे प्रकार तर सर्रास होतात. ऑनलाइन ट्रोल करणं म्हणजे एखाद्या व्यक्तीवर केलेली आक्षेपार्ह चुकीची भाषा वापरून केलेली टीका. हीन दर्जाचा विनोद करणं, सायबर धमकी किंवा तथ्यहीन अर्थहीन कमेंट करणं हेही ट्रोलिंगच.
जर तुम्हाला सोशल मीडियावर कोणी धमकावत, शिवीगाळ करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्याची रितसर तक्रार नोंदवली पाहिजेच. मात्र आपणही असं वागत नाही ना, ऑनलाइन कुणाला छळत नाही ना हेही तपासून पाहिलं पाहिजे.
 एकतर सोशल मीडियात कुणी आपल्याशी अश्लील भाषेत बोलत असेल, आक्षेपार्ह कमेंट करत असेल तर ती पोस्ट डिलीट करणं किंवा त्या व्यक्तीला ब्लॉक करणं ही पहिली पायरी.
 वाह्यात कमेण्टला ‘प्रतिसाद’ न देणं हा ज्याचा त्याचा प्राथमिकतेचा भाग. मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष न करता, वेळीच ताकीद देणं ते तक्रार करणं या गोष्टी आपण करूशकतो.
  सोशल मीडियावर उगाच वाद निर्माण करणा:यांचा एकच उद्देश असतो. तो म्हणजे तुम्हाला नाहक त्रस देणं. म्हणजे ते ऊठसूट अविवेकी काहीही कमेंट करणार आणि तुम्ही त्याला प्रतिसाद देण्यामध्ये किंवा त्याचा अर्थ लावण्यात वेळ वाया घालवणार यावर चांगला उपाय म्हणजे तुमचा फोन किंवा कम्प्युटर काही काळापुरता बंद ठेवा. दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला वेळ असेल तेव्हा आणि तुमचं डोकं शांत झाल्यावर त्यांचेविरोधात ‘कायदेशीर फिर्याद’ देऊन गुन्हा दाखल करून चोख प्रत्युत्तर द्या. 


 एखादी व्यक्ती विकृत मानसिकतेतून अशी कृती करण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या कमेंटवर प्रतिक्रि या देणं, व्यक्त होणं कटाक्षाने टाळा.
 सोशल मीडियाच्या  आभासी जगातल्या वादविवादात पडून तुमचं मानसिक स्वास्थ्य बिगडू शकतं. त्यामुळे  सोशल मीडियावर व्यक्त होताना विचार करा. 
 सगळ्यात महत्त्वाचं इतरांचं ट्रोलिंग सहन करूनका, तसंच आपणही कुणाला ट्रोल करत नाही ना याकडे लक्ष द्या. 


(लेखक पोलीस उपनिरीक्षक आणि सायबर गुन्हे अभ्यासक आहेत.)

Web Title: Troll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.