शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

हे असे कसे बेभरवशाचे ‘वेड?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 20:26 IST

जेव्हा जेव्हा वाटेल ना आपलं आयुष्य फार छळकुटं आहे, तेव्हा तेव्हा ही ‘वेड’ची गोष्ट नक्की आठवावी? सगळं संपलंय असं वाटत असतानाच नियती आणि माणसाचं कर्तृत्वही अशी काही कमाल करतं की, सारा माहौलच बदलून जातो. पार ‘वेड’ लागतं वेड.तर ही त्या वेडचीच गोष्ट.

- अभिजित पानसे

जेव्हा जेव्हा वाटेल ना आपलं आयुष्य फार छळकुटं आहे, तेव्हा तेव्हा ही ‘वेड’ची गोष्ट नक्की आठवावी? सगळं संपलंय असं वाटत असतानाच नियती आणि माणसाचं कर्तृत्वही अशी काही कमाल करतं की, सारा माहौलच बदलून जातो. पार ‘वेड’ लागतं वेड.तर ही त्या वेडचीच गोष्ट.ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅथ्यू वेड. आठवतोय ना, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात वेड लागल्यासारखा खेळणारा..तसंही आजवरचा त्याचा खेळ आणि त्याचं जगणंही क्रिकेटचं एक विशेषच घेऊन येतं, अनप्रेडिक्टेबल.जेव्हा जेव्हा वाटेल ना की, आपल्यासमोर फार संकटं आहेत, आपलं लाइफच बेक्कार आहे, आपल्याला फार छळतं जगणं तेव्हा तेव्हा या वेडची गोष्ट नक्की आठवावी अशीच आहे.

वयाच्या सोळाव्या वर्षी त्याला टेस्टीक्युलर कॅन्सर झाला. जगण्या मरण्याचा प्रश्न. ऐन तारुण्यात पुरुषांना होणाऱ्या या कॅन्सरने वेडचं क्रिकेट करिअरचं स्वप्नही संपवलंच होतं. पण, योग्यवेळी उपचार मिळाले, किमोथेरपी घेऊन तो ठणठणीत बरा झाला. त्यानं आपल्या फिटनेसवर जिद्दीनं काम केलं. दरम्यान तो प्लम्बिंगचं काम शिकला. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत स्वतःला व्यग्र ठेवू लागला. त्याचकाळात उपचारादरम्यान त्याचे केस गळाले होते. समवयस्क मुलांमध्ये मिसळणं अवघड वाटायचं म्हणून तो एकेकटाच रहायचा. मात्र या साऱ्यातूनही तो बाहेर पडला..आणि पुन्हा त्यानं क्रिकेटचा हात धरला, हॅन्डग्लोव्हज घालून पुन्हा मैदानात परत आला. त्याकाळी तो विकेटकिपिंगवर लक्ष केंद्रित करत होता. पण, त्याच्या लक्षात आलं की, टीम पेन हा उत्तम कीपर आहे, आपण स्पर्धेत त्याच्यापेक्षा कमी आहोत.

डोमेस्टिक क्रिकेट खेळतानाच मग तो स्वतःच्या बॅटिंगवर जास्त लक्ष देऊ लागला. त्याच्याकडे मोठे शॉट मारण्याची कला आणि ताकद होती. त्याने घरगुती क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्या. २०११ वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध क्वार्टर फायनल हरल्यावर ऑस्ट्रेलिया संघात मोठे बदल झाले. जुनी मोठी नावे निवृत्त झाली. ऑस्ट्रेलियाला ॲडम गिलख्रिस्ट नंतर कोण याचं उत्तर मॅथ्यू वेडमध्ये मिळालं. २०१२ मधील भारत, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या गाजलेल्या सिरीजमध्ये मॅथ्यू वेडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याच वर्षी त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यावर संधी मिळाली पण, ती प्रमुख विकेट किपर हॅडिनच्या बॅकअप रुपात. नियतीने पुन्हा अनुकूल फासे टाकत त्याला इथे पुन्हा संधी दिली. हॅडिनने वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली, वेडने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. शेवटच्या टेस्टमध्ये सेंच्युरी मारत मिळालेल्या संधीचं सोनं केलं. बॅटिंग तर, तो दणक्यात करतोच मग, त्याला आपसूकच आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्सकडून कॉण्ट्रॅक्ट मिळालं. पण, त्याचा खेळ याच काळात वरखाली करतच होता. संघात आतबाहेर सुरुच होतं. त्यात त्याच्यासमोर अजून एक संकट आव्हान म्हणून उभं होतंच.

मॅथ्यू वेड कलर ब्लाइंड आहे. त्याला डे अँड नाईट मॅचमध्ये बॉल बघताना विशेषतः गुलाबी बॉल बघताना अडचण होते. मात्र तरीही त्यानं जिद्द सोडली नाही, डे-नाइट फॉरमॅटमध्येही त्यानं दणकून रन्स केले. मात्र २०१८ नंतर वेड त्याच्या अनियमित परफॉर्मन्समुळे संघाबाहेर गेला. फारच त्याच्या बेभरवशाच्या खेळावर टीका झाली. पण, त्या काळातही तो शांत होता. संघाबाहेर बसला त्याच काळात तो क्रिकेट सोडून सुतारकाम शिकला. सिमेंट, लाकूड, स्क्रू फिट करणे यात रमला. सर्वसामान्य माणूस रोज कसं काम करतो, कशी मेहनत करतो, हे तो त्यातून शिकला. याकाळात त्याला त्याच्या बायकोची साथ मिळाली. किंवा तिच्यामुळेच तो ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन करू शकला असं म्हणता येईल.

ती प्रेग्नंट असताना मॅथ्यूला ऑस्ट्रेलिया ए टीममधून खेळण्यासाठी कॉल आले असताना त्याने त्याच्या बायकोला फोन रिसिव्ह करून तो खेळण्यास उपलब्ध नाही असं सांगण्यास सांगितलं. पण, त्याच्या बायकोने वेगळंच केलं. तिने तिच्या डॉक्टरला फोन करून बाळाची डिलिव्हरी वेळेआधीच करायला सांगितली. जेणेकरून मॅथ्यूला खेळायला जाता येईल. ठरल्या वेळेआधीच डिलिव्हरी झाली. त्यांना मुलगी झाली, तिचं नाव त्यांनी गोल्डी ठेवलं. आणि मॅथ्यू वेड ॲशेस खेळायला गेला.

इतकं बेभरवशाचं आयुष्य जगणारा किंवा जगणं सतत त्याला परीक्षेला बसवत असतानाही तो खेळतो. बिनधास्त. मस्त असतो. जमलं तर, जमलं, नाहीतर रमतो स्वत:च्याच विश्वात..आताही नाही का सेमीचं रिंगण ओलांडून देत त्यानं संघाला फायनलपर्यंत पोहोचवलं..आणि तो पुन्हा आपलं नाकासमोरचं बेभरवशाचं जगणं एन्जॉय करायला मोकळा..

टॅग्स :T20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१T20 Cricketटी-20 क्रिकेटAustraliaआॅस्ट्रेलिया