- अभिजित पानसे
‘कराटे किड’ या जॅकी चॅनच्या जगप्रसिद्ध सिनेमात एक दृश्य आहे.मिस्टर हान हा कराटेगुरु 12 वर्षाच्या ड्रे पार्करला कराटे शिकवायला सुरुवात करण्याआधी सांगतो की, जॅकेट जमिनीवर टाकायचं, खुर्चीवर टांगायचं, स्माइल करायचं, परत घालायचं.आपल्याला कराटे शिकायचं आहे आणि हे काय भलतंच शिक्षक शिकवतोय असं म्हणत तो मुलगा वैतागतो.पण इलाज नसतो, ते उत्तम जमेर्पयत त्याला ते करावंच लागतं. सातत्य आणि सकारात्मक वृत्तीचं हे ट्रेनिंग जॅकेट घालणं-टाकणं यातून नकळत सुरूहोतं.कराटे किड सिनेमा आठवला तो राफेल नदालच्या निमित्ताने. त्यानं फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली तेव्हा वाटलं हा मुलगाही तर असाच घडला आहे, कष्ट आणि सातत्यातून.राफेल नदाल हा कराटे किड नाही टेनिस किड आहे. खरं तर त्याला क्ले किड म्हणणं योग्य ठरेल. कारण माती आणि त्याच्यात खास बॉँडिंग आहे.राफेल नदालच्या काकांनी त्याला बालवयातच टेनिस शिकवताना त्याच्यावर माणुसकीचेही संस्कार केले. राफलने त्याच्या आत्मचरित्रात सांगितलंय की, त्याचे काका म्हणजेच त्याचे कोच अत्यंत कडक, शिस्तप्रिय होते.यामुळेच यशाची हवा राफेलच्या डोक्यात गेली नाही. पाय जमिनीवर राहिले. राफेलची नाळ मातीशी पक्की राहिली. या मातीनेच त्याला यशाचं सोनं प्राप्त करून दिलं. टेनिसमधील एकूण चार मोठय़ा टुर्नामेंट या ग्रँड स्लॅम असतात. नव्या वर्षाच्या सुरु वातीला ऑस्ट्रेलियन ओपन जी कडक प्रांगणात खेळली जाते, त्यानंतर मातीच्या प्रांगणात खेळली जाते ती फ्रेंच ओपन स्पर्धा, त्यानंतर साधारणत: जून-जुलैमध्ये गवताच्या कोर्टावर विम्बल्डन स्पर्धा होते व ऑगस्ट -सप्टेंबरमध्ये यूएस ओपन स्पर्धा होते.
( अभिजित ब्लॉगर आहे.)