शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

वाट्टेल तेव्हा झोपून वाट्टेल तेव्हा उठताय? मग हा आजार होऊ शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 06:00 IST

झोप वैरी झाली तर मूडबदल नावाचा आजार तरुण मुलांना का छळतोय?

ठळक मुद्देभ्यास सांगतोय की तुम्हाला आरोग्य, आनंद आणि मानसिक शांतता हवी असेल तर निदान झोपेच्या वेळा तरी पाळा.

- निशांत महाजन

आताशा अ‍ॅपची क्रेझ तरुण मुलांमध्ये उरलेली नाही. तरीही सध्या स्लीप अ‍ॅप चर्चेत आहे. म्हणजे काय तर शांत झोप यावी म्हणून मदत करणारी अ‍ॅप्स. गाणी, सुदिंग म्युझिक, झोप येण्याच्या सूचना असं बरंच काही त्या अ‍ॅपवर असतं. किती तास झोपलात, किती गाढ झोप लागली याची रेकॉर्डही ते अ‍ॅप ठेवतात. पण म्हणजे अंथरूणावर पडलं, तोंडावर पांघरूण ओढलं आणि ढाराढूर झोप लागली, पडल्या पडल्या झोप लागली ही इतकी साधी गोष्ट करायची तरी अनेकांना मदत लागते. त्याचं कारण न येणारी झोप ! बरं त्यात काही सगळेच प्रेमात पडलेले नसतात, त्यामुळे प्यार में निंद उड गयी असं म्हणण्याचीही सोय नाही. झोप भलत्याच गोष्टींनी उडालेली असते. आणि ज्यांना कमी झोप लागते त्यांना हायपरटेन्शन, चिडचिड असे त्रास होतात यावर मोठमोठय़ा जर्नल्समध्ये आता लेख प्रसिद्ध होऊ लागलेत.पण जाते कुठं ही झोप?त्याचं होतं असं की आपण तरुण असतो, बिनधास्त असतो. रात्री जागरणं करतो, सिनेमे पाहतो, पाटर्य़ा करतो, गप्पा मारत बसतो, जमलं तर अभ्यास करतो. आणि पहाटे कधीतरी झोपतो, दुपारी उठतो. कधी तर संध्याकाळीही उठतो. काहीजण तर बारा वाजून गेल्याशिवाय उठतच नाहीत. हे सारं करणं अनेकांना ‘कूल’ वाटतं. भल्या पहाटे उठून खुडबुड करणारे आईबाबा तर महाबोअर वाटतात. लवकर उठणं आवडत नाही. आणि उठलेच कधी तर उठून करणार काय असा प्रश्न पडतो. पण आता जीवनशैलीचा अभ्यास असं म्हणतो की, जर तुम्ही लवकर झोपेतून उठत नसाल किंवा रोजच तुमच्या झोपेच्या वेळा बदलत असतील तर तुमचे जबरदस्त मूडस्विंग्ज होतात. आणि तुमचे दिवसाच्या दिवस वाईट जातात. आणि त्यानं तुमच्या करिअरवर कायमचा वाईट परिणाम होतो.मेसेच्युसेट्ेस इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंगने केलेल्या एका अभ्यासानुसार हे निरीक्षण पुढं आले आहे. त्यांनी आपल्या कॉलेजमध्ये शिकणार्‍याच मुलांचं एक सव्र्हेक्षण केलं. या मुलांना फक्त त्यांच्या झोपेच्या वेळेच्या नोंदी सलग 36 दिवस ठेवायला सांगण्यात आल्या. त्यातून एक रेकॉर्ड तयार झालं जे असं दाखवतं की रोज एकाच वेळी झोपणारे आणि एका ठरावीक वेळीच उठणारे तरुण मुलं अत्यंत कमी आहेत. बाकीचे सारे रोज वाट्टेल तेव्हा झोपतात, वाट्टेल तेव्हा उठतात. अनेकांचं झोपेचं ठरलेलं असं काही शेडय़ुल नाहीत. त्यातून या मुलांचं झोपेचं चक्र बिघडतं. त्यातून पचनाचं तंत्रही बिघडतं. त्याहून वाईट म्हणजे ज्यांचं झोपेचं चक्र बिघडतं, त्यांचा मूड अनेकदा दिवसभर चांगला नसतो. ते चिडचिडतात. उदास असतात. कधी आक्रमक असतात. त्यांचे प्रचंड मूड स्विंग्ज होतात. आणि त्यांचं कामावरचं लक्षही उडालेलं असतं. परिणाम म्हणून त्यांच्या दिवसभराच्या कामाचा दर्जा बिघडतो. आणि एकूण प्रगतीवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून हा अभ्यास सांगतोय की तुम्हाला आरोग्य, आनंद आणि मानसिक शांतता हवी असेल तर निदान झोपेच्या वेळा तरी पाळा.तसं फार अवघड नाही ते !