झोपेचं मोबाइल खोबरं
By Admin | Updated: July 14, 2016 22:50 IST2016-07-14T22:50:44+5:302016-07-14T22:50:44+5:30
‘काय झोपाळल्यासारखा दिसतोस, किती डल? काल मी रात्री साडेतीन वाजता झोपलो आणि आता ऑफिसमध्ये 10 च्या ठोक्याला काम सुरू केलंय.!’

झोपेचं मोबाइल खोबरं
- पूजा दामले
झोपच पूर्ण होत नाही,
सकाळी फ्रेश वाटत नाही
ही अनेकांची तक्रार.
पण याला जबाबदार कोण?
‘सकाळी सातचं लेक्चर, किती बोअर टाय्मिंग आहे यार.. कशाला एवढय़ा भल्या पहाटे लेक्चर झाडतात?’
‘काय झोपाळल्यासारखा दिसतोस, किती डल? काल मी रात्री साडेतीन वाजता झोपलो आणि आता ऑफिसमध्ये 10 च्या ठोक्याला काम सुरू केलंय.!’
- हे असे संवाद हल्ली आपण सतत ऐकतो. रात्री जागरण करण्याला, जागं राहण्याला, नाइट आउट एन्जॉय करण्यापासून रात्र रात्र चॅटिंग, फेसबुक, व्हॉट्सअॅपवर असण्याला हल्ली ग्लॅमर येत चाललं आहे. रात्री उशिरार्पयत जागणं आणि सकाळी (की दुपारीच?) उशिरा उठणं हे तरुणाईचं लाइफस्टाइल स्टेटमेण्ट बनलं आहे.
सकाळ झाली की रुटीन काम. कॉलेज, अभ्यास, मित्रमैत्रिणींबरोबर टीपी, क्लास, कट्टा अशा सर्व आघाडय़ांवर कसरत करत अनेकांचा दिवस संपतो खरा; पण रात्री घरी आल्यावर पुन्हा एक नवा दिवस सुरू होतो. रात्री जेवण झालं की घरातील अनेक तरुण मंडळी लगेचच मोबाइल हातात घेतात किंवा लॅपटॉप ओपन करतात. सर्वसाधारणपणो साडेदहा अकराच्या सुमारास चॅटिंग, फिल्म, पॉर्न बघणो, गर्लफ्रेंड अथवा बॉयफ्रेंडशी फोनवर बोलणं सुरू झालं की रात्री मध्यरात्रीर्पयत आणि काहीवेळा पहाटर्पयत हे सुरूच राहतं. हे फक्त काही स्पेशल डेजपुरते मर्यादित राहत नाही, तर हे नित्यनियमानं रोज सुरू असतं. आणि प्रेमात पडलेल्यांचं तर विचारूच नये. इतकं अखंड फोनवर बोलत जागरण होतं.
लवकर उठे, लवकर निजे हे जुनं टिपीकल वाक्य वाटतं अनेकांना. आणि आपल्या झोपेचा आपल्या आरोग्याशी काही संबंध असतो. आपल्या कामाशी, स्वभावाशी आणि उत्तम परफॉर्म करण्याशीही संबंध असतो हे मात्र पटत नाही.
पण तो असतो हे खरं.
यासंदर्भातला एक अभ्यास नुकताच वेस्टर्न ऑस्ट्रेलियातल्या एका विद्यापीठातल्या सेण्टर फॉर स्लिप सायन्सनं केला आहे.
देशातल्या टॉपमोस्ट बास्केटबॉल महिलांच्या टीमच्या झोपेच्या पॅटर्नचा त्यांनी अभ्यास केला. मॉर्निग पर्सन आणि नाइट ओल (म्हणजेच सकाळी लवकर सहज उठून काम करणारी आणि रात्री जागून काम करण्याची क्षमता जास्त असलेली) असे दोन गट त्यांच्या स्वभावाप्रमाणं करण्यात आले. प्रत्येकीला आपापल्या झोपेचं रेकॉर्डही ठेवण्यास सांगण्यात आलं. त्या सा:या माहितीचं विश्लेषण करून असं सांगण्यात आलं की, ज्यांची झोप उत्तम त्यांचा खेळण्यातला परफॉर्मन्स जास्त चांगला होतो आहे.
या अभ्यासानं या खेळाडूंना काही साधेसोपे बदलही करायला सांगितले.
म्हणजे झोपताना काही साध्या गोष्टी करायच्या.
झोपण्यापूर्वी तासभर आधी सारी इलेक्ट्रॉनिक उपकरणं बंद करायची.
काही बोलायचं नाही ऑनलाइन.
मेंदू शांत आणि मन शांत, निवांत झालं तर झोप चांगली लागते आणि त्यानं आपली कामगिरीही सुधारते.
हे सारं वाचून हे लक्षात येतं की, अकारण जागत बसणं, चॅट करणं, वाद घालणं आणि बोलत सुटणं हे आपल्या तब्येतीसाठीच नाही, तर मानसिक आरोग्यासाठीही घातक आहे.
त्यामुळे आपण रात्री कसे जागतो याची फुशारकी मारण्याआधी स्वत:चा विचार केलेला बरा!