The show off! dangerous for career. | शो ऑफ ? करिअरला घातक ठरू शकतो. सावधान.

शो ऑफ ? करिअरला घातक ठरू शकतो. सावधान.

ठळक मुद्दे अति करण्याच्या नादात आपण आपली बदनामी करत नाही, आपली ब्रॅण्ड व्हॅल्यू गमवत नाही?

-नितांत महाजन

हल्ली आपण सगळेच स्वतर्‍विषयीच बोलतो. सोशल मीडियात तर फारच बोलतो. सतत माझं कसं भारी चाललेलं आहे ते सांगतो. स्वतर्‍विषयी बोलणं आणि चमकोगिरी करणं यात फरक आहे. सतत मी-माझं-माझ्यामुळे करत राहिलं तर इतरांना उबग येतोच; पण त्यामुळे आपली सोशल मीडियातली इमेज बदलते. बिघडते.
एक लक्षात ठेवायला हवं की आपणच आपला ब्रॅण्ड आहोत. आपल्याला आपला ब्रॅण्ड घडवायचा आहे. तो घडवताना तो उथळ करायचा की, अत्यंत सिन्सिअर आणि नेमका प्रामाणिक हे आपल्याला ठरवायला हवं.  आपण आपलं स्वतर्‍चं ब्रॅण्डिंग करणं काही चूक नाही. ब्रॅण्डिंग करण्यात काही गैर नाही. आपण चांगलं काम करतो तर ते काम लोकांर्पयत, आपल्या क्षेत्रातील माणसांर्पयत पोहचणं, आपली एक उत्तम ओळख अर्थात इमेज बनवणं हे सारं नव्या काळात अत्यंत महत्त्वाचं आहे. ते करायलाच हवं.
आणि आपण केलं नाही तर ते आपल्यासाठी कोण करणार? मात्र अति करण्याच्या नादात आपण आपली बदनामी करत नाही, आपली ब्रॅण्ड व्हॅल्यू गमवत नाही, याकडे लक्ष हवं. लोक आपली टिंगल करतात की आपलं कौतुक यापलीकडे जाऊन आपल्याला कसं जोखतात याकडे लक्ष द्यायला हवं.

1) सोशल मीडिया फ्रेण्ड्स
त्यांना आवरा, आपली टिंगल करणारे, आपल्या कामाचा आदर नसणारे, वाट्टेल ते बरळणारे, अतिच राजकारण बोलणारे सगळे बाहेर काढा.
2) सोशल मीडियात मत मांडाल. एखादी कमेण्ट कराल तर ते अभ्यास करून लिहा. राजकारणावर टिपणी करण्याच्या नादात आपण आपल्या पायावर कुर्‍हाड मारतोय का हे पहा. 
3) जे लिहाल ते कायमचं आहे, त्यामुळे वाट्टेल ते पोस्ट करू नका. 
4) आपले पर्सनल फोटो, पाटर्य़ातले फोटो, नातेसंबंध याचं प्रदर्शन अजिबात करू नका. आपलं प्रोफेशनल प्रोफाइल आहे हे लक्षात ठेवा. 
5) कुणाशीही भांडू नका. ज्ञान देऊ नका. आपल्या कामावरची टीका पचवा.

 

Web Title: The show off! dangerous for career.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.