शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

सागर काबरा

By admin | Published: May 26, 2016 11:43 PM

मेळघाटातील धडक मोहिमांविषयी त्यानं कॉलेजात शिकत असतानाच ‘ऑक्सिजन’ पुरवणीत वाचलं होतं.

 - डॉ. प्रियदर्श तुर

(gracilis4@gmail.com)

 

‘मैत्री’ स्वयंसेवी संस्थेच्या

मेळघाटातील धडक मोहिमांविषयी 

त्यानं कॉलेजात शिकत असतानाच 
 ‘ऑक्सिजन’ पुरवणीत वाचलं होतं. 
त्या माहितीनं प्रेरणा घेत 
तो सलग सहा वर्षे 
या धडक मोहिमांत सहभागी झाला.
मित्रंनाही त्यानं प्रेरणा दिली.
आणि डॉक्टर झाल्यावरही
छत्तीसगडमधल्या गानियारीमधल्या
आदिवासी, दुर्गम भागातल्या दवाखान्यात
सेवा देणं सुरू केलं.
आपलं सारं आयुष्य 
ग्रामीण रुग्णसेवेसाठी द्यायचं ठरवलेल्या
या 26 वर्षाच्या संवेदनशील दोस्ताचं
अलीकडेच अपघाती निधन झालं.
 
काही लोकांचं जगणं असं असत की ते जेव्हा असतात तेव्हा लोकांच्या जीवनात बहार आणतात आणि जेव्हा ते जातात तेव्हा अनेक प्रश्न मागे सोडून जातात. 
सागरचं जीवन पण असंच एक उदाहरण होतं.
डॉ. सागर हनुमानदासजी काबरा, वय 26 वर्षे, रा. मानवत, जिल्हा परभणी. 
त्याचे आजोबा स्वतंत्रता सेनानी होते. घरात आई, वडील आणि दोन बहिणी. लहानपणापासूनच दुस:यांबद्दल संवेदनशील राहण्याचे संस्कार त्याला घरात लाभले. आणि त्याच्या दुस:यांना सतत मदत करण्याच्या स्वभावाला अनुसरून डॉक्टर व्हायचं त्यानं ठरवलं. भरपूर अभ्यास करून यवतमाळच्या श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशही मिळवला. कॉलेजमध्ये असताना अभ्यासासोबतच आपण समाजासाठी काय करू शकतो, याचा शोध त्याचं मन घेत राही. 
 मैत्री नामक एक स्वयंसेवी गट मेळघाटात धडक मोहिमा राबवते हे त्यानं ‘ऑक्सिजन’ पुरवणीत वाचलं होतं. त्या माहितीनं प्रेरणा घेत तो सलग सहा वर्षे या धडक मोहिमेत सहभागी होत होता. इतरांना मोहिमेत येण्यासाठी प्रोत्साहन देत होता. ¬ 3 3ँी स्रीस्र’ी ंल्ल ि’्र5ी ेंल्लॅ 3ँीे अशी स्वप्नं बघत तो या सा:या कामात सहभागी झाला.
2क्1क्च्या धडक मोहिमेमध्ये मैत्रीचं काम 9 गावांपासून 15 गावांत आणि 2क्11 मध्ये 35 गावांत पोहोचलं. या पूर्ण काळात या पूर्ण गावांमध्ये 3 ते 4 बालमृत्यू आणि एक ही मातामृत्यू झाला नाही. सागर आणि त्याच्या मित्रंसह ‘मैत्री’साठी हे एक मोठं यश होते. या नंतरही त्यांचे हे काम चालू होते. सागरचं हे काम बघून त्याला ‘निर्माण’  या डॉ. अभय आणि राणी बंग यांनी सुरू केलेल्या उपक्रमात सामील होण्याची संधी मिळाली. निर्माणमुळे त्याला वैचारिक स्पष्टता आली आणि आपणही असंच काहीतरी करावं, असं त्याला वाटायला लागलं.
आपल्या समवयीन, युवामित्रंचा आपल्याच समाजाविषयी असलेला नैराश्यवाद बघून तो ब:याच वेळेस व्यथित व्हायचा. म्हणून मग त्यानं आणि त्याच्या मित्रंनी मिळून शिबिरं घ्यायला सुरुवात केली. या शिबिरांमधून स्वत:च्या शोधापासून तर समाजातील प्रश्नांबद्दल चर्चा व्हायला लागल्या. काहीतरी करून पाहू म्हणणारे कृतिशील मित्र त्याला भेटत गेले. 
हे सर्व सुरू असतानाही अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष देत त्याने त्याची एमबीबीएसची डिग्री वेळेत पूर्ण केली. मात्र त्यानंतर पीजी, नंतर लग्न, स्वत:चा प्रायव्हेट दवाखाना आणि मग पैसा कमवणं या घोडेबाजारातील समीकरणात पडायचं नाही इथपर्यंतचा निर्णय त्यानं घेतला होता. पण हे नाही तर मग पुढे नेमकं करायचं काय? या प्रश्नाचं उत्तर अजूनही त्याला स्पष्ट नव्हतं. आपल्या समाजात डोळे झाकून चाललेल्या विषमतेमुळे त्याची सारखी चीड चीड व्हावी. एकीकडे शहरात गल्ली बोळात दवाखाने, डॉक्टरांच्या भाषेत सॅच्युरेशन आणि दुसरीकडे निमोनिया, हगवणी सारख्या साध्या आजारांनी शेकडो बालमृत्यू व्हावेत, एकीकडे बाळंतपणात दुखू नाही म्हणून सिझर आणि दुसरीकडे आईला स्वत:च बाळाची नाळ दगडाने ठेचून तोडावी लागतेय. केवढी ही विषमता! पैसा नसल्याने रु ग्णाचे होणारे हाल आणि अख्या कुटुंबाची होणारी फरफट त्याच्या नजरेआड होईना. दुस:यांना भाषणं देऊन जग बदलणार नाही याची पुरती कल्पना एव्हाना त्याला आलेली होती. ‘बी द चेंज यू वॉण्ट’ हे वाक्य आता त्याच्या रक्तात धावायला लागलं होतं. आणि मग त्यानं सुरुवात स्वत: पासूनच करायचा निर्णय घेतला.
छत्तीसगढमधील, ग्रामीण आणि आदिवासी भागातील गानियारी येथील जनस्वास्थ्य सहयोग या दवाखान्यात त्यानं सेवा देण्यास सुरुवात केली. सोबतच आजूबाजूच्या गावांत जाऊन लोकांशी बोलणं, त्यांना समजून घेणं, रोगांबद्दल माहिती देणं, उपचार आणि फावल्या वेळेत वाचन अशी सर्व त्याची कामाची पद्धत. रु ग्णांप्रती असलेल्या  संवेदनेने केवळ रु ग्ण बरे होत नाहीत, त्यासाठी तांत्रिक ज्ञान आणि कौशल्यही शिकत राहावी लागतात, म्हणून त्यानं उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.
सर्व दुनिया स्पेशलायङोशनकडे धावत असताना, माङया देशाच्या ग्रामीण, गरीब, माय-बापडय़ाची गरज स्पेशलायङोशन नसून, स्पेशलायङोशन इन जनरलेझायशन आहे. आज असं म्हणत पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी नॅशनल एण्ट्रन्स देऊन फॅमिली मेडिसीन या दुर्लक्षित शाखेत त्यानं त्याच ग्रामीण दवाखान्यात प्रवेश घेतला.
तो कामात काहीही कसर सोडत नव्हता. बरे होणारे रु ग्ण दुवा देत होते. आपल्या देशाची आरोग्यसेवा अगदी शेवटच्या माणसार्पयत कशी पोहचवू, असे प्रश्न पडायला लागली होती. प्रश्न जसा पर्वतासारखा तशी स्वप्नेही पर्वतासारखीच पडायला लागली होती. कविता कागदांवर उतरायला लागल्या होत्या. 
वर्षभर त्यानं तिथं काम केलं. आणि 8 मे 2क्16 रोजी दवाखान्यातील एका नर्सचा विवाहसोहळा बिलासपूरला होणार होता. त्यासाठी तो गेला होता. तिथून मोटारसायकलने परतताना समोरून भरधाव येणा:या कारनं सागर आणि त्याच्या मित्रंना उडवलं. अपघात एवढा भीषण होता की, मोटारसायकलचं फक्त इंजिनच सापडलं. सागरच्या उजव्या पायाची अर्धी हड्डी तुटून बाहेर पडली, डोक्याला मार आणि छातीच्या बरगडय़ाही मोडल्या. सोबतच्या मित्रंनाही गंभीर जखमा. साधारण 45 मिनिटं सर्व रक्ताच्या थारोळ्यात, रस्त्यावरच बेशुद्ध पडून होते. कारचा चालकही पळून गेला. जमली फक्त 
5क्-6क् लोकांची, बघ्यांची गर्दी!!
अधून-मधून कॅमे:याचे फ्लॅश चमकत होते. कोणाच्या तरी मोबाइलमुळे दवाखान्याच्याच एक कर्मचा:याच्या नजरेस ते अपघाताचे फोटो पडले आणि 45 मिनिटांनंतर जखमी दवाखान्यात पोहचू शकले. पण सागर पुन्हा आमच्यार्पयत पोहचू शकला नाही..
26वर्षाच्या कोवळ्या वयात, वयापेक्षा जास्त समजदार असलेला सागर सोडून गेला, खरं तर जावं लागलं हे म्हणणं जरा जास्त योग्य. आज त्याच्या नसण्याला, गाडीचा चालक जास्त जबाबदार होता की ती बघ्यांची गर्दी हे प्रश्न आहेतच.
समाजासाठी तळमळीनं काम करणारा, स्वप्न पाहणारा सागर असा अकाली गेला, आपल्या समाजाचंच हे एक मोठं नुकसान आहे.
 
 
रोंगटे खडे हो जाते है मेरे,
जब मैं देखता हू खुले आसमां में, 
तिरंगा शानसे लहरा रहा हैं,
मेरी आंखे भी व्यस्त किसी उडान में। 
मुङो वक्त कहा हैं नीचे देखने का?
 
मुङो अभिमान है मेरे देश का,
जिसने मुङो एक गौरवपूर्ण पहचान दी। 
मुङो आसमान में उडने की आजादी थी,
पर.. इनके भाग्य में क्यू बरबादी थी?
 
आजादी.. जो मुङो सपने देखने की,
उन्हे साकार करने की इजाजत देती है। 
पर वो मुङो क्यू नहीं सिखाती की,
देश की आधी आबादी भूखी सोती है?
 
आजादी, जो मुङो कामयाबी का जश्न 
मनाने देती है खुशी से, 
फिर भी क्यू हमारे अन्नदाता-
खुद को समाप्त करते है
- खुद्खुशी से?
 
मेरे श्रेष्ठतम संविधान ने 
सभी को एक समान आजादी का हक दिया है;
यह मैने स्कूल मे पढा था। 
फिर क्यू एक तरफआसमान को छूती इमारते,
और चांद पर बसते सैटेलाईट;
तो दुसरी तरफ गरिबी और अन्याय से दबे लोग,
सुलगता गुस्सा, 
और पनपते नक्सलाइट?
 
आजादी वो नहीं जो दुसरो का हक छिनकर
हमें औरोसे श्रेष्ठ दिखाती हैं। 
आजादी वो है, जो हमें 
दुसरो की आजादी का भी
 
 
 
( अनुवाद- डॉ. धीरज देशमुख)
dhirajvd60@gmail.com