राधा आणि मल्लम्मा
By Admin | Updated: July 21, 2016 19:52 IST2016-07-21T19:52:30+5:302016-07-21T19:52:30+5:30
खेडय़ात राहणा:या दोन मुली, शाळा-कॉलेजात शिकणा:या. त्यांच्या कर्तबगारीच्या कहाण्या

राधा आणि मल्लम्मा
खेडय़ात राहणा:या दोन मुली,
शाळा-कॉलेजात शिकणा:या.
त्यांच्या कर्तबगारीच्या कहाण्या,
हा नव्या हिमतीचा एक चेहरा आहे.
8 जुलै 2016.
सोलापूर जिल्ह्यातल्या उपळवाटे नावाच्या लहानशा गावातली राधा. दूरच्या गावात शिकायला जाणारी, रोज पायपीट करणारी. वैतागून तिनं ठरवलं गावात एसटी आलीच पाहिजे. आणि मग जिद्दीनं भांडून तिनं गावार्पयत एसटी आणलीच!
***
15 जुलै 2016.
कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यात दाणापूर गावात राहणारी मल्लम्मा. एक शाळकरी मुलगी. घरात संडास बांधा म्हणून हट्ट करत ती घरच्यांच्या विरोधात उपोषणाला बसली. 15 वर्षाची मल्लमा बागलपूर. ती सांगते, शाळेत मला शौचालय आणि स्वच्छतेची माहिती मिळाली. पण घरी पैशांची चणचण आहे. त्यामुळे आईने शौचालय बांधायला नकार दिला. दलितांना शौचालय बांधण्यासाठी 15 हजारांचं सरकारी अनुदान मिळतं असं मी तिला सांगितलं. तेव्हा ती म्हणाली की, शौचालय हे श्रीमंत लोकांसाठी असतात. तेव्हा मी उपोषणाचा निर्णय घेतला.
तिच्या उपोषणाची बातमी ऐकून यंत्रणा हलली आणि खुद्द जिल्हा परिषदेचे सीईओ आर. रामचंद्रन तिच्या घरी अनुदानाची रक्कम घेऊन हजर झाले!
***
या दोन मुलींच्या कहाण्या काय सांगतात?
एकतर आपले प्रश्न सुटावेत म्हणून आपण आता बोललं पाहिजे, प्रसंगी भांडलं पाहिजे.
आणि दुसरं म्हणजे व्यवस्थेला जाब विचारला तर आता व्यवस्था आपल्या दारार्पयत येऊन आपले प्रश्न सोडवते, निदान तसा प्रय} तरी करते.
फक्त त्यासाठी हे प्रश्न सरकार सोडवेल किंवा दुसरं कुणीतरी सोडवेल, आपल्याला काय करायचं असा पळपुटेपणा न करता आपण उभं राहायला हवं, बोलायला हवं आणि जाहीरपणो भूमिका घेत ठामपणो आपले हक्क मागितलेही पाहिजेत.
तुम्ही म्हणाल हे सोपं असतं का?
सोपं कसं असेल?
- असेल तर अवघडच, पण अशक्य नाही.
खेडय़ापाडय़ातल्या या दोन तरुण मुलींनी हिंमत केली तेव्हा सुटलेच ना त्यांचे प्रश्न.
त्या प्रश्नांची आणि जिद्दीची एक भेट.
- ऑक्सिजन टीम