- डॉ. वृंदा भार्गवे
काही वर्षापूर्वीची गोष्ट. माझ्या मैत्रिणीने तिच्या मुलीला शाळेतून काढून घरीच शिक्षण दिलं. मुलगी बुद्धिमान होती. भरपूर मार्क्स मिळवले. दहावीनंतर दोन वर्षे कॉलेज लाइफ एन्जॉय करायचं असं तिने ठरवलं. पण एक वर्षात त्यातला फोलपणा तिला कळला. बारावीत कला शाखेत नव्वद टक्के मिळवल्यावर कॉलेजला न जाता बाहेरून पदवी मिळवायची हे तिनं पक्कं केलं.पदवीचं शिक्षण घेत असतानाच स्वराज युनिव्हर्सिटीबद्दल तिला समजलं. हटके करण्याचा तिचा स्वभाव. तिथला एक टास्क तिच्या कायम स्मरणात राहिलेला.प्रत्येकाला केवळ एक सायकल देण्यात आली, बाकी एक पैसाही न देता त्यांना एका खेडय़ात भ्रमंती करण्यास सांगितलं. तिथं सात दिवस राहायचं. जगण्यासाठी कमाईचा पर्याय तुम्हीच शोधा, वापरा स्वत:ची स्कील्स असं ते आव्हान होतं.त्या सात दिवसात जाणिवांचा पासवर्डच तिला गवसला. सहवेदना, संवेदना, आत्मविश्वास, जबाबदारी, संभाषण कौशल्य, स्मरणशक्ती या झाल्या जमेच्या बाजू; पण तेव्हा तिला जाणवलं, अरे आपल्याला सायकलचं पंक्चर काढता येत नाही. विहिरीवरचं पाणी रहाटातून काढण्यासाठी शक्ती नाही. शेणानं सारवता येत नाही. गाव कधी पाहिलं नाही, पाळीव प्राण्यांशी दोस्ती नाही. अर्थात तिनं जे येत नाही त्याचा स्वीकार केला. यादी केली. जे येत होतं त्यात निष्णात झाली जे येत नव्हतं ते शिकून घेण्यातली तत्परता दाखवली. पुढे टीआयएसएसला प्रवेश मिळायला या सगळ्याचा तिला प्रचंड फायदा झाला. ज्यांना तिच्या एवढे मार्क्स नव्हते त्यांनीदेखील टाटा इन्स्टिटय़ूटमध्ये प्रवेश मिळवला कारण संशोधन आणि नावीन्याची आस याचा प्रगल्भतेने वापर करण्याची त्यांची क्षमता.
निव्वळ पदव्या भारंभार मार्च 2020 मध्ये 8.7 टक्क्यांवर असलेला बेरोजगारीचा दर एप्रिल महिन्यात 23.5 टक्के झाला. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडिया अॅण्ड इकॉनॉमीने जाहीर केलेली ही आकडेवारी. थोडे सोपे बोलायचे झाल्यास येथून पुढच्या काळात नोक:या मिळणं केवळ दुरापास्त. हा काळ घर हाच कट्टा करत ज्यांनी, सुमार असलेले सुमारे पन्नास तरी चित्नपट, वेब सिरीज पाहिल्या असतील नि आपला मुलगा/मुलगी काय करणार? बापुडी घरीच बसली आहे असा विचार पालक करत असतील तर त्यांनी किमान आतातरी प्रथम या तरुणांना वास्तवाची जाणीव करून द्यायला हवी. जवळपास 7.2 कोटी कामगारांचा रोजगार आज गेला आहे. साडेआठ कोटी, रोजगाराच्या शोधात आहेत त्यात या तरुणांची भर पडणार आहे. शहरी भागात बेरोजगारीचा दर 24.95 टक्के तर ग्रामीण भागात तो 22.89 टक्क्यांवर आहे. महाराष्ट्रात तो 20.9 टक्के आहे. जिथे आपण राहतो त्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत कृषिक्षेत्नाचा वाटा 9.9 टक्के तर औद्योगिक क्षेत्नाचा 30.4 टक्के वाटा आहे. मोठय़ा शहरातील उद्योग ठप्प पडले आहेत. मुंबई, पुणो, ठाणो, पिंपरी-चिंचवड येथे ही घडी बसायला वेळ लागणार. राज्यात सव्वाचार लाख लघु अन् मध्यम उद्योग आहेत. तेथील महिन्याभराची उलाढाल सव्वा लाख कोटींची आहे. 8क् लाख लोकांचा रोजगार यावर अवलंबून आहे. प्रत्यक्षात फक्त 14,781 उद्योग या काळात कोरोनाच्या प्रादुर्भावाने सुरू होऊ शकले. अनेक कुटुंब यामुळे देशोधडीला लागली. मालेगाव, भिवंडी, सोलापूर, इचलकरंजी या शहरांमधील वस्नेद्योग 30 लाख लोकांना रोजगार देणारा. 50टक्के कामगार मात्र इतर राज्यातून येथे येतात. आज हे परप्रांतीय आपापल्या राज्यात परतले. त्यामुळे मोठय़ा छोटय़ा शहरात स्थानिक मजूर-कामगार-कौशल्य प्राप्त तरुणांची नितांत गरज भासणार आहे. अशावेळेस त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी काही कंपन्या पुढे सरसावतील. तेव्हा गेल्या काही महिन्यात कोणतेच स्कील प्राप्त न केलेले तरु ण तरु णी नक्की नाकारले जातील.निव्वळ पदव्यांचा भारंभार साठा बाळगून आता उपयोग होणार नाही. आपण सेट-नेट करावे किंवा पीएच.डी. अशी महत्त्वाकांक्षा(?) असणा:यांच्या पदरी घोर निराशा येण्याचीच शक्यता. आज देशात अंदाजे सव्वादोन लाख ही परीक्षा आणि पीएच.डी. मिळवणारे आहेत. प्राध्यापकांच्या रिक्त जागा न भरल्याने तासिका तत्त्वावर काम करणा:या प्राध्यापकांची परवड भीषण नि भयावह आहे. या काळात आपण चौदा अठरा तास वाया घालवणं हा गुन्हा ठरेल.
मग नेमके करावे काय?तर गुगल गॅरेजवर सर्व प्रकारचे डिजिटल मार्केटिंग, कम्युनिकेशन, प्रेङोन्टेशन पब्लिक स्पिकिंगसारखे सर्टिफिकेट कोर्स तुम्हाला करता येतील. वऊएटवर जगभरातील व्हिज्युअल आर्ट्स जसे कॅलिग्राफी, पब्लिक आर्ट, कॉमिक आर्ट, फोटोग्राफी यासारखे 37क्क् प्रकारचे कोर्सेस करता येतील. डूइटय़ूवर सेल्फ यासारख्या चॅनलवर मेकअप, हेअरस्टाइल, फॅशन डिझायनिंगचे कोर्स प्रमाणपत्नाशिवाय शिकता येतील. ऊकउफएअळडफर येथे मशीन लर्निग-कार्पेंटर, प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, हॉर्डवेअरसारखे छोटे कोर्सेस प्रमाणपत्नाशिवाय शिकता येतील. हे किंवा यातील काही कोर्सेस वर्षभरात केले असते तरी या सगळ्याचा उपयोग लॉकडाउनच्या काळात सराव म्हणून करता आला असता.
(लेखिका विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असून, नाशिक येथील हंप्राठा महाविद्यालयात उपप्राचार्य आहेत.)