‘ब्रेक’ घ्या, तरच टिकाल!

By Admin | Updated: April 12, 2017 15:05 IST2017-04-12T15:05:20+5:302017-04-12T15:05:20+5:30

रोजचं तुमचं कामाचं शेड्यूल कसं आहे? तुमची कामाची पद्धत कशी आहे? तुम्ही बसून काम करता, उभं राहून करता की आणखी कसं?

Only take a break, only then! | ‘ब्रेक’ घ्या, तरच टिकाल!

‘ब्रेक’ घ्या, तरच टिकाल!

रोजचं तुमचं कामाचं शेड्यूल कसं आहे? तुमची कामाची पद्धत कशी आहे? तुम्ही बसून काम करता, उभं राहून करता की आणखी कसं? एकदा आॅफिसात गेलं की पर्स किंवा सॅक टाकायची ते आठ-दहा तास काम झाल्यावरच जागेवरुन उठायचं असं तुम्ही करता का? किंवा सलग एकाजागी बसून काम केल्याबद्दल तुमची वाहवा होता का? असं असेल तर थोडं थांबा... सलग खूप वेळ एकाच खुर्चीत, एकाच ठिकाणी बसून काम करण्याची नाही हे लक्षात घ्या. सतत एका जागी बसून काम करणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही. डॉक्टर आणि आरोग्यतज्ज्ञांच्या मते आॅफिसच्या कामामध्ये शक्य तितक्या वेळेस ब्रेक घेऊन तुम्ही पायांची हालचाल केली पाहिजे. यासाठी आपण आपल्या सोयीनुसार अर्धा तास किंवा पाऊण तासाचा अवधी ठरवून घ्यावा आणि लहानसा ब्रेक घेऊन पाय मोकळे करावेत असा तज्ञांचा सल्ला आहे. ब्रेक घेऊन काम करीत असाल, तर तुम्ही अधिक काळ काम करू शकाल आणि जास्त काळ ‘टिकाल’ही.. तुम्ही म्हणाल, का, असंच का? त्यानं काय फरक पडतो? त्यासंदर्भात अनेक अहवाल, अभ्यास प्रसिद्ध झाले आहेत आणि हे सारे अभ्यास हेच सांगतात, की खूप वेळ एकाच जागी बसून काम करणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये सतत संगणकासमोर बसून काम केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिडचिडेपण, डोकेदुखी, हात-पाय दुखणे, मान आणि पाठिचे विकार होत असल्याची आकडेवारी समोर आली, त्यानंतर कामामध्ये ब्रेक घेण्याची पद्धती त्यांनी सुरु केली. याबरोबरच स्टँडिंग डेस्क नावाचा प्रकारही सुरु करण्यात आला. यामध्ये तुमच्या डोळ््यांच्या उंचीसमोर संगणक येईल असे उभे टेबल तयार करण्यात येते आणि कर्मचाऱ्याला उभं राहून काम करता येईल अशी सोय केलेली असते. अर्थात काही तज्ज्ञांच्या मते सतत उभं राहून काम करणंही फायदेशीर नसतं. त्यामुळे ते बसून आणि उभं राहून अशा दोन्ही पद्धतीने काम करायला सुचवतात. कामामध्ये हे ब्रेक्स आणायचे कोठून, ब्रेकचं लक्षात ठेवायचं कसं असे प्रश्नही आपल्याला पडू शकतात. पण त्यावरही उत्तर आहे. दुसऱ्या कर्मचाऱ्यांना प्रिंटस आणायला सांगण्याऐवजी तुम्ही स्वत: उठून प्रिंटरपर्यंत चालत जाऊन प्रिंट आणू शकता. वॉशरुमला जाण्यासाठी उठल्यावर तुम्ही थोड्या पायऱ्यांवर चढ-उतार करू शकता. खाण्याचे पदार्थ तुमच्या जागेवर मागवण्याऐवजी तुम्ही उठून कँटिन किंवा डायनिंग हॉलमध्ये जाऊ शकता. त्याचप्रमाणे पाणी संपल्यावर जागेवर मागण्याऐवजी तुम्ही स्वत: तेथे जाऊन पाणी पिऊ शकता. यामुळे तुमचे कामही होईल आणि ब्रेकही घेता येईल. तज्ज्ञांच्या मते रोज थोडावेळ उभं राहून काम केल्यामुळे आठवडाभरामध्ये १००० कॅलरी जास्त खर्च होतात यामुळे लठ्ठपणा कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे काम करण्यास अधिक उत्साह वाटून तुमच्याकडून अधिक कामही होईल. कामात ब्रेक घेण्याचे फायदे १) कामामध्ये ब्रेक घेतल्यामुळे तुमची एकाग्रता वाढते. त्याचप्रमाणे फ्रेश वाटते. २) कामाचा ताण थोडा कमी होऊन, त्यातील लहानलहान गोष्टींकडे तुमचे लक्ष जाईल आणि चुका कमी होतील. ३) ब्रेक घेतल्यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने कामात साथ देतील. ४) ब्रेकमध्ये काही पावलं चाला, स्नायू मोकळे होण्यासाठी थोडं स्ट्रेचिंग करा, थोड्या पायऱ्यांचा चढ-उतारही केल्यामुळे स्नायू सैलावतील. काम करण्याच्या खुर्चीत कसे बसाल? बहुतांशवेळा चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे पाठीचे आजार उद्भवतात. अनेक मुलांना यामुळे पाठदुखी आणि मानदुखीचा आजार होतो. त्यामुळे बसण्यासाठीही काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आॅफिसमध्ये शक्यतो एर्गोनॉमिक खुर्च्या असाव्यात, जेणेकरुन पाठीला आधार मिळेल. १) खुर्चीत बसल्यावर शक्यतो डेस्कच्या जवळ बसा, त्यामुळे तुमचे दंड मणक्याला समांतर राहतील. तुमचे हात डेस्क किंवा की-बोर्डवर यावेत असा हाताच्या कोपरात ९० अंशाचा कोन होऊ द्या. तसा होत नसेल तर खुर्ची वरखाली करुन अ‍ॅडजस्ट करा. पाय जमिनिला टेकावेत असे बसा. २) संगणकावर बसल्यावर मिनिटभर डोळे बंद करा आणि उघडल्यावर ते संगणकाच़्या स्क्रीनच्या मध्यभागी तुमची दृष्टी स्थिर झाली पाहिजे. तसं होत नसेल तर स्क्रीन वरखाली करुन अ‍ॅडजस्ट करा. - प्रतिनिधी

Web Title: Only take a break, only then!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.