शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

motovlog: भेटा मुंबईकर राइडर तरुणीला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 07:10 IST

मोटोव्हलॉग हे सध्या नवीन करिअरचं क्षेत्र ठरतं आहे. त्यात आता एक मुंबईकर तरुणी राइडर गर्ल म्हणून देशातली पहिली मोटोव्हॉगर ठरली आहे.

ठळक मुद्देमोटोव्हलॉग म्हणजे मोटर बायकिंग करणार्‍या व्यक्तीनं आपल्या प्रवासाचे व्हिडीओ ब्लॉग करणं.

- रंजन पांढरे 

 नुकताच एका नियकतालिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 80 टक्के भारतीय हे केवळ सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठी प्रवास करतो असे निष्पन्न झाले. खरंच आपण प्रवास कशासाठी करतो? फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामच्या लाइक्स आणि कमेंट्ससाठी की स्वतर्‍ त्या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी?मात्र ‘राइडर गर्ल विशाखा’’- विशाखा फुलसुंगेला भेटा, बायकिंग आणि मोटोव्हलॉग हे तिचं करिअर आहे. मूळची मुंबईची, अगदी साउथ मुंबई वगैरे. एम.बी.ए. फायनान्स आणि भारताची नंबर एक मोटोव्हॉगर.आता हे मोटोव्हॉगर काय असतं ते विशाखालाच विचारायला हवं. अगदी 13-14 वर्षाची असताना पासून विशाखाला बाइक्सबद्दल प्रचंड आकर्षण होतं. बाइक्स, स्पोर्ट्स बाइक्स आणि त्यांचं मेकॅनिझम आवडीने समजून घेणे, ती चालवून बघणे आणि आपण अशा बाइक्स घेणार हे स्वप्न डोळ्यात साठवून पुढे सरकत जाणं हे तिचे नित्यनियम. मैत्री मुलांसोबत त्यामुळे बाइक्सचा सहवास सहज लाभत होता. विशाखाची खरी आव्हानं सुरू झाली जेव्हा घरातील जबाबदार्‍या अगदी लहान वयात तिच्यावर येऊन पडल्या. बायकिंगचं स्वप्न आणि करिअर या दोन्ही गोष्टी एकत्र होणं शक्य नव्हतं. विशाखाने अकरावीपासून अगदी तीनशे रुपये प्रति महिनाप्रमाणे कॅशियर म्हणून एका कंपनीत काम केलं. महाविद्यालयीन शिक्षण घेताना तिने स्वतर्‍ला वेगवेगळ्या कार्यक्र मांच्या सूत्रसंचालनामध्ये सहभागी करून घेतलं. त्यामुळे तिचं संवाद कौशल्य खूप प्रभावी होत गेलं. असंच एमबीए करीत असताना एक ऑडिशन झाली आणि विशाखाने अ‍ॅँकरिंगची संधी मिळविली; पण बायकिंगचं वेड  डोक्यात होतच.  विशाखाने अ‍ॅँकरिंगच्या विश्वात बरंच स्थैर्य मिळवलं होतं आणि त्यातून तिने आपल्या बायकिंगच्या प्रवासाची सुरुवात केली. स्वतर्‍साठी केटीएम डय़ुक 400  सीसी बाइक विकत घेतली आणि पहिल्या राइडला निघाली. 20 जणांच्या ग्रुपमध्ये विशाखा एकटीच मुलगी होती आणि ग्रुपमध्ये मुलाचं वर्चस्व होतं. विशाखाला तेव्हा तिच्या प्रवासाची दिशा किती खडतर असू शकते याची जाणीव झाली होती. ‘‘हेल्मेट असेर्पयत सगळं छान असतं, पण ते डोक्यातून काढल्यावर लोकांच्या नजरा फिरतात’’ असं विशाखा सांगते. बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. रात्रीच्या प्रवासात कोणीही साथ देत नाही. विशाखाचं हे नवीन विश्व जितकं सोपं दिसत होतं तितकंच ते अवघड होतं. हळूहळू विशाखा बायकिंगचे नियम, रस्ते, वळणं पार करत होती. रस्त्यात लांबवर प्रवासात वॉशरूम नसतात, धाब्यावर अनेकदा रात्र काढावी लागते, त्यात रात्रीच्या वेळेस बाइक पंक्चर होण्याचा अधिक धोका असतो, घाटांचे रस्ते आव्हानांमध्ये भर घालत असतात. ही प्रत्येक आव्हानं विशाखाला नवीन अनुभव देत होती, स्वतर्‍ काही गोष्टी शिकण्याची गरज आणि प्रेरणा पण मिळत होती. हुबळीजवळच्या चोरला घाटात झालेल्या पहिल्या पंक्चरने विशाखाला पंक्चर दुरुस्त करणं शिकविलं. आपल्या प्रवास किटमध्ये टय़ूबलेस पंक्चरच्या लीड्स घेतल्याशिवाय विशाखा कधीच बाहेर पडत नाही. विशाखा संपूर्ण बाइकची दुरुस्तीदेखील स्वतर्‍च करते.  विशाखानं यातूनच पुढे व्हिडीओ ब्लॉग सुरू केला. ती  आज भारताची नंबर वन मोटोव्हॉगर आहे. तिच्या प्रवासात तिची आई तिच्यासोबत खंबीरपणे उभी असते. विशाखा जिवाची बाजी लावून हे बाइकिंगचं वेड जपते. आजही घरातून बाहेर पडताना ती कुटुंबीयांना इन्शुरन्सचे पेपर्स, बँक खात्यांची माहिती सांगितल्याशिवाय बाहेर पडत नाही. तिच्या पलीकडे कुटुंबाची जबाबदारीदेखील तिच्यावर आहे. असं भन्नाट काम करून विशाखा आपलं स्वप्न जगते आहे.

******************************

 

आपला प्रवास हा केवळ आपल्यार्पयत मर्यादित राहू नये म्हणून विशाखा बर्‍याच माध्यमांचं संशोधन करीत होती. तिचा प्रवास इतर मुलींना प्रेरणा देणारा असावा आणि स्वतर्‍ला आनंद देणारासुद्धा! आपल्या हेल्मेटवर गो प्रो कॅमेरा आणि कॉल्लर माइक घेऊन विशाखाने पहिला व्हिडीओ यू-ट्यूबवर अपलोड केला. मोटर बायकिंगविषयी व्हिडीओ ब्लॉग सुरू करणारी ती पहिलीच मुलगी. व्हिडीओ करणं, एडिटिंगही ती स्वतर्‍च करते.

मोटोव्हलॉगिंगमध्ये विशाखा कुठल्याही प्रकारच्या स्क्रि प्ट्स तयार करीत नाही, ती जे अनुभवते ते ती बोलते. आणि हेच तिच्या यशाचं रहस्य आहे. विशाखाने पूर्ण भारत देश बाइकवर फिरून घेतला आहे आणि तिच्या प्रत्येक प्रवासाचं मोटोव्हलॉगिंग केलं आहे. तिचा या दरम्यान दोन वेळा भीषण अपघात झाला आहे. तिच्या मणक्याला जबर दुखापत झाली असूनही ती तिचं काम करीत राहते. तिच्या बाइकचं नाव ‘‘कशीश’’ आहे. 

motovlog म्हणजे काय?

मोटोव्हलॉग म्हणजे मोटर बायकिंग करणार्‍या व्यक्तीनं आपल्या प्रवासाचे व्हिडीओ ब्लॉग करणं. व्हिडीओ करणं, माहिती देणं. जगभर आता हा ट्रेण्ड चर्चेत आहे. तरुणांमध्ये करिअर म्हणूनही आता या कामाची क्रेझ वाढते आहे. आपल्या उत्तम प्रवासाचे व्हिडीओ लॉग करणं आणि त्यातून यू-टय़ूबला ते अपलोड करून पैसे कमावणं हे नवीन करिअर ठरतं आहे.