शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

इजिप्तचा तहरीर चौक तरुण संतापात का धुमसतोय?

By meghana.dhoke | Published: December 19, 2019 7:55 AM

दोनवेळच्या अन्नासाठी रस्त्यावर उतरून भ्रष्ट सरकारला खाली खेचणारी तरुण आग

ठळक मुद्दे 9 वर्षानंतर पुन्हा एकदा कैरोचा तहरीर चौक पेटलेला आहे. लोकशाहीचं स्वप्न एकदा भंग पावलं आहे.

-मेघना  ढोके / कलीम  अजीम 

गेल्या सप्टेंबर महिन्यात इजिप्तमध्ये  तरु णांनी तिथल्या हुकूमशाही सरकारविरोधात मोठं बंड पुकारलं. 20 ते 27 सप्टेंबर या सात दिवसांत इजिप्तच्या तारुण्यानं तिथल्या अब्देल-अल-सीसी सरकारविरोधात मोठं आंदोलन छेडलं. अनियंत्रित सत्ता, भ्रष्टाचार आणि मनामानी कारभाराविरोधात हे तारुण्य रस्त्यावर आलं. त्यासाठी निमित्त ठरला एक तरुणच. मोहंमद अली त्याचं नाव. त्यानं काही काळ स्पेनमधून आणि मग लंडनमधून एक ऑनलाइन मोहीम छेडली. फेसबुकवर त्यानं व्हिडीओज्ची एक सिरीजच सुरू केली. सरकारच्या भ्रष्टाचाराचे व्हिडीओ तो पोस्ट करत गेला. ही ठिणगी भडकली, सरकारविरोधात हॅशटॅग वापरत मोठी मोहीम उभी राहिली. मोहंमद अली म्हणत होता ते खोटं नाही हे लोकांच्या लक्षात आलं. इजिप्तच्या आर्मीतले आर्थिक घोटाळे त्यानं बाहेर काढले, कारण त्यानं बराच काळ इनसायडर म्हणून काम केलं होतं. त्यामुळे त्याच्या व्हिडीओवर लोकांनी सहज विश्वास ठेवला.त्यामुळे राष्ट्राध्यक्ष अब्देल सीसी यांनी राजीनामा द्यावा अशा मागणी जोर धरत होती. तीन-चार दिवसांतच या आंदोलनानं रौद्र रूप धारण केलं. सहा वर्षापासून सुरू असलेल्या सीसी यांच्या निरंकुश सत्तेच्या विरोधात लोक एकवटले. सरकारने विरोधकांचा बंदोबस्त करण्यासाठी धरपकड सुरू केली; पण अटकेला न जुमानता हजारो तरु ण सरकारविरोधात संघटित झाले. 2013 च्या सत्ताबदलानंतर इजिप्तमध्ये सामान्य जनता आणि सरकार यांच्यामध्ये संघर्ष सुरू झालेला होता. इजिप्शियन नागरिकांना लष्करी सत्ता नको आहे. जनतेच्या विरोधाला डावलून 2018 ला अब्देल फतह-अल-सीसी यांनी दुसर्‍यांदा राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली. लागलीच त्यांनी राज्यघटनेत दुरु स्ती करून 2030 र्पयत आपणच राष्ट्राध्यक्ष असू अशी तरतूद केली. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी सार्वमत घेतलं. अनेकांनी तर दोन वेळचं जेवण आणि काही  रोख रकमेच्या मोबदल्यात त्याच्या बाजूनं मतदान केलं. हे सुरू असताना देशातील सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करण्यात आली होती.

हे असं का झालं, तर इजिप्तमधली 60 टक्के जनता गरीब आहे. इतकी गरीब आहे की त्यांना दोन वेळचं जेवण मिळत नाही. आणि येत्या दोन वर्षात तर अजून काही दारिद्रय़ रेषेच्या खाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोनदा जेवणाचा जिथं संघर्ष आहे, तिथं तरुण आता रस्त्यांवर उतरले आहेत. सरकारने विरोध मोडून काढण्यासाठी कैरोच्या तहरीर स्क्वेअरमध्ये मोठा फौजफाटा तैनात केला होता. सीसीटीव्ही, चेकनाके, लावले असून, मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला गेला. सरकारला न जुमानता लोक एकत्न झाले. धडक कारवाईत निदर्शक, विरोधी पक्षातील आघाडीचे नेते आणि शिक्षणतज्ज्ञ तसेच सामान्य लोक असे तब्बल सुमारे 4500 लोकांना अटक झालेली आहे. आंदोलन काळात इंटरनेट बंद करण्यात आलं. 9 वर्षापूर्वी म्हणजे डिसेंबर 2009 मध्ये तत्कालीन हुकूमशहा होस्नी मुबारक यांची राजवट उलथून टाकण्यात आली होती. अरब स्प्रिंग म्हणत त्याची मोठी चर्चाही झाली.  या विद्रोहाचे पडसाद संपूर्ण अरब राष्ट्रात पडले होते. परिणामी, टय़ूनिशिया, येमेन, सिरिया, लिबिया आणि बहारिनमध्ये सत्तांतरं झाली होती. चालू दशकातली ही सर्वात मोठी क्रांती मानली जाते. सोशल मीडियाच्या मदतीने सुरू झालेलं हे पहिलंच सर्वात मोठं आंदोलन होतं. आता 9 वर्षानंतर पुन्हा एकदा कैरोचा तहरीर चौक पेटलेला आहे.लोकशाहीचं स्वप्न एकदा भंग पावलं आहे.दुसर्‍या लढय़ासाठी यावेळी मात्र तारुण्य सोशल मीडियाचा हात सोडून खरोखरच रस्त्यावर उतरलं आहे.