शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

मामीहलापीनतपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 5:01 PM

‘ए तू लिखता रहता है ना कुछ कुछ? बता, तेरा फेवरेट वर्ड कौनसा है?’‘अं.. कवडसा - मराठी शब्द है.’

 - प्रसाद सांडभोर

कशाला हवा या शब्दाचा अर्थ?‘ए तू लिखता रहता है ना कुछ कुछ? बता, तेरा फेवरेट वर्ड कौनसा है?’‘अं.. कवडसा - मराठी शब्द है.’‘... कवडसा ... साउंड नाईस, इस का मतलब?’‘मतलब.. यार, हिंदी या इंग्लिशमें पता नहीं क्या कहते हैं पर किसी खिडकीसे या फिर पेड के पन्नो के बीच से जो रोशनी आती है ना - जिसमे धुल चमकती दिखती है - वैसीवाली धूप... दॅट इज कवडसा.ओ! नाईस नाईस. हिंदीमें शायद झरोका कहते हैं. इंग्लिश नहीं पता!’‘है ना? इसीलिये फेवरेट है - कवडसा!’ ‘तेरा क्या है फेवरेट वर्ड?’‘सॉँडर.’‘मतलब?’‘एस ओ एन डी ई आर - गुगल कर लेना!’***काही शब्दच मुळी असे की त्यांची मजा त्यांच्याच भाषेत. भाषांतराला वाव नाही. आणि केलं तरी ते एकदम कृत्रिमसं वाटणार. जपानी इकिगाय म्हणा किंवा याघन भाषेतला मामीहलापीनतपाई - काय सांगावेत या शब्दांचे अर्थ?मुळात काही भावना, जाणिवा आणि नेणिवाच अशा शब्दांमध्ये बिलकुल व्यक्त न करता येणाऱ्या. त्यासाठी कधी एखादं चित्रच काढायला हवं किंवा कधी एखाद्या नृत्यातली एखादी मुद्रा करून दाखवायला हवी. एका घट्ट मिठीपुढे ‘धन्यवाद’, ‘थँक यू’ किंवा ‘सी यू, बाय बाय’ असे शब्द किती पोकळ वाटतात! मग अशा शब्दांपलीकडल्या गोष्टी कशा बरं सांगायच्या?पण त्या ‘सांगायच्या’ तरी का म्हणून? कशाला एवढा अट्टाहास? शब्दांमधून व्यक्त होण्याचा? भाषांतराचा? अशा गोष्टी असतात तशा नुसत्या अनुभवाव्यात. ***तरीसुद्धा वर उल्लेख झालेल्या शब्दांचा अर्थ मराठीतून सांगण्याचा एक निष्फळ प्रयत्न.मामीहलापीनतपाई = दोन अनोळखी माणसांदरम्यानचा एक शांत क्षण - जेव्हा दोघे एकमेकांकडे पाहतायत आणि विचार करतायत की मी नाही पण समोरची व्यक्ती आधी ओळख काढून बोलायला सुरुवात करेल!इकिगाय = रोज सकाळी झोपेतून उठण्याचं कारण, जगण्याचं कारण, उद्देश.सॉँडर = ?? (बोला ना, गुगल कर लेना!)