meet young students in Kolhapur university in lock down | कोल्हापूर विद्यापीठाच्या  रिकाम्या  कॅम्पस  मध्ये  जेव्हा  लॉक डाऊन भेटतं !

कोल्हापूर विद्यापीठाच्या  रिकाम्या  कॅम्पस  मध्ये  जेव्हा  लॉक डाऊन भेटतं !

ठळक मुद्देछायाचित्रं - नसीर अत्तार

-प्रदीप शिंदे

कोल्हापूच्या शिवाजी विद्यापीठातील अधिविभागांमधील वर्गाना सुट्टी दिल्याने वसतिगृहांमधील बहुतांश विद्यार्थी, विद्यार्थिनी आपापल्या गावी, घरी निघून गेले. सारं सुनं सुनं झालं. मात्र काही विद्यार्थी प्रोजेक्ट करायचा असल्याने थांबले. 
काही निवांतपणो अभ्यास करता येईल म्हणून थांबले. गावी जाऊन करायचे काय, म्हणून काहीजण थांबले.
 तर काही विद्याथ्र्याकडे घरी जाण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत म्हणून ते थांबले.
काहीजणांना वाटलं, घरं लहान तिथं जाऊन काय अभ्यास होणार आहे. आहे तेच बरं आहे.
अशा या ना त्या कारणाने ते वसतिगृहात थांबले.
त्यात देशात लॉकडाउन केल्याने वाहतूक बंद झाली. 
त्यामुळे शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी भवन व तंत्रज्ञान अधिविभागातील 24 विद्यार्थी-विद्यार्थिनींना वसतिगृहात राहण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. 
बाहेरील परिस्थिती बिकट होत असताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी सर्वाची भेट घेऊन त्यांना धीर दिला.  आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा निर्णय सर्वानी घेतला.
 शिवाजी विद्यापीठातील ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थी भवन येथे कर्नाटकातील चिक्कोडी, सांगली, पालघर, सोलापूर, शिरोळ या गावांतील सहा विद्यार्थी थांबले आहेत.  एम. ए., नाटय़शास्त्र विभाग तर काही एम. एस्सी. करतात. 


कोरोनामुळे प्रत्येकाने सोशल डिस्टन्स ठेवून स्वतंत्र खोलीत राहाणो पसंत केले आहे. काहीजण सकाळी लवकर उठून व्यायाम करणं, काहींनी योग करून दिवसाची सुरुवात असं रुटीन लावलं. त्यांच्या जेवण्याची सोय मुलींच्या वसतिगृहात केली आहे, मुलं त्या ठिकाणी जातात. जेवण करून पुन्हा विद्यार्थी भवन येथे येतात.  शिवाजी विद्यापीठ परिसरातील शुकशुकाट त्यांना प्रारंभी खात होता. आता मात्र त्याची त्यांना सवय होते आहे. 
पूर्वी विद्यापीठ परिसरात मोर नागरिकांना बघून घाबरून जात होते. तेसुद्धा या रस्त्यांवर आता बिनधास्तपणो वावरताना त्यांना दिसत आहेत, असं ते सांगतात.  
दुपारी थोडी झोप घेऊन काही मुले अवांतर वाचन करण्यासह अभ्यास करताना दिसतात. पुन्हा सायंकाळी सात वाजता जेवण करण्यासाठी सगळे एकत्र जातात. 
त्यानंतर रात्री पुन्हा गप्पांचा फड रंगतो. मात्र हे सर्व करीत असताना ते ठरावीक अंतर ठेवूनच बसतात, असं या मुलांनी आवजरून सांगितलं.
मुलींच्या वसतिगृहामध्ये पुणो, बार्शी, मिरज, दौंड, निगवे खालसा येथील ‘कमवा आणि शिका’ योजनेतील चार व वसतिगृहातील एक अशा पाच मुली राहातात. 
सकाळी लवकर उठून सर्वाच्या जेवणाची तयारी करणं, दुपारी जेवण झाल्यावर अवांतर वाचन, गाणी ऐकणो किंवा अभ्यास करणं, त्यानंतर संध्याकाळी काही वेळ गप्पा मारणो, बॅटमिंटन खेळणं, त्यानंतर पुन्हा जेवणाची तयारी सुरू होते. असं या मुलींचे रुटीन झालं आहे. प्रशासनाने एक महिला वॉर्डन व महिला सुरक्षारक्षक या ठिकाणी तैनात केले आहेत.
 शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागात औरंगाबाद, जालना, मुंबई, पुणो यासह परराज्यातील बिहार, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, गुजरात, नागपूर येथील 12 विद्यार्थी रहातात. मुलींचं वसतिगृह लांब असल्यानं आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव ते या ठिकाणीच बाहेरून डबा आणून जेवतात.
येथील काही मुलं या परिस्थितीकडे संधी म्हणून सकारात्मकपणो पाहत आहेत. 
कॉलेज नाही, अभ्यास नाही; त्यामुळे निवांत उशिरा उठणं पसंत करतात. 
दुपारी जेवण, थोडा वेळ लॅपटॉप, मोबाइलवर बातम्या पाहणो, पिक्चर पाहण्यात वेळ घालवतात. 
काहीजणांनी स्वत:ला अभ्यासात गुंतवून ठेवलं आहे, मात्र प्रत्येकाने स्वतंत्र खोलीमध्ये राहाणो पसंत केलं आहे. 
बाहेरील परिस्थिती पाहता कॅम्पसमधून बाहेरील कोणी आत येत नाही, आतील कोणी बाहेर जात नाही; त्यामुळे आम्ही या ठिकाणी सुरक्षित आहोत, असं ही मुले  आवजरून सांगतात. 
सध्या तरी त्यांचं एकेकटं आयुष्य तसं इथं आनंदात चाललं आहे. रिकाम्या कॅम्पसमधले हे दोस्त, वेट अॅण्ड वॉचवरच आहेत. 

.............
  मला सायकल चालवता येत नव्हती.
 बुद्धिबळ खेळता येत नव्हतं, आता मी तेही वेळात वेळ काढून शिकते आहे. 
- माधुरी मोहिते, (अंबक,  जि. सांगली) नॅनो सायन्स, द्वितीय वर्ष
----------------------------------
अभ्यास व्हावा या उद्देशाने मी थांबण्याचा निर्णय घेतला होता. मी या ठिकाणीच सुरक्षित असल्याने घरच्या लोकांची चिंता मिटली आहे. दिवसातून किमान तीन वेळा तरी घरातून व्हिडीओ कॉल येतो.  
- निकिता बाबर, मिरज; एम.एस्सी. झूलॉजी
-----------------------------
माझी इंटर्नशिप चालू असल्यानं मी थांबण्याचा निर्णय घेतला. 
सध्या माझं वर्क फ्रॉम होम सुरू आहे. गावी लाइट व इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे गावी जाऊन करायचे काय, हा प्रश्न माङयासमोर होता.
  - योगेश घाडेकर, संगणकशास्त्र विभाग, एम. एस्सी. ( तिसरे वर्ष) 
------------------------------------------
 घरचे वारंवार फोन करून कसा आहेस, याची विचारणा करतात. मात्र या ठिकाणीच खूप सुरक्षित वाटते. 
- मुझमिल नजार, जम्मू-काश्मीर, बी. टेक. तिसरे वर्ष 
------------------------------------------
माझा 24 मार्चर्पयत प्रोजेक्ट होता. त्यानंतर मी गावी जाणार होतो, मात्र आता गावी जाणं शक्य नसल्याने मी याकडे संधी म्हणून पाहतो. 
मी यू.पी.एस.सी.चा अभ्यास करीत असल्यानं मला अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. 
- सत्यवान कोळेकर, पुणो; बी. टेक. तिसरे वर्ष
-----------------------------------------


( प्रदीप लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत उपसंपादक/वार्ताहर आहे.)

.

Web Title: meet young students in Kolhapur university in lock down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.