माणसांना भेटा, त्यांच्याशी बोला!
By Admin | Updated: July 21, 2016 16:31 IST2016-07-21T16:31:00+5:302016-07-21T16:31:00+5:30
आपण भरपूर वाचतो, गूगलवर सगळी माहिती मिळते, मला गरज काय कुणाला भेटायची

माणसांना भेटा, त्यांच्याशी बोला!
आपण भरपूर वाचतो,
गूगलवर सगळी माहिती मिळते,
मला गरज काय कुणाला भेटायची
आणि व्याख्यानं ऐकण्याची
असं वाटतं तुम्हाला?
आपण फार हुशार, आपल्याला सगळं कळतं, आपल्याला कुणी काही शिकवायची गरज नाही, आपण भरपूर वाचतो, आपल्याकडे भरपूर माहिती असते, बाकी कुणाला काही विचारायची गरज नाही.
- असं वाटतं तुम्हाला?
तुम्हाला नसेल वाटत पण तुमच्या अनेक दोस्तांना वाटत असेल किंवा काहीजण तर तुमच्या ग्रुपमध्ये किंवा सोशल साइट्सवरही आपल्या अशा बुद्धिमत्तेचे तारे तोडत असतील! तुम्हालाही वाटत असेल की गूगलवर आहेच की सारी माहिती मग गरज काय कुणाला विचारायची?
पण जर असं काही चुकूनही वाटत असेल तर ते विसरून जा. कारण हे वाटणं हा करिअरच्या सुरुवातीलाच एक मोठा अडथळा बनू शकतो.
करिअरच्या सर्वात पहिल्या टप्प्यापासून ते ध्येय गाठल्यावरच्या प्रत्येक नव्या टप्प्यावर आपल्याला सर्वात जास्त उपयोगी पडणारी कोणती गोष्ट असते, माहिती आहे का?
ती म्हणजे माणसं!
वेळ काढून विविध लोकांमध्ये मिसळत राहणं आणि त्यादृष्टीने स्वत:चा बौद्धिक विकास सतत करणं. आपण कोणत्याही प्रकारच्या क्षेत्नात असलो तरी आपल्या ज्ञानात, अनुभवात भर टाकणा:या, आपल्याला विविधांगाने समृद्ध करणा:या कित्येक गोष्टी आपल्या आसपास घडत असतात. ते सारे आपण समजून, शिकून घेतलं पाहिजे.
1) एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुक्तपणाने सामाजिक मेळाव्यांमध्ये सहभाग घेणं.
सध्या विविध जातीय मेळाव्यांवर फार भर असतो. पण तशा मेळाव्यांना जाणं इथे अभिप्रेत नाही, तर याउलट विविध प्रकारच्या क्षेत्नांमध्ये वावरणा:या, विविध विचारसरणीच्या लोकांमध्ये मिसळायला हवं. आपलं क्षितिज यामुळे विस्तारायला हवं. कारण हा अथांग समाज हाच आपला अतिशय महत्त्वाचा गुरू असतो. ‘बिनभिंतीची शाळा इथली, लाखो इथले गुरू’ अशी वसंत बापट यांची कविता आपल्याला माहीत असेलच. समाजातला प्रत्येक घटक आपले सहजरीत्या, अगदी जाता-येता शिक्षण करत असतो.
मागील एका आठवडय़ात आपण इतर व्यक्तींकडून अगदी अनौपचारिकरीत्या काय काय शिकलो, हे आठवलं तरी या सहज शिक्षणाची व्याप्ती तुमच्या लक्षात येईल. अर्थात त्यासाठी तुम्हाला भरपूर लोकांना भेटायला मात्न हवं.
2) कॉलेजतर्फे / ऑफिसेसतर्फे किंवा सर्वाना मुक्त प्रवेश देणा:या कार्यशाळा/सेमिनार, व्याख्यानं गावोगावी हल्ली आयोजित केलेले असतात. त्यातून शिकण्याची आयतीच संधी मिळत असते. विविध वक्त्यांची व्याख्यानं ऐकता येतात. वेगवेगळ्या क्षेत्नात काम केलेल्या, अनुभवी व्यक्तींना ऐकण्याची संधी मिळते. आपल्याला त्यांचे अनुभव ऐकता येतात. त्यांचे विचार ऐकणं, त्यांना प्रश्न विचारणं, त्यांच्याकडून त्यांच्या कार्यक्षेत्नातला प्रवास जाणून घेणं, त्यांनी यश-अपयशाला तोंड कसं दिलं, आवडीचा विषय कसा निवडला, त्यांचे या क्षेत्नातले अनुभव कोणते हे सारं आपल्याला आयतं मिळू शकतं. हे अनुभव ऐकण्यामुळे स्वत:ला घडवण्याची अगदी सहजपणो संधी मिळते. अशी संधी मिळत असेल तर अवश्य घ्यावी. त्यातून आपलीही एक वेगळी नजर तयार होते.
3) काही कार्यशाळांमध्ये वैयिक्तकरीत्या काही गोष्टी करून बघता येतात. उदा. फिल्ममेकिंगच्या कार्यशाळेत नव्या गोष्टी कळतात, नवी साधनं - तंत्नं कळतात. भाषणविषयक कार्यशाळा असेल तर सभेत बोलण्याची संधी मिळते. अशा प्रकारे स्वत:ला तपासण्याची संधी मिळते, हे खूपच महत्त्वाचं आहे.
4) कार्यशाळा किंवा सेमिनारमध्ये वक्ता बोलत असतो तेव्हा आपण शांतपणो ऐकायचं असतं. एखाद्या समूहात जेव्हा चर्चा चालू असतात, तेव्हा कोणीही एक वक्ता नसतो, तर सर्वानी मिळून बोलण्याची संधी असते. आपलं मत मांडायचं असतं किंवा आपण केलेलं काम दाखवायचं असतं. आपलं एखादं काम अगदी नवीन असेल किंवा संपूर्ण गटापेक्षा खूप वेगळ्या विषयातलं असलं तरी ते मांडायचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असतं. या चर्चांमधून कित्येक गोष्टी घडून येतात. मात्न त्यासाठी आपले असे समूह असायला हवेत. मित्न-मैत्रिणींचा समूह, शिक्षक-विद्याथ्र्याचा समूह, एकाच प्रेरणोने काम करणा:यांचा समूह. तरच आपल्याला आपल्या वेळेचा अधिक चांगला उपयोग करता येईल. स्वत:ला चांगल्या अर्थानं बिझी ठेवता येईल!
आणि बोअर होतंय, काय करू, काहीच सुचत नाही या टिपिकल प्रश्नांपेक्षा आपल्याला अधिक समृद्ध करणा:या वाटा सापडत जातील, माणसं भेटत जातील.
फायदा काय नव्या लोकांना भेटण्याचा?
नवनवीन लोकांना भेटणं, ओळखी वाढवणं, कार्यशाळांना जाणं याचा फायदा काय?
1) अशा नवनव्या समूहातून आपली कितीतरी कौशल्यं वाढीला लागतात. उदा. आपल्यामधले ठळक गुण कोणते व दोष कोणते हे दुस:या कोणी सांगण्याची गरज उरत नाही. ते आपले आपल्यालाच कळतात.
2) स्वत:ला सुधारण्याची संधी मिळते. इतरांचंही मत ऐकून घेणं. त्यातून आपली ऐकण्याची क्षमता (लिसनिंग स्किल) वाढते. त्यांची मतं ऐकून स्वत:चं मत तयार करता येतं.
3) आपल्या शब्दात मतं व्यक्त करण्याची क्षमता वाढते. त्याचप्रमाणो आपली बाजू दुस:यांना समजावून सांगता येते.
4) आपल्या विचारांमध्ये, विचार मांडण्याच्या क्षमतेमध्ये काही चूक असल्यास ती कळून येते.
5) एखाद वेळेस मतं मांडताना काही चुका होतात. कधी जास्त आक्रमकपणो एखादा मुद्दा मांडला जातो, तर कधी योग्य असूनही जोरकसपणो तो मुद्दा न मांडल्यामुळे आपला मुद्दा हरवून जातो. असं होणं सरावानं टाळता येतं.
6) समजा आपलं मत किंवा आपला पवित्ना चुकीचा असल्यास माघार घेणं हेदेखील जमायला पाहिजे याची जाणीव होते.
7) इतर कुणाचा नाहीतर आपल्याच समविचारी मित्रंचा एक समूह करून नियमित अगदी ठरवून विविध विषयांवर अभ्यास करून गप्पा मारल्यास या विषयांचा अभ्यास आपोआपच होतो.
8) एका विषयावर अनेकांची वेगवेगळी मते असतात. त्या सर्व मतातून आपला नकळतपणो बौद्धिक विकास होत असतो. आणि आपल्याला न पटणारी मतंही समजून घेण्याची समज वाढते.
यासाठी अशा काही गोष्टी करायलाच हव्यात, नाही का?
- डॉ. श्रुती पानसे
( लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)