शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

मंडेला आणि महात्मा

By admin | Updated: April 8, 2017 18:40 IST

दोघंही नेते महान. ते कधीच आक्रमक झाले नाहीत; पण आपल्या विचारांवर त्यांचा ठाम विश्वास होता. ध्येघ सकरात्मक होतं आणि काय हवं आहे याची त्यांना कल्पना होती.

दोघंही नेते महान. ते कधीच आक्रमक झाले नाहीत; पण आपल्या विचारांवर त्यांचा ठाम विश्वास होता. ध्येघ सकरात्मक होतं आणि काय हवं आहे याची त्यांना कल्पना होती.साऊथ आफ्रिकेतली गोष्ट आहे. कृष्णवर्णीय नेते नेल्सन मंडेला अनेक वर्ष तुरुंगात होते. ते आता वर्षभरात सुटतील अशी शक्यता निर्माण झाली होती. सगळ्या जगाचं लक्ष त्यांच्या सुटकेकडे लागून राहिलं होतं. मंडेला तरुंगातृन बाहेर आल्यावर काय होईल याबद्दल जगभर तर्कवितर्क लढवले जात होते. अनेकांचा असा अंदाज होता, की मंडेला तुरुंगातून बाहेर आले की वर्णविद्वेशाच्या दंगली उसळतील, रक्ताचे पाट वाहतील. आणि ही भीती अनाठायी नव्हती.मात्र त्याच वेळेला साऊथ आफ्रिकेतला एक गट ठामपणे असं म्हणत होता, की असं होता कामा नये. पण मग हे टाळायचं कसं, असा विचार करणाऱ्या काही प्रभावशाली व्यक्तींनी एकत्र येऊन असं ठरवलं, की काहीही झालं, तरी अशा दंगली होऊ द्यायच्या नाहीत. मग त्यासाठी त्यांनी प्लॅनिंग करायला सुरुवात केली.सर्वप्रथम त्यांंनी मंडेलांचे समर्थक आणि विरोधक असलेल्या कडव्या नेत्यांना एकत्र आणलं. राष्ट्रीय पातळीवरच्या परस्परांविरुद्ध आग ओकणाऱ्या या नेत्यांना एकत्र आणणं हे फारच अवघड काम होतं. पण या लोकांनी ते केलं. त्यांनी त्या कट्टर नेत्यांना एकत्र यायला भाग पाडलं.त्यांना सांगितलं, की तुमची विचारसरणी खूप वेगवेगळी आहे हे आम्हाला मान्य आहे. तुम्ही तुमचं म्हणण मांडू नका असंही आम्ही सांगत नाही. मात्र जे बोलाल त्यात शब्द सांभाळून वापरा. भावना भडकवणारी विधानं करु नका. कारण त्यातून फक्त दंगली होतील. यात सगळ्यांचं फक्त नुकसान आणि नुकसानच आहे.मग त्यांनी आपसात भाषेचे, बोलण्याचे नियम ठरवले. या नेतेमंडळींनी ते अनेकदा मोडले. अनेकदा ती बंधनं त्यांनी झुगारुन देण्याचा प्रयत्न केला; पण शांततावादी मंडळी त्यांच्या म्हणण्यावर ठाम राहिली. त्यांनी या नेत्यांना सांगितलं की असं नाही चालणार. तुम्ही मान्य केलेले नियम तुम्हाला पाळावेच लागतील.असं एकूण वर्षभर चाललं. दोन्हीकडची कट्टर माणसं एकत्र आली. दोघांनीही आपापली बाजू मांडली; पण ती अ‍ॅग्रेसिव्हली नव्हे, तर अ‍ॅसर्टिव्हली!अखेरीस नेल्सन मंडेला तुरुंगातून बाहेर आले. त्यांचं पहिलं वाक्य होतं, ‘मी खूप वर्ष तुरुंगात राहिलो, पण माझा गोऱ्या माणसांवर अजिबात राग नाही. काही चुका आम्ही केल्या, काही चुका त्यांनी केल्या, पण आता आपण ते मागे ठेवूया. कारण आपल्याला आता देश पुढे न्यायचाच. प्रगती करायची आहे.पुढेही नेल्सन मंडेलांना त्यांची भूमिका ठामपणे मांडावी लागली. लोकांना ती पटवून द्यावी लागली. त्यात त्यांनी कधीही आपला मुद्दा सोडला नाही. कधी तो अ‍ॅग्रेसिव्हली मांडलाही नाही. त्यांना मिळालेल्या शांततेच्या नोबेल पारितोषिकाबाबतही हे नमूद केलं गेलं, की स्वत:चं म्हणणं न सोडता ठामपणे मांडत राहणं आणि त्यात कुठेही आक्रमकता येऊ न देणं ही त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे. कारण स्वत:च्या विचारांवर ठाम राहणं आणि तरीही त्यात आक्रमकता येऊ न देणं यासाठी फार मोठी ताकद लागते.असाच एक ठाम, पण तरीही आक्रमक नसलेला थोर माणूस आपल्या देशात होऊ गेला... मोहनदास करमचंद गांधी...संपूर्ण स्वातंत्र्यलढ्यातली कुठलीही घटना बघितली तरी लक्षात येतं की गांधीजींनी त्यांंचं म्हणणं कधीही सोडलं नाही. पण ते कधीही आक्रमक झाले नाहीत. कारण त्यांचा त्यांच्या विचारांवर ठाम विश्वास होता. स्वत:ला काय हवं आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यांची ध्येयं सकारात्मक होती आणि त्या ध्येयाच्या दिशेनं जाण्यासाठी लागणारा अथक ठामपणा त्यांच्याकडे होता.