मेकओव्हर मंगता हे बॉस!
By Admin | Updated: December 5, 2014 12:03 IST2014-12-05T12:03:39+5:302014-12-05T12:03:39+5:30
स्वत:चं रंगरुप बदलायचं म्हणून धडपडणारी तरुण गोष्ट नेमकी आहे काय?

मेकओव्हर मंगता हे बॉस!
रंग?
-नाहीच आवडत स्वत:चा!
खूप राग येतो कधी कधी?
वाटतं एखादी अशी क्रीम मिळावी की, एका रात्रीत रंग उजळावा.
काय आपला अवतार, एकदम काकूबाईछाप, एखादा मस्त हेअरकट करावा, मस्त फेशियल,
चकचकीत चेहरा, आयब्रो कराव्या नाजूक, व्हॅक्सिंग, पेडिक्युअर, मॅनिक्युअर सगळंच
करुन टाकावं. एकदम चकाचक दिसावं.
दात किती पुढे आलेत? पण क्लिपा लावायचं शाळकरी वय तर निघून गेलं. मग आता इन्स्टण्ट
स्माईल डिझाईन करु थोड्याच दिवसांत एकदम परफेक्ट स्माईल?
ओठांचा आकार बदलणं, नाक सरळ करणं, फ्लॅट टमीसाठी धडपडणं, अंगावर साचलेली कुठकुठली चरबी काढून टाकण्याची आणि हवी तिथं चढवून घेण्याची ऑपरेशन्स करणं, हे सारं फक्त श्रीमंत
आणि सेलिब्रिटीच करतात असं कुठंय?
ओठावरची आणि अंगावरची लव कमी करण्यापासून कॉस्मेटिक सर्जरी करण्यापर्यंत अनेक गोष्टी आता सामान्य तरुण-तरुणीही करून घेऊ लागलेत.
यापैकी तुम्ही कधी काही केलं आहे का? नियमित करता का? त्यासाठी दरमहा किती पैसे खर्च होतात? म्हणजे ब्यूटी बजेट असं काही असतं का? असेलच तर किती?पार्लरमधे जायला मिळावं
म्हणून आईबाबांशी भांडता का?
आपल्याला काहीच करता येत नाही, पण करायचंच आहे अशी काही तुमची ‘विशलिस्ट’ आहे का?
त्यासाठी तुम्ही पैसे जमवता आहात का?
आपला ‘लूक’ बदलला तर आपल्याला लोक मान देतील,आपल्या संधी वाढतील,आपण स्पर्धेत
मागे पडणार नाही, असं वाटतं तुम्हाला?
मग तुमच्या मनातलं, आजवर कुणालाच न सांगितलेलं, पण सांगावंसं वाटतं असं मनातलं लिहाच आता. तुमच्या मेकओव्हरचं एक स्वप्न. आणि वास्तवही.
रंगरूप बदलल्यामुळे किस्मत बदलते, बदलेल म्हणून चाललेल्या प्रयत्नांचं हे शेअरिंग..
आम्हाला खात्री आहे, तुम्हाला नक्की लिहायला आवडेल. मग लिहा.
पत्ता? - संयोजक, 'ऑक्सिजन', लोकमत भवन, बी-३ , एम.आय.डी.सी, अंबड, नाशिक -422010
अंतिम मुदत- १२ डिसेंबर
पाकिटावर- ‘मेकओव्हर’
असा उल्लेख करायला
विसरू नका..