शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
4
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
5
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
6
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
7
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
8
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
9
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
10
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
11
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
12
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
13
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
14
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
15
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?
16
परदेशी माध्यमांचा मोदींवर एवढा राग का ?
17
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
18
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
19
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
20
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 

जात-धर्माच्या आधारावर केले जाणारे राजकारण यापुढच्या काळात यशस्वी होईल, असे वाटते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 5:51 PM

निम्म्याहून अधिक तरुण-तरुणींना वाटते, मतदारांच्या गरजा आणि अपेक्षा बदलल्या आहेत; राजकारणालाही बदलावेच लागेल. दर 10 मधल्या 2 मुला-मुलींसाठी जातीय/धार्मिक अभिमानाचे रक्षण महत्त्वाचे!!

ठळक मुद्देबदल अपरिहार्यच आहे; पण डोक्यातल्या किचाटाचे काय करणार?

-ऑक्सिजन  टीम जात-धर्म नंतर आधी कामाचं बोला.हे तर तरुण मतदार पुरेशा ठामपणे सांगतात. मतदारांच्या अपेक्षा बदललेल्या आहेत आणि यापुढे केवळ जाती-धर्माची कार्ड चालवून मतं मागता येणार नाहीत आणि आम्ही देणारही नाहीत असं हे तरुण मतदार ठणकावतात.रोजच्या जगण्यातल्या समस्या कशा सोडवाल सांगा, असा या तरुण मतदारांचा प्रश्न आहेच.आणि 60 टक्के तरुण मतदार या मताशी सहमत आहेत की, आता मतदारांना जाती-धर्मात विभागता येणार नाही.मात्र उरलेल्या 40 टक्के मतदारांचं काय?म्हणजे 20 टक्के तरुण-तरुणी कानावर हात ठेवतात की, काही सांगता येणार नाही की भविष्यात जाती-धर्माचं राजकारण यशस्वी होईल की नाही.हे असं तळ्यात-मळ्यात करणारे मतदार भविष्यात नक्की कुणाला मतं देतील याचा अंदाज या आकडेवारीहून मांडता येत नाही. ते जात-धर्माच्या राजकारणाच्या बाजूनं झुकतील का?-प्रश्नच आहे.उरलेले वीस टक्के. म्हणजे दर दहात दोघांना वाटतं की, आपल्या राजकीय नेतृत्वानं आपल्या जातीचं आणि धर्माचं रक्षणच करायला हवं.जगण्याच्या रोजच्या समस्यांपेक्षा आपल्या जातीय आणि धार्मिक अस्मिता अधिक महत्त्वाच्या हे या तारुण्याच्या मनात उघड सांगावं इतकं घट्ट नेमकं कशामुळे झालं असेल? याचं तपशीलवार विश्लेषण नंतर करू. मात्र वास्तव हे ‘असं’ आहे.तरुण मनातही असा हा किचाट दिसतोच.विशेष म्हणजे आपल्या जातीचं आणि धर्माचं रक्षण व्हायला हवं असं मुलींना वाटतं, बाकी कुठं नाही तरी मुलींनी या मताशी मुलांशी बरोबरी साधलेली दिसते.व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठातलीच आकडेवारी खरी मानणारं, पुस्तकांपासून लांब असलेलं आणि सोशल मीडियात जे येतं ते खरं मानून ढकलपंची करणारं हे तारुण्य आहे का?असा प्रश्नच पडावा.पण तरीही उमेद हीच की सुमारे 60 टक्के तरुण तरी म्हणतात की, जातीपातीचं राजकारण भविष्यात यशस्वी होणार नाही, आमच्या राजकीय नेतृत्वाकडून असलेल्या अपेक्षा बदलल्या आहेत.हे समीकरण सोपं नाही. सरळ तर नाहीच नाही!

***

एकूण प्रतिसाद काय सांगतो?

* अर्थात, जातीचे-धर्माचे रक्षण महत्त्वाचंच आहे - 20.62 %* नाही. आता मतदारांच्या अपेक्षा, गरजा बदललेल्या आहेत - 56.32 %* नक्की सांगता येणार नाही - 20.91 %

एकूण सहभागींपैकी 2.15 %  तरुण-तरुणींनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही.मुली म्हणतात * अर्थात, जातीचे-धर्माचे रक्षण महत्त्वाचेच आहे - 19.75 %* नाही. आता मतदारांच्या अपेक्षा, गरजा बदललेल्या आहेत -  56.39 %* नक्की सांगता येणार नाही - 22.23 % एका बाजूला 56 टक्के मुली म्हणतात, की आता मतदारांच्या गरजा आणि अपेक्षा बदलल्या आहेत, राजकारणालाही त्यानुसार बदलावेच लागेल.पण त्याचवेळी दर 10 मधल्या 2 मुलींना आपली धार्मिक/जातीय अस्मिता महत्त्वाची वाटतेच आहे. बाकी याबाबतीत मुलींनी मुलांशी बरोबरी साधल्याचं आकडेवारी तरी सांगते. मुलगे म्हणतात ..* अर्थात, जातीचे-धर्माचे रक्षण महत्त्वाचंच आहे - 21.50 %* नाही. आता मतदारांच्या अपेक्षा, गरजा बदललेल्या आहेत -  56.24 %* नक्की सांगता येणार नाही - 19.58 % जातीय आणि धार्मिक अस्मितांच्या लढाया लढायला रस्त्यावरउतरणार्‍या गर्दीतल्या शंभरातल्या नव्याण्णव डोकी मुलांची असली तरी त्या डोक्यांच्या आत विचार मात्र काही वेगळाच असल्याचं चित्र या आकडेवारीतून समोर येते. परिस्थिती बदलते आहे, हे कृतीमध्ये आलं नसलं तरी किमान विचारांच्या पातळीवर तरी मान्य होऊ लागलेलं असावं.*** 

2009- ओन्ली फॉर अ‍ॅडल्ट्स -दहा वर्षात नेमकं काय बदललं?

जात-धर्माचे काच  आज जास्त पक्के??

 * तो सोशल मीडियापूर्व काळ होता. मोबाइलवर आजच्यासारखं नेट नव्हतं आणि व्हॉट्सअ‍ॅपही नव्हतं. त्यामुळे आजच्या इतका माहितीचा धबधबा नव्हता. तेव्हा 70} तरुण म्हणत होते की जाती-धर्माचं राजकारण या देशात यशस्वीच होणार नाही.* आता दहा वर्षानंतर हे प्रमाण 10 टक्केंनी घटलेलं दिसतं. ते का?