शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

जात-धर्म हाच आजच्या राजकारणाचा आधार आहे, असं वाटतं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 5:35 PM

राजकारणाची दिशा बदलते आहे यावर निम्म्या मुला-मुलींचा विश्वास आहे . मुली जास्त आशावादी! दोघांच्याही मनातलं कन्फ्यूजन मात्र सारखंच!

ठळक मुद्देहां कहूं के ना कहूं, ये कैसी मुश्किल हाय!

-ऑक्सिजन  टीम 

अभ्यासिका की मंदिराचा जीर्णोद्धार?दांडिया आयोजन की तरुणांसाठी वाचनालय? स्पर्धा परीक्षा सराव शिबिरं? हे असे प्रश्न घेऊन गावात तरुण मुलांच्यात होणारे वाद नवे नाहीत. गावातलं ‘राजकारणाचं’ पारडंही कधी इकडं झुकतं तर कधी तिकडे.मत देतानाही तरुण मुलं हाच विचार करतात का?एकीकडे आपल्या रोजगाराचे प्रश्न महत्त्वाचे हे त्यांना मान्यच आहे मग तरी जाती-धर्माच्या अस्मितेचे प्रश्न टोक काढतात ते का? 40 टक्के तरुण-तरुणी सांगतात की हो, जात-धर्म हाच राजकारणाचा आधार आहे असं आम्हाला वाटतं, तर हे विधान काय सांगतं? आपल्या अवतीभोवतीचं चित्र बदलत आहे असं हे तरुण सांगतात की, त्यांची तशी अपेक्षा आहे?त्याच्या अधिक खोलात जाऊन विश्लेषण करायला हवं, मात्र ही आकडेवारी सांगते ते धक्का देणारं आहेच. याबाबतीत तरुणी मात्र तरुणांपेक्षा जास्त आशावादी दिसतात. राजकारणात असलेलं जाती-धर्माचं वर्चस्व यापुढील काळात सरसकट चालू राहणार नाही असं त्यांना वाटतं. वास्तव आणि अपेक्षेचा तोल साधताना तरुणाईची कसरत होतेय, हे नक्की. समाजातल्या बदलांचा या मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम होताना स्पष्ट दिसतो आहे. 

एकूण प्रतिसाद काय सांगतो?

* हो, हे खरं आहे! - 36.12 %* नाही, परिस्थिती बदलते आहे -  48.42 %* नक्की सांगता येणार नाही -  13.30% * यापैकी नाही -  2.06% एकूण सहभागींपैकी 2.16 %   तरुण-तरुणींनी या प्रश्नाचे उत्तर दिलेलं नाही.

मुली म्हणतात

* हो, हे खरं आहे!- 30.82 % * नाही, परिस्थिती बदलते आहे -  54.87% * नक्की सांगता येणार नाही- 13.45 %

 देशातल्या राजकारणाची प्रत बदलत असल्याचा आशावाद मुलींमध्ये अधिक दिसतो. परिस्थिती बदलते आहे, असा विश्वास व्यक्त करणार्‍या मुलींची संख्या मुलांपेक्षा तब्बल 13 टक्के जास्त आहे; पण हेही खरं, की ‘नक्की सांगता येणार नाही’ असा गोंधळही मुलींच्याच मनात अधिक दिसतो.  मुलगे म्हणतात 

* हो, हे खरे आहे! -  41.45 %* नाही, परिस्थिती बदलते आहे -  41.93% * नक्की सांगता येणार नाही _ 13.14 %तब्बल 4.8 टक्के तरुणांनी या प्रश्नाचे उत्तर देणंच टाळलेलं आहे.

जात-धर्म हाच आजच्या राजकारणाचा आधार आहे की परिस्थिती बदलू लागली आहे; यावरून मुलांचे सरळ सरळ दोन गट पडलेले दिसतात. 

2009 -  ओन्ली फॉर अ‍ॅडल्ट्स : दहा वर्षात नेमकं काय बदललं?

दुर्दैव असं, की काहीच बदललं नाही!

*जात-धर्माचं राजकारण या देशात होतंच असं सांगणारे तरुण तेव्हाही सांगत होते की यापुढे विकासाचे प्रश्न महत्त्वाचे होतील आणि जात-धर्मावरून मत देणं कमी होईल. * तेव्हा तर सव्र्हेत सहभागी 36 टक्के तरुण सांगत होते की या देशात जाती-धर्माचं राजकारण यशस्वीच होणार नाही. * जात किंवा धर्माला व्होट बॅँक म्हणून गृहीत धरणं बंद करा, विकासाचं बोला असंच दहा वर्षापूर्वीचा तो सव्र्र्हेही सांगत होता.