शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउन? त्यात सीमकार्ड बिघडलं तर.?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 16:04 IST

सीम कार्ड एरर देतंय? मग उपाय म्हणून ते एका फोनमधून दुसऱ्या  फोनमध्ये टाकू नका. अजून बिघडेल.

ठळक मुद्देअनेक मुलं सिम बदल करकरून फोन वापरतात, ते याकाळात टाळणंच उत्तम.

-निशांत महाजन

नुसती कल्पना करून पहा.हे लॉकडाउन सुरूच आहे आणि तुमचं सिमकार्ड खराब झालं. फोन बंद. डेटा पॅक बंद. बाहेर दुकानं बंद.आणि आता आपला जगाशी काही संपर्कच नाही.कल्पनेनेही घाम फुटतो आणि म्हणावंसं वाटतं की, जरा शुभ शुभ बोला. कशाला वंगाळ बोलता.पण तरी असं झालं तर.म्हणजे फोन तर एकदम डबाच होऊन जाईल.कितीही महागडा असला स्मार्टफोन; पण त्यात सिमकार्ड नसेल तर खेळ खल्लासच. असं कुणाच्या वाटय़ाला काही येऊ नये, सगळ्यांचे फोन चालूदेत, कार्ड चालूदेत.पण वेळ काही सांगून नाही येत, त्यामुळे समजा कार्डला काही प्रॉब्लेम झालाय, की फोनला,की आपलं सिम खराब झालं आहे हे जरा तपासून पाहून वेळीच कामाला लागलेलं बरं.आणि आताचं लॉकडाउन पाहता कार्डची काळजी घेतलेलेही बरी. सिम म्हणजे काय तर सबस्क्रायबर आयडेण्टीटी मॉडेल. ही एक पोर्टेबल मेमरी चीप असते.ते सिमकार्ड हीच आपली ओळख. अनेक देशात तर सिमकार्ड असेल तर ते पाहून लोकांना आता लॉकडाउनच्या काळात काही सवलतीही मिळत आहेत.त्यामुळे आपलं हे सिम महत्त्वाचं.त्याची काळजी कशी घ्यायची हे पाहू.1) म्हणजे आपल्या सिमकार्डची सतत काढ घाल करू नका. कधी या फोनमध्ये कधी त्या फोनमध्ये असं करू नका.2) शक्यतो सिमकार्डला हात लावू नये, त्याचा खेळ करू नये.3) आपल्या फोनचं एकदम अनेकदा नेटवर्क जातं आणि ‘इनसर्ट सिम’ किंवा ‘नो सिम.’ असा मेसेज येतो. तसा मेसेज आला की अनेकजण चार फोनमध्ये आपलं कार्ड टाकून तिथं तरी ते चालतंय का हे बघतात.तसं करू नका. कार्ड काही खराब झालंय का बघा, तरीही एरर आली तर ते फोनमध्ये घालू नका.4) काहीजण स्वत: तज्ज्ञ असतात, ते मित्रंना सांगतात अरे उन्हाळा आहे सिमने माइश्चर धरलं असेल. तर अनेकदा सिम पुसून काढलं मऊ फडक्याने तर ते काम करायला लागतं, असा अनेकांचा अनुभवही आहे. तसं करून पहायला हरकत नाही.पण हा काही त्यावरचा उपाय नाही. मोबाइल कंपनीशी संपर्क करून नवीन सिमकार्ड मागणंच अशावेळी योग्य.  आपण आपला स्मार्टफोन रिस्टार्ट करतो आणि मोबाइल नेटवर्क पकडायला लागतो.5) सिम आणि फोन ही जपून वापरायची गोष्ट आहे, त्याला चिकट हात न लावणो, काळजी घेणो उत्तम. याकाळात तर शक्यतो दुस:याच्या मोबाइललाही हात लावू नये, लावल्यास हात धुणं उत्तम. सिमपेक्षा जास्त काळजी स्वत:ची घ्या.6) अनेक मुलं सिम बदल करकरून फोन वापरतात, ते याकाळात टाळणंच उत्तम.