- प्रसाद ताम्हनकर
मानवी मेंदू आणि त्याचं कार्य हा विषय कायमच जगभरातील शास्रज्ञांना खुणावत राहिला आहे.आजही मानवी मेंदूचा किंवा त्याच्या कार्याचा पूर्ण अभ्यास आपल्याला करता आलेला नाही, असे जगभरातील अनेक शास्रज्ञ मानतात. या विषयावरती आजही संशोधन सुरूच आहे.आजचा आघाडीचा आणि धडाडीचा शास्रज्ञ, जगभरातील तरुणाई ज्याला आदराने ‘आयर्न मॅन’ म्हणते, तो एलन मस्कदेखील या मानवी मेंदूच्या अभ्यासासाठी झपाटलेला आहे. शास्नच्या विविध शाखांमध्ये यशस्वी संशोधन करण्यासाठी नावाजलेल्या एलन मस्कने खास मानवी मेंदूचे वाचन करण्याच्या संशोधनासाठी 2016मध्ये न्यूरालिंक या कंपनीची स्थापना केली आहे. ‘कोणत्याही वायरची मदत न घेता मानवी मेंदूचे वाचन करणं’ हे या कंपनीच्या प्रमुख संशोधनामागचे उद्दिष्ट आहे. न्यूरालिंकने आपल्या या उद्दिष्टाच्या जवळ पोहोचत, मेंदूत बसवता येण्याजोगी एक छोटीशी चिप विकसित केली आहे. नुकताच तीन डुकरांवरती हा प्रयोग करण्यात आला. तब्बल दोन महिने ही चिप या डुकरांच्या मेंदूत कार्यरत होती. या तीन डुकरांपैकी गॅटर्ड नावाच्या डुकराने या अभ्यासात खूप साहाय्य केल्याचे शास्रज्ञांनी सांगितले. डुकरांना चिप बसवल्यानंतर खाणे देण्यात आले, आणि पहिल्यांदाच त्यांच्या मेंदूच्या कार्यपद्धतीला लाइव्ह पाहता आलं.
(प्रसाद विज्ञान/तंत्रज्ञानविषयक लेखकआहे.)