जाम बोअर होतंय, सोडू का ही लाइन?

By admin | Published: May 28, 2015 03:10 PM2015-05-28T15:10:29+5:302015-05-28T15:10:29+5:30

तुला जे आवडेल ते कर, असं म्हणणं सोपं पण माहिती तर हवं आपल्याला नक्की काय आवडतं ते? हे नको, ते नको, हे असं करत सतत कोर्स सोडून पळत सुटलं तर काहीच होणार नाही! त्यामुळे आपल्याला झेपत नाही म्हणून अभ्यासक्रम बदलायचाय की, आपल्या आळशीपणामुळे की निव्वळ पळपुटेपणामुळे.? याचं उत्तर एकदा स्वत:ला द्याच.

Jum Boer, the line of leave? | जाम बोअर होतंय, सोडू का ही लाइन?

जाम बोअर होतंय, सोडू का ही लाइन?

Next
या शिक्षणात मनच रमत नाही. मीडियम बदलू की कोर्सच बदलू?
 
 
 
दहावीनंतर सायन्स घेतलं, पण आता दुस:या शाखेकडे जावंसं वाटतं आहे. सायन्स आता डोक्यावरून जातंय, आणि आता बाबा म्हणतात, दहावीला एवढे मार्क मिळाले तर आता मेडिकल-इंजिनिअरिंगला जा, मला मात्र कळून चुकलंय की, सायन्स आपल्याला झेपणार नाही, आता काय करू?
 
दहावीला चांगले मार्क मिळाले. सायन्सला सहज प्रवेश मिळाला. म्हणून सायन्स घेतलं, पण आता लक्षात आलं की, ही साइड आपल्यासाठी नाही. इथे शिकवल्या जाणा:या विषयांमध्ये आपल्याला काडीचाही रस नाही, असं अनेकांचं होतं. 
वास्तविक शाळेत असतानाही सायन्स आवडतं, असं काही नसतं. पण अचानक जास्त मार्कपडतात, ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’, शाळेने दिलेले अंतर्गत गुण, वर्षभराच्या अभ्यासाला असलेले गुण किंवा कला-क्रीडा यात भाग घेतल्यामुळे वाढलेले गुण यामुळे हे मार्क एकदम ‘वाढल्या’सारखे वाटतात. एकदम 90 टक्क्यांच्या वरतीच अनेकांना मार्क पडतात. हे वाढलेले मार्कसायन्सकडे जाण्याला उद्युक्त करतात. घरच्यांनाही वाटतं, हुशार आहे. मेडिकल-इंजिनिअरिंग नक्की ङोपेल! त्यात आपल्याकडे उगाचच सायन्सला एक वलय आहे. सायन्सला जाणा:यांची कॉलर ताठ असते म्हणून अनेकजण सायन्सकडे जातात. 
बारावीपर्यंत सायन्स केलं तर पुढे अनेक शाखांचे पर्याय उभे राहतात, असं मग त्यांनाही वाटतं. या अशाच काही कारणांमुळे मुलं-मुली सायन्सला जातात. 
आवडत नसलं तरी सायन्स घेतात. 
तुमचं तसं काही होत असेल तर याच टप्प्यावर सावध होण्याची गरज आहे. आपल्याला नक्की काय हवंय, काय आवडतं हे नीट बघायला पाहिजे. ज्यांनी अकरावी-बारावी सायन्स केलंय, अशांची वह्या-पुस्तकं बघा, सिलॅबस समजून घ्या. अकरावीच्या पुढचा कोणताच अभ्यासक्र म सोपा नसतो. कुठंही गेलं तरी कष्ट करण्याची तयारी हवीच.
ज्यांनी सायन्स घेतलं आहे, त्यांच्याशी बोला. आणि मग ठरवा आपल्याला हे ङोपेल का?
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे..
सायन्स आवडलं नाही, देऊ सोडून, इंजिनिअरिंगमध्ये मन रमत नाही, देऊ सोडून, सोपं काहीतरी करू हे मनातून काढून टाका. घाईघाईनं निर्णय घेऊ नका. आता घेतलंय ना तर ‘आपल्याला जमेल’ असा विश्वास ठेवा. लगेच अकरावीला सायन्स किंवा पहिल्याच वर्षी इंजिनिअरिंग सोडू नका. निदान बारावी करा. जितके मार्कमिळतील, त्या आधारे पुन्हा प्रयत्न करता येतील. बारावीनंतर आर्ट्सला येऊन आपल्या आवडीचे विषय घेऊन उत्तम करियर करणारे अनेक आहेत. तेच इंजिनिअरिंगचंही! पूर्ण विचार करा, धरसोड करणं घातकच!
 
मला आवडेल असं वाटलं होतं, पण आता मी जे शिकतोय ते मला आवडतच नाही, देऊ का सोडून? या अभ्यासक्रमात माझं मनच रमत नाही, तर काय करू?
 
आजकाल शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध असल्यामुळे नक्की कोणत्या शाखेकडे जायचं आहे, याचा निर्णय घेणं खरंच अवघड आहे. त्यामुळे गोंधळ उडतो. आपल्याला सल्ला देणारे आई-वडील, करिअर कॉन्सिलर, मोठी भावंडं, त्यांचं मित्रमंडळ हे सगळे जण वेगवेगळ्या सूचना देतच असतात. त्यापैकी आपल्याला त्यातलं फारसं काही कळत नसल्यामुळे निर्णय घेणं अवघड जातं. अखेर एका टप्प्यावर आपण एक शाखा निवडतो आणि त्यामागे जातो. हे सर्व झाल्यानंतर मात्र अनेकांना आपल्याला दुसरंच काहीतरी करायचं होतं, असा साक्षात्कार होतो. तुमचं तसं होत असेल तर या काही गोष्टी कठोरपणो तपासून पहाच..
 
* जी शाखा निवडली आहे, त्यात चांगले मार्क मिळवण्यासाठी आपले प्रयत्न कमी पडताहेत का?
* आकलन आणि अभ्यास अजून हवा आहे का? तो आपण करायचं टाळतोय का?
*  जी शाखा आता नव्याने निवडावीशी वाटतं आहे, ती नेमकी कशामुळे? अभ्यास कमी असतो, मित्रने/मैत्रिणीने निवडली आहे म्हणून की, अजून काही? की नुस्तं इथून पळायचं आपण निमित्त शोधतो आहोत.
* त्या शाखेकडे पुढे जाऊन करिअरच्या व्यापक संधी निश्चितपणो उपलब्ध होऊ शकतात का? 
* या सगळ्या गोष्टींचा विचार करा. नाहीतर आधीचाच अभ्यासक्र म बरा होता, असं म्हणण्याची वेळ येऊ नये. ‘हातचं सोडून पळत्याच्या मागे’ ही म्हण लक्षात ठेवा. 
नुसतं सिनेमे पाहून, ‘जो दिल चाहता हे वो कर’, म्हणणं सोपं, पण आपल्याला नेमकं काय आवडतं आणि का आवडतं, हे कळणं तितकंसं सोपं नसतं.
अनेकांना ग्लॅमर वाटतं, हातात आहे ते नाकारून दुसरं काहीतरी करण्याचं ग्लॅमर. तर काहीजणांना निव्वळ आळस म्हणून अधिक मेहनतीचं काम टाळायचं असतं. काहीजण तर केवळ आई-बाबा म्हणतात, म्हणून जे करतोय त्याला विरोध करतात.
आपण हे सारं कशामुळे सोडणार आहोत, आपलं मन का रमत नाही, याचा एकदा विचार करा. निव्वळ धरसोड केल्यानंही हाती काही लागत नाही. 
 
दहावीर्पयत मराठीच माध्यम होतं, पण आता अकरावीपासून इंग्रजी माध्यम घ्यावं का? त्याला स्कोप आहे, पण मला ङोपेल का? आणि नाहीच घेतलं तर मग करिअरची वाट लागेल का?
 
दहावी-बारावीर्पयत मराठी माध्यमात शिक्षण झालं असेल, तर पुढे कोणतं माध्यम घ्यायचं हा प्रश्न निर्माण होतोच. शिक्षणासाठी कोणतं माध्यम निवडायचं हा विचार खरंतर करूच नका. त्यापेक्षा असा विचार करा की, अजून पाच-सहा वर्षानी जे काही क्षेत्र आपण नोकरी-व्यवसाय म्हणून स्वीकारणार आहोत, तिथे कोणत्या भाषेत व्यवहार चालतो. तिथे मराठी चालणार असेल, उच्च मराठी, इतर भारतीय भाषांमध्येकाम करता येणार असेल, तर माध्यम बदलण्याची गरज नाही; मात्र नोकरी-व्यवसायातील सर्व व्यवहार इंग्रजीतून होणार असतील, तर आत्ताच इंग्रजी माध्यम निवडलेलं चांगलं. म्हणजे वेळीच तुम्हाला त्या क्षेत्रच्या परिभाषेशी ओळख होईल. हातात असलेल्या या वर्षात इंग्रजीवर प्रभुत्व मिळवता येईल. 
सध्याचा काळ हा बहुभाषिकांचा आहे. या पुढील काळात ज्यांना मराठी-हिंदी-इंग्रजीसह इतरही काही भाषा येतात, त्यांना जास्त चांगले पर्याय खुले असतील. त्यामुळे अन्य भाषा शिकण्याला प्राधान्य द्यायला हवं. आपण स्वत:साठी नेहमीच ‘कम्फर्ट’ शोधण्याचा प्रयत्न करत असतो, तसं नको. त्यापेक्षा आत्ता मेहनत करा. तरुण वयात मेंदू उत्तम साथ देत असतो. सर्व काही शिकण्याची क्षमता असते, हे लक्षात घ्या.
त्यामुळे भाषेला घाबरू नका. ठरवलं तर भाषा शिकता येतेच, पण ती कशासाठी शिकणार असा प्रश्न स्वत:ला विचारा आणि मग निर्णय घ्या.
 
- डॉ. श्रुती पानसे
( शिक्षण आणि मेंदूचा अभ्यास या विषयातील तज्ज्ञ)

Web Title: Jum Boer, the line of leave?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.