शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मस्ती का सफर लंबा होना चाहिये ना?

By admin | Updated: March 10, 2017 13:02 IST

मोबाइलवर बोलायला आणि गाणी ऐकायला टू व्हीलरवर जायचा यायचा वेळ वापरायचं कारणच काय? ऐका की नंतर गाणी. बोला नंतर फोनवर. गाडी चालवताना फोनवरपण बोलू शकतो, हे बायोडेटामध्ये टाकायचे आहे की काय? पण नाही दुनियेवर खुन्नस काढल्यासारखी गाडी दामटतात अनेकजण, का? कशासाठी?

प्राची पाठक
 
‘तू अमुक परीक्षेत अमुक मार्क्स मिळव, तुला सायकल घेऊन देईन’.. 
‘अमुक एक पास झालास की तुला स्मार्ट फोन देऊ’..
‘अमुक वयाचा झालास की देऊ ना तुला टू व्हीलर..’
- असे घरोघरचे डायलॉग असतात. अमुक गोष्ट करण्यासाठी, त्यातला आनंद मिळवण्यासाठी ती गोष्ट करणं सोडून आपल्यापुढे काय गाजर टाकलं आहे, त्याकडे बघत आपण ती गोष्ट करायला जातो मग. एखादी पार्टी असेल, तर आपण आधीपासून तयारी करतो. कोणाचं बर्थ डे सेलिब्रेशन असेल तर काय काय प्लॅन्स आखतो. तोच उत्साह एखाद्या परीक्षेसाठी तयारी करताना का नसतो? कुठं जातं मग आपले प्लॅनिंग? का इतरांना आपल्या मागं लागावं लागतं? बक्षिसं पेरावी लागतात? ती गोष्ट इतकी रटाळ आणि सक्तीची का वाटायला लागते? 
अमुक केलेस की तमुक मिळेल, या टप्प्यातून जात काहींना टू व्हीलर्स मिळतात. कोणाला मुश्किलीनं सायकल मिळते. त्यामुळे काय कौतुक असतं यार. मी आता सायकल, टू व्हीलरवर कॉलेजला जाणार, क्लासला जाणार, कुठेही जाणार. सैराटच एकदम! तोवर बसच्या शेवटच्या पायरीवरून चालू बसमध्ये उडी मारणं. चालू ट्रेनमध्ये हवा खात दाराशी वेगवेगळे स्टंट्स करणं, कुठे टपावर चढायचा रिस्की अट्टाहास असेही उद्योग केलेलेच असतात. एकदा का गाडी हाती आली की व्हिडीओ गेम्समध्ये गाडी वेगात पळवणं आणि प्रत्यक्ष गाडी रस्त्यानं चालवणं यातला फरक कळेनासा होतो.
सगळा रोमान्स मग गाडीशी, सायकलशी सुरू. गाडीला तरी लायसन्स लागतं. सायकलला तेही काही नाही. पळवा कशीही. आडवी तिरपी. सगळे स्पोर्ट्स प्रकार त्या सायकल सोबत. एकदम रॉक स्टार झाल्यासारखे वाटतं. हातात दुचाकी असेल, तर विचारूच नका. 
दोन्ही हात सोडून गाडी चालवणं. झिकझॅक गाडी चालवणं. दोन, तीन, चार मित्रमैत्रिणी दाटीवाटीने बसवून गाडी उडवणं नेहमीचं व्हायला लागतं. हॉर्न वाजवत सुटणं. हॉर्न म्हणजे जणू वाद्य अशा ट्यून्स त्यावर तयार करणं. कट मारणं, पाय फैलावून गाडी चालविणं, डबल सीट बसायचं तर उलट्या दिशेनं डबल सीट बसून बुंगाट फिरणं, मित्रांशी बोलत बोलत घोळक्यात गाड्या उडवत फिरणं हीच आपली गाडी चालवायची व्याख्या होऊन जाते. असे घोळक्याने गाडी चालवत सगळे जात असू आणि मागून कोणी हॉर्न वाजवून ओरडलं तर आपली लाईन तोडली, तर काय राग येतो. अचानक कुणाशी रेस लावणं. टायमर लावून अमुक अंतर कापणं. दुसऱ्याच्या पेट्रोलवर आपली मजा असं सगळं साग्रसंगीत सुरू होतं मग. त्यात समोर मुलगी असेल तर तिला काय गाडी चालविता येते, अशी फुशारकी मारता येते. वास्तविक, गाडी चांगली चालविणं आणि गाडी वाईट चालविणं असे दोनच प्रकार असतात. त्यात स्त्री-पुरु ष असा भेद करून विशेष अर्थ नसतो.
पण आपल्याला स्टाईल मारायला, दुसऱ्याला घाबरवायला, टॉण्ट्स मारायला गाडी हे एक खेळणेच मिळालेले असते. घरी तक्र ारी येऊ लागतात मग. तुमचा मुलगा/मुलगी किती जोरात गाडी चालवतो, त्याला/तिला समजावा वगैरे. अशी तक्रार आली की, आपण जोरात जातो, हे सिद्धच होते जणू. मग अजून चेव चढतो. तक्र ार करणाऱ्यांच्या समोर आपले गाड्यांच्या वेगाचे प्रयोग सुरू होतात. एकमेकांना दाखवायला गाड्या जोरात जाऊ लागतात. गाडी चालविणे म्हणजे सगळ्या जगावर काढलेली खुन्नस! सगळ्या अचिव्हमेण्ट्स गाडी जोरात हाणून जणू आपल्या पदरात पडतात. कोणत्याही क्लासबाहेरच्या, कॉलेजबाहेरच्या रस्त्यानं गाडी चालविताना जपून जात चलं, असे मोठे लोक इतर मोठ्यांना बजावतात. यांना काय कळणार गाडी उडविण्याची मजा, असा आपला पवित्रा असतो. पण मोठ्यांच्या तरु णपणी त्यांनीही असलेच काही केलेले असते. तर मुलगा, मुलगी त्याच लाईनला जाताय म्हणून कौतुक करायचे की हातपाय मोडून बसेल, म्हणून काळजी करायची, या वेगळ्या टप्प्यावर ते मोठे आता आलेले असतात.
गाड्या पार्क करायच्या स्टाइल्सदेखील वेगवेगळ्या असतात प्रत्येकाच्या. आपली गाडी नसेल, तरी इतरांच्या गाडीवर बसून त्यांचे स्टँड तुटले काय आणि गाड्यांचे पार्ट खराब झाले काय, आपलं काय जातं? आपल्या गाडीवर कोणी बसले नाही पाहिजे पण. गाड्यांचे आरसे हे तर हेअर स्टाइल करायचे अड्डेच. हळूहळू गाड्यांचे प्रकार आपले पाठ होऊ लागतात. भारीतल्या गाड्या तर आधी समजतात. सगळे बिचारे ‘आपल्याला अशी गाडी पाहिजे’, अशी आशा लावून बसतात. आपल्याला अमुक करिअरचा टप्पा पार करायचा आहे, हे नवे शिकू, आपली आर्थिक कुवत अमुक आहे, ती वाढत नाही, तोवर खेळू की एक - एक रन, असे कधी सुचत नाही. थेट आईवडिलांना त्यांचे दोष दाखवून क्लीन बोल्ड करायचे आणि त्यांच्या जोरावर सिक्सर मारायला घ्यायची. यह बात कुछ हजम नहीं हुई दोस्तो...
हातात आलेली गाडी जास्तीत जास्त काळ सुरक्षितपणे चालवायची आहे आपल्याला. आपल्या वेगाकडे लक्ष ठेवलं पाहिजे. गाडीचा मेंटेनन्स करणं शिकू की चेंज म्हणून. गाडी चालविणाऱ्या अनेक मुली किती कडेकोट स्कार्फ वगैरे गुंडाळून फिरतात. स्किनची किती काळजी. हेल्मेटचा पत्ता नाही! डोकं फुटलं तर स्किन काळी की गोरी, क्या फायदा? मोबाइलवर बोलायला आणि गाणी ऐकायला टू व्हीलरवर जायचा यायचा वेळ वापरायचं कारणच काय? ऐका की नंतर गाणी. बोला नंतर फोनवर. गाडी चालवताना फोनवरपण बोलू शकतो, हे बायोडेटामध्ये टाकायचे आहे की काय? कितीही वेगात कुठं गेलं, तरी पाच सात मिनिटाच्या वर मोठासा फरक पडत नाही. फिर लाईफ को रिस्क मे काय को डालने का? हेल्मेट पहनके लाइन मे रहने का रे. 
मस्ती का सफर तो लंबा होना चाहिये. तगडा होना चाहिये. आपले किंवा आपल्यामुळे इतरांचे हातपाय तोडून प्रश्न वाढवून कशाला ठेवायचे? आपण भानावर राहायचे, इतकेच.
 
( मनमोकळं जगण्याचा ध्यास असलेली प्राची मानसशास्त्रात सुवर्णपदक विजेती आहेच, शिवाय सूक्ष्मजीवशास्त्राची तज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे.)