नोकरीच्या संधीवरफेसबुकची टाच?

By Admin | Updated: July 10, 2014 17:57 IST2014-07-10T17:57:49+5:302014-07-10T17:57:49+5:30

आता या पुढचा सगळा मजकूर वाचून तुम्हाला जोरदार धक्का बसणार आहे. तुम्हाला वाटत असेल की, फेसबुकसारखे कट्टे ही तर काय टाइमपासच करायची जागा आहे

The job of a jobbook? | नोकरीच्या संधीवरफेसबुकची टाच?

नोकरीच्या संधीवरफेसबुकची टाच?

 

 
आता या पुढचा सगळा मजकूर वाचून तुम्हाला जोरदार धक्का बसणार आहे. तुम्हाला वाटत असेल की, फेसबुकसारखे कट्टे ही तर काय टाइमपासच करायची जागा आहे. आपण आपल्या मर्जीचे मालक, माङया भिंतीवर काय वाट्टेल ते लिहीन. दुस:या कुणाचा त्याच्याशी काय संबंध.
पण तो संबंध आहे?
तुमच्या वॉलवरची माहिती तुमचं अख्खं करिअर घडवू किंवा बिघडवू शकतं. एवढंच कशाला, तुम्हाला हमखास मिळणारा जॉबही हातचा जाऊ शकतो. त्याला कारण एकच, तुम्ही तुमच्या वॉलवर तोडलेले अकलेचे तारे.!
काय म्हणता विश्वास नाही बसत?
 करिअरबिल्डर नावाच्या एका जॉब पोर्टरनं अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या सव्र्हेक्षणानुसार आता नोकरी देताना अनेक कंपन्या त्या त्या उमेदवाराचं सोशल मीडियावरचं अकाऊण्ट तपासून पाहत आहेत. त्याच्या ख:या खोटय़ा व्यक्तिमत्त्वाची, त्यानं तिथं दिलेल्या माहितीची, स्वत: व्यक्त केलेल्या मतांची, लाईक-डिसलाईकची, अनेक ‘उद्योगांची’ सचित्र माहिती नीट पडताळून पाहत आहेत. आणि त्यावरून अनेक कंपन्या त्या उमेदवाराला नोकरी द्यायची की नाही हेही ठरवत आहेत. करिअरबिल्डरनं केलेल्या अभ्यासानुसार ज्या कंपन्या असं सोशल नेटवर्किग रिसर्च करतात त्यापैकी 51 टक्के कंपन्यांना अनेक उमेदवारांच्या वॉलवर असा मजकूर सापडलाय की तो वाचून त्यांनी त्याला नोकरीवर घेणंच नाकारलेलं आहे. करिअरबिल्डरनं 1क् फेब्रुवारी ते 4 मार्च 2क्14 दरम्यान हा अभ्यास केलेला आहे.
सोशल मीडिया रिसर्च करून कुठल्या कारणांसाठी जॉब दिला जातो, कुठल्या कारणांसाठी नाकारला जातो. हे वाचा.
 
नोकरी नाकारण्याची कारणं.?
1) उमेदवारानं अत्यंत गलिच्छ, ओंगळवाणो आणि उत्तेजित करणारे फोटो आपल्या वॉलवर टाकलेले असणे.
2) दारू पिणं, नशा करणं याविषयी माहिती सचित्र वॉलवर दिसणं.
3) आधीची कंपनी, तिथले कर्मचारी/सहकारी यांची निंदा करणारा, त्यांना शिव्याशाप देणारा मजकूर टाकलेला असणं.
4) वॉलवर कमेण्ट करताना वापरलेली भाषा अत्यंत अशुद्ध, व्याकरणाचा घोळ, अत्यंत वाईट्ट कम्युनिकेशन स्किल असणं.
5) धर्म, जातीपाती, स्त्री-पुरुष  यासंदर्भात भेदभाव करणारा जुनाट विचारसरणीचा मजकूर वॉलवर असणं.
6) आपल्या शैक्षणिक माहितीविषयी थापा मारलेल्या दिसणं.
7) आधीच्या कंपनीतली गोपनीय माहिती आपल्या वॉलवर टाकलेली दिसणं.
10) प्रोफेशनल जगात आवश्यक असणारी स्किल्स उमेदवाराच्या फेसबुक कम्युनिकेशनमध्ये न दिसणं.
 
 
निवडीवर शिक्कामोर्तब करण्याची कारणं.
1) फेसबुकवर त्या उमेदवाराचं व्यक्तिमत्त्व पाहून त्याच्याविषयी एक  चांगलं मत तयार झालं. ते व्यक्तिमत्त्व आपल्या कंपनीत चांगलं रुळेल असं वाटणं.
2) उमेदवाराची व्यावसायिक पात्रता त्याच्या इतर माहितीशी जुळणं.
3) त्या साईटवर त्याची प्रोफेशनल इमेज उत्तम सांभाळलेली असणं.
4) त्या उमेदवाराला विविध विषयांत गती आणि रस असल्याचं दिसणं. त्याचं कम्युनिकेशन स्किल उत्तम असणं.
5) त्याला विविध पुरस्कार मिळाले आहेत, लोक त्याचं कौतुक करताहेत हे दिसणं.

Web Title: The job of a jobbook?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.