शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
5
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
6
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
7
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
8
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
9
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
10
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
11
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
12
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
13
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
14
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
15
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
16
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
17
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
18
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
19
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

जर्सी नोज नो जेंडर हे तिनं सिद्ध केलंय! -कोण ती ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 16:51 IST

जिच्या खेळावर विराट कोहली भरवसा ठेवतो आणि ऑस्ट्रेलियन प्रेक्षक फिदा होतात, त्या हरमनप्रीतलाही या समाजानं ऐकवलंच होतं, लडकियोंके साथ खेल, क्रिकेट लडकोंका खेल है!

ठळक मुद्देभारतीय क्रिकेटवेडे भारतीय महिला क्रिकेट संघावरही भविष्यात मनर्‍पूत प्रेम करतील अशी आशा वाटावी इतपत बदल हरमनप्रीत आणि तिचा संघ करतो आहे.

- स्वदेश घाणेकर

‘लडकी है लडकीयोंके साथ खेल, ये क्रि केट लडकों का खेल है!’.- क्रि केटपटू होऊ पाहणार्‍या एखाद्या मुलीला असा सल्लावजा टोमणा मारणं तसं आजही आपल्या देशात आम बात आहे. काहीजणी अशा टोमण्यांनी चिडतात, काहीजणी खचून जातात काहीजणी ढसाढसा रडतातही. कदाचित एखादीचं क्रि केटपटू बनण्याचं स्वप्नही विरून जात असेल. पण या पंजाबी कुडीची बातच काही और. खेळाचा वारसा घरातूनच मिळाल्यामुळे जिद्द, चिकाटी हे तिला जन्मतर्‍च लाभलं होतं. म्हणूनच ‘क्रि केट  लडकों का खेल है!’ असा सल्ला देणार्‍यांनाच नाही तर त्यांच्या रूपात या देशातल्या पुरु षप्रधान मानसिकतेलाही तिनं तिच्या बॅटनं उत्तर दिलं आहे. बायकांचं क्रिकेट म्हणजे काय भातुकली, त्यात काही फोर्स नाही, काही मजा नाही असं म्हणणारे आजही देशात कमी नाहीत. जे ग्लॅमर पुरुषांच्या क्रिकेटला आहे, ते आजही बायकांच्या क्रिकेटला नाही. आता आयसीसीच्या बदललेल्या नियमांमुळे महिला क्रिकेटला प्रोत्साहन आणि स्पॉन्सर्स मिळू लागलेत, सामने लाइव्ह दिसायला लागलेत. आणि त्या बदलाचा चेहरा बनतेय ही तरुणी.तिचं नाव हरमनप्रीत कौर. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार.गयानात सुरू असलेल्या आयसीसी महिला ट्वेण्टी-20 क्रि केट विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडविरु द्ध हरमनप्रीतने विक्र मी खेळी केली आणि ती पुन्हा चर्चेत आली. आंतरराष्ट्रीय ट्वेण्टी-20 क्रि केटमध्ये शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. तिची फटकेबाजी खणखणीत. चेंडू असा काही सीमापार जातो की बंदुकीची गोळी, कुणाच्या हाती लागण्याचा सवाल नाही. त्याबाबतीत सेहवाग तिचा गुरु. ती वीरेंद्र सेहवागची जबरदस्त फॅन आहे. त्याच्यात जो देमार बेधडकपणा होता तोच हरमनप्रीतमध्ये दिसतो.  तिचे वडील हरमंदर सिंह भुल्लर हे व्हॉलिबॉलपटू आणि बास्केटबॉलपटू. खेळाचं बाळकडू घरातूनच मिळालं पण म्हणून ही मुलगी थेट क्रि केट खेळायला लागेल असं काही कुणाच्या ध्यानीमनी नव्हतं; पण तिला क्रिकेटचं वेड. त्या वेडापायी घरापासून 30 किलोमीटर दूर असलेल्या ज्ञानज्योती स्कूल अकादमीत तिनं प्रवेश घेतला. क्रिकेटचे धडे गिरवणं सुरूही झालं; पण तिच्या वडिलांना वाटायचं आपल्या मुलीनं हॉकी खेळावं. त्यांना हॉकीचं इतकं प्रेम की घरात मुलगी जन्माला येताच त्यांनी घोषणाच केली की ही मुलगी हॉकीपटू होणार; पण हरमनप्रीतला हॉकी स्टिकपेक्षा क्रिकेट बॅट जास्त आवडली.  एकतर ही मुलगी म्हणजे घरातलं पहिलंच अपत्य. त्यातही घरच्यांना मुलाची आस होती. त्यामुळे त्यांनी बाळासाठी मुलाचे टी-शर्टही आणून ठेवले होते. योगायोग असा की त्या शर्टवर बॅट्समनचं चित्र होतं. क्रि केट समजू लागलं तेव्हापासून हरमनप्रीतने सेहवागला फॉलो केलं.   सेहवाग जेव्हा फटकेबाजी करतो तेव्हा येणारा  ‘टक्’  हा आवाज मला फार आवडायचा असं ती वारंवार सांगते. त्यामुळे तो आवाज ऐकण्यासाठी आक्र मक फलंदाजी करणं मला आवडायला लागलं हे तिचं साधं गणित;  मात्न 2016 मध्ये तिने मुंबईकर अजिंक्य रहाणेला नेट्समध्ये सराव करताना पाहिलं आणि खेळात संयमही तितकाच गरजेचा असल्याचं लक्षात आलं मग तिनं सरळ बॅटनंही खेळण्याचा सराव सुरू केला.कमलदीश सिंग सोढी यांनी हरमनप्रीतमधील कौशल्य जाणलं. क्रि केटसाठी मुलांशी भांडणारी आणि त्यांच्या नाकावर टिच्चून खोर्‍याने धावा करणारी ही मुलगी, मग त्यांनी तिला क्रिकेट शिकवायला सुरुवात केली. तिच्या क्रि केटचा सर्व खर्च उचलला. हरमनप्रीतच्या वडिलांना मात्न तिला दुखापत होण्याची चिंता अधिक असायची. सोढी यांनी त्यांना विश्वास दिला की ती उत्तम खेळेल, तुम्ही फक्त पहा तिची प्रगती. तिनंही सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर पंजाब क्रि केट असोसिएशनच्या कॅम्पमध्ये प्रवेश केला. दोन वर्षाच्या प्रोफेशनल सरावानंतर तिच्यासाठी पंजाब वरिष्ठ संघाचे दरवाजे खुले झाले. पंजाबला विभागीय जेतेपद मिळवून दिल्यानंतर तिचा भारतीय महिला वरिष्ठ संघाच्या 2009 च्या महिला ट्वेण्टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संभाव्य खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला. बंगळुरू येथील सराव शिबिरात तिला स्वतर्‍मधील अनेक उणिवा समजल्या. आक्र मक खेळाबरोबरच फिटनेस आणि डाएट याचं महत्त्व तिला पटले. 7 मार्च 2009 मध्ये पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघात तिनं पदार्पण केलं. त्या सामन्यात तिला फलंदाजीची संधी मिळाली नसली तरी गोलंदाजीत तिने 4 षटकांत 10 धावा देत लक्ष वेधून घेतलं.तिथून सुरू झालेला हा प्रवास आता भारतीय महिला क्रिकेटला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी झटतो आहे. क्रिकेटपटू संजय मांजरेकरच्या शब्दात सांगायचं तर, कुठलाही खेळ तेव्हाच लोकप्रिय होतो, जेव्हा खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं नातं जमतं, लोक त्याच्यावर प्रेम करायला लागतात.भारतीय क्रिकेटवेडे भारतीय महिला क्रिकेट संघावरही भविष्यात मनर्‍पूत प्रेम करतील अशी आशा वाटावी इतपत बदल हरमनप्रीत आणि तिचा संघ करतो आहे.म्हणून तर विराट कोहलीही मोहीम सुरू करतो, जर्सी नोज नो जेण्डर!

बेस्ट वन-डे इनिंगहरमनप्रीतच्या फटकेबाजीने सर्वाधिक कोणाला हतबल केलं असेल तर ते ऑस्ट्रेलियाला. 2017 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यफेरीच्या सामन्यात हरमनप्रीतने नाबाद 171 धावांची खेळी केली. 115 चेंडूंत तिने 20 चौकार आणि 7 षटकार खेचले. वन-डे क्रि केटमधील ही भारतीय महिला खेळाडूने केलेली दुसरी वैयक्तिक सर्वोत्तम खेळी आहे. दीप्ती शर्मा (188) आघाडीवर आहे. पण, विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्र म आजही हरमनप्रीतच्या नावावर आहे. अनुभवी मिताली राज नंतर आयसीसी महिला फलंदाजांच्या अव्वल दहा क्रमवारीत स्थान पटकावणारी ती दुसरी भारतीय खेळाडू आहे. आक्रमक फलंदाजीमुळे तिला ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश आणि इंग्लंडच्या सुपर लीगसाठी क्लबने करारबद्ध केलं. हरमनप्रीतच्या नाबाद 171 धावांची खेळी ही अनेक माजी क्रि केटपटूंना व्हीव्हीएस लक्ष्मणच्या कोलकाता येथील 281 धावांच्या खेळीची आठवण करून देणारी ठरली. भारतीय संघ कोलकाता कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाच्या छायेत असताना लक्ष्मणने 281 धावांची अविश्वसनीय खेळी केली होती. त्याच्या या खेळीने भारताला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला होता. हमनप्रीतनेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध फटकेबाजी करून भारताचा विजय निश्चित केला होता.केवळ महिला म्हणून नव्हे तर कुणाही भारतीय क्रिकेटपटूनं केलेल्या सर्वोत्तम वन-डे इनिंगमध्ये हरमनप्रीतच्या त्या इनिंगची नक्की नोंद आहे.