शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवी कपूर सध्या पांढर्‍याशुभ्र अनारकली कुर्ता घालतेय, हा लूक कसा वाटतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 03:00 IST

अनारकली विथ चांदबाली हा जान्हवी कपूरचा लूक आपणही ट्राय करु शकतो.

ठळक मुद्देसेलिब्रिटीजसारखा लूक दरवेळी करताच येईल, असं नसतं; पण जान्हवीसारखा असा लूक आपल्याला सहज शक्य आहे.

- श्रुती साठे

सलवार कमीज काय किंवा कुर्ता पायजमा काय.. नेहमीचा साध्या स्टाइलचा,  ए लाइन कुर्ता असे साधारण कुर्ते आपल्याकडे असतातच. इतर अनेक स्टाइलचे सेट आपल्याकडे असतात. आपण त्यांचे रंग, मॅचिंग ज्वेलरी, सॅण्डल्स कॉन्ट्रास्ट ओढण्या यांची जमवाजमव करून सलवार कमीज सेट्सची वर्गवारी लावून ठेवतो. कोणते ऑफिससाठी, कॅज्युअल डे आउटसाठी कोणते तर कोणते लग्नसमारंभासाठी, रिसेप्शनसाठी. अनारकली कुर्ता सेट हा पारंपरिक कार्यक्रमासाठी एक उत्तम पर्याय ठरतोय. लग्नसमारंभासाठी, रिसेप्शनमध्ये बर्‍याच तरुण मुली, महिला हल्ली सुटसुटीत म्हणून साडय़ा, लेहेंगा चोलीऐवजी अनारकली स्टाइल कुत्र्यामध्ये दिसतात. तुमच्या आमच्यातली ही अनारकली फॅशन बॉलिवूड सेलेब्ससुद्धा आवडीने वापरताना दिसतात. 

कॉलेज तरुणींची स्टाइल आयकॉन असलेली जान्हवी कपूर तिच्या आगामी पिक्चरच्या प्रोमोशनसाठी सध्या अनारकली कुर्ता घालून वावरताना दिसतेय.  प्रोमोशनसाठी सेलिब्रिटी डिझायनर सुकृती ग्रोव्हरने डिझाइन केलेला पांढर्‍या रंगाचा स्लिव्हलेस स्ट्रॅपी अनारकली जान्हवीने निवडला. या कुत्र्याची खासियत ही पांढर्‍या रंगावर केलेली मिल्ट कलर फुलांची एम्ब्रॉयडरी. अनारकलीला समोर आणि बॉर्डरवर असलेली नाजूक फुलांची एम्ब्रॉयडरी जान्हवीवर अतिशय खुलून दिसली. त्यावर वापरलेली ओढणी - तिच्यावर असलेल्या मोठय़ा ठसठशीत गोंडय़ामुळे जास्त खुलून दिसली. जान्हवीने चांदबाली प्रकारातले मोठे कानातलेही घातलेले दिसतात.हे सारं आपणही वापरू शकतोच. सेलिब्रिटीजसारखा लूक दरवेळी करताच येईल, असं नसतं; पण जान्हवीसारखा असा लूक आपल्याला सहज शक्य आहे. नक्की वापरून पहा अनारकली विथ चांदबाली !